वास्तुशास्त्र (Vastu shastra) म्हणजे काय ?

vastu shastra

vastu shastra

वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय, हा प्रश्न आपल्याला पडणे अगदी स्वाभाविक आहे. चला तर मग जाणून घेऊया…

मानवाचे शरीर पंचमहाभूतांनी मिळून बनलेले आहे. ही पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश. जसे मानवी शरीर या तत्त्वांपासून तयार झाले, तसेच मानवी शरीर जगविण्यासाठी ही पंचतत्त्व लागतातच. पिण्यासाठी पाणी लागते, जीवित राहण्यासाठी वायू लागतो, अन्नासाठी ऊर्जा लागते, उभे राहायला जमीन लागते. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. यांपैकी निवाऱ्याशी आपले वास्तुशास्त्र संबंधित आहे…

वास्तुशास्त्रा कशा प्रकारे घर/वास्तु बांधकाम करावे जसे की प्रवेशद्वार , स्वयंपाक गृह , इत्यादि पुढील प्रमाने आहे.

वास्तुचे – प्रवेशद्वार: आपल्या घराचे मुख्य दर कोणत्या दिशेला असावे?

वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार हे नेहमी पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावे.

मुख्य प्रवेशद्वारासमोर नाला अथवा गटार असू नये. प्रवेशद्वारासमोर शक्यतो झाडही नसावे. कुठल्याही मंदिराचे प्रवेशद्वार अथवा गाभाऱ्याचे मुख्य प्रवेशद्वार समोर नसावे. वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार इतर दरवाजांपेक्षा शक्यतो मोठे असावे. ते नेहमी आत उघडणारे असावे. शक्यतो मुख्य प्रवेशद्वारासमोर भिंत ही नसावीच. लाकडाचा उंबरठा असावा. हा उंबरठा २ ते ३ इंचाचा असावा. फटी नसाव्यात. नेहमी लक्षात ठेवावे की मुख्य प्रवेशद्वार हे वास्तूच्या सुख, शांती, समृद्धीचे प्रवेशद्वारच असते. नक पूर्व, उत्तर वा ईशान्य या दिशेत असलेले प्रवेशद्वार हे चांगले असते, मात्र प्रवेशद्वाराच्या दिशेवरच संपूर्ण शुभाशुभ फळे मिळत नसतात. इतरही दिशास्थिती विचारात घ्यावी लागते. त्यामुळे विचलित होऊन जाऊ नये..

देवघर : घरात देवघर कसे आणि कोठे असावे वास्तू शास्त्र नुसार माहित करून घ्या ?

देवघर हे ईशान्य दिशेस असावे. जर ईशान्य कोनात शक्य नसेल तर पूर्व वा उत्तर दिशेलाही देवघर असलेले चालते. दक्षिणेकडचे देवघर टाळावे. शयनगृहात देवघर नसावे. देवघराच्या वर अथवा खाली शौचालय, स्नानगृह नसावे. देवघरातील आग्नेय कोपऱ्यात दिवा, समई, दीप, अगरबत्ती, धूप लावावा. पूजा करताना देवाच्या समोर बसू नये. आसन उजव्या अथवा डाव्या बाजूला मांडावे.

देवघरात मृत व्यक्तींचे फोटो नसावेत. भग्न, खंडित मूर्ती ठेवू नये. एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती वा फोटो नसावेत. देवघर शक्यतो जमिनीपासून किंचित उंच असावे. काळा कडप्पा नसावा. लाकूड, संगमरवर चालेल.

अनावश्यक सामान देवघरात ठेवू नये. ज्यांना देवघर बांधणे शक्य नसेल त्यांनी ईशान्य कोपऱ्यात अथवा उत्तर भिंतीला तसबीर लावावी अथवा चौरंगावर देव प्रतिमांची स्थापना करावी व पूजन करावे. देवघरात नेहमी दीप प्रज्वलित ठेवावा. वातावरण प्रसन्न ठेवावे. वास्तूमध्ये देवघरासाठी खास जागा करावी.

दिवाणखाना अथवा बैठकीची खोली : घर बाधाकाम करण्या आधी हे नाकी पहा ! vastushastra

दिवाणखाना पूर्व दिशेला, उत्तर अथवा ईशान्य दिशेला असावा. दारे पूर्व वा उत्तर दिशेला असावीत. सोफा, आसन व पाहुण्यांची बैठक व्यवस्था अशी करावी की येणाऱ्यांचे तोंड हे बसलेले असताना दक्षिण, नैऋत्येस असावे. घरातील प्रमुख व्यक्तीने पूर्व अथवा उत्तरेकडे तोंड करून बसावे.

दूरचित्रवाणी संच, संगीत उपकरणे वा तत्सम विद्युत उपकरणे आग्नेय दिशेला ठेवावीत. विद्युत उपकरणांसाठीचे स्विचेस, इलेक्ट्रिकल बोर्डही आग्नेय दिशेला असावा. दिवाणखान्यातील घड्याळ हे पूर्व दिशेला तोंड करून असावे. दिवाणखान्यात हिंसा अथवा शोक दर्शविणारी चित्रे नसावीत. निसर्गचित्र, धबधबा वगैरे चित्रे लावावीत. शोकेस, कॅबिनेट व जड फर्निचर दक्षिण भिंतीला लावून ठेवावे. रंगसंगती नेत्रसुखद असावी. भडक रंग टाळावेत.

जिना असल्यास तो दक्षिण, पश्चिम वा नैऋत्येला घ्यावा. टेलिफोन, फॅक्स नैऋत्य दिशेला ठेवावा. दिवाणखान्यातील फर्निचर रचना सुटसुटीत असावी.

स्वयंपाक घर (किचन) : कोठे असावे आपके kichan?

स्वयंपाकघर है वास्तूतील एक महत्त्वाचे केंद्र आहे. कारण येथे जेवण तयार होत असते व घराची स्वामिनी ते करते. संपूर्ण कुटुंबाला अन्नपुरवठा येथून होतो. म्हणजेच प्रत्येकाला जीवनासाठीचा आवश्यक इंधन पुरवठा येथूनच होतो. सुख, शांती, आरोग्य व मनःशांतीचा मार्ग येथूनच सुरू होतो. गृहलक्ष्मीचा येथे सतत वावर असतो.

स्वयंपाकगृह हे वास्तूच्या आग्नेय दिशेला असावे. किचन ओटा हा इग्रजी ”L” या आकाराचा असल्यास उत्तम. तो पूर्वेकडे असावा. गॅसची शेगडी, स्टोह अथवा मायक्रोव्हेव ओव्हन हे स्वयंपाकघराच्या आग्नेय दिशेला असावे. स्वयंपाक करताना गहिणीचे तोंड पूर्वेकडे असावे. बेसिन वा किचन सिंक ईशान्येला घ्यावे. नळ, पाणी, माठ ईशान्येला घ्यावे.

रॅक, जड सामान, डबे, कोठ्या दक्षिण दिशेला ठेवावे. डायनिंग टेबल वा भोजन व्यवस्था वायव्य किंवा पश्चिम दिशेस करावी. पश्चिमेस शक्य नसल्यास पूर्वेस किंवा उत्तरेस करावी. इलेक्ट्रिकल उपकरणे, मिक्सर वगैरे आग्नेय दिशेला बसवावी. रंगसंगती उत्तम असावी, अडगळ असू नये. स्वच्छता व टापटीप ठेवावी.

शयनगृह (बेडरूम): bedroom घरात कोणत्या देशेला आणि कोठे असावी?

गृहस्वामी म्हणजेच घराचा कर्ता पुरुष वा स्त्री जेथे शयन करतात वा आराम करतात ते शयनगृह हे वास्तूतील एक महत्त्वाचे दालन आहे. येथे दिवसभराच्या धावपळीचा, श्रमाचा परिहार होतो. शरीराला आराम मिळतो.

निद्रा झाल्यास मनुष्य ताजातवाना होतो. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्यास ‘मनुष्य प्रगती करू शकतो. वास्तूच्या दक्षिण, पश्चिम दिशेस शयनगृह असावे. पलंग

अथवा झोपेसाठीची गादीव्यवस्था शयनगृहाच्या दक्षिणेकडील नैऋत्य कोपऱ्यात का हे शक्य नसल्यास पश्चिमेकडे पलंग व पाय उत्तरेकडे असावेत. पूर्वेकडे डोके केल्या चालते.

शयनकक्षात देवघर नसावे. ईशान्येला पलंग नसावा व त्या दिशेला पार करून झोपू नये. शयनगृहाच्या आग्नेय वा दक्षिणेस दरवाजा नसावा. दक्षिणेकडील भिंतीला खेटून जड कपाट वा लाकडी फर्निचर करावे. अॅटॅच बाथरूम असल्यास ते उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावे. रंगसंगती आल्हाददायक असावी. गुलाबी, पोपटी अशी रंगसंगती निवडावी. प्रखर उजेड नसावा. खिडकीला पडदा लावावा. तो रंगसंगतीशी सांगड घालणारा असावा. वस्तू व्यवस्थित व आटोपशीर ठेवाव्यात. शयनगृहात प्रसन्न निसर्गचित्र, राधा-कृष्ण, शिव-पार्वती असे चित्र लावल्यास हरकत नाही. इतर प्रकारची चित्रे, कॅलेंडर्स टाळावीत. शयनकक्षातील ड्रेसिंग टेबलच्या अथवा कपाटाच्या आरशात पलंगावर झोपलेले असताना प्रतिबिंब दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. मुलांसाठीचे शयनगृह हे पश्चिम दिशेला असावे.

शयनगृहातील अंतर्गत सजावट मनमोहक असावी. अडगळीचे सामान १ नये. माळा असेल तर तेथे अडगळीचे सामान ठेवू नये. तुटलेल्या, फुटलेल्या, भग

वस्तू ठेवू नयेत. त्या फेकून द्याव्यात.

शौचालय : toilet कोठे आणि कसे बाधावे?

वास्तूच्या दक्षिण, पश्चिम भागात शौचालयाची व्यवस्था असावी. शौचकुपाची मांडणी अशी करावी की, बसताना तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असावे. नळ उत्तरेकडे असावा. शौचालयाचा दरवाजा पूर्वेला अथवा आग्नेय दिशेला उघडणारा असावा. दरवाजा सतत बंद असावा. साफसफाईचे सामान, अॅसिड, फिनेल, ब्रश वगैरेंसाठी दक्षिणेस व्यवस्था करावी. सेफ्टी टांक पूर्वेला किंवा उत्तरेला असाव कोंदटपणा होता कामा नये. हवा खेळती असावी. घरातील वृद्ध व्यक्तींना त्रार होईल अशी ती टाईल्स निसरड्या नसाव्यात. वृद्ध व्यक्ती शौचालय अथ । बाथरूमच्या न घसरून पडण्याची नेहमी शक्यता असते. त्यामुळे अस्थिव्यं होऊ शकतो.

अभ्यासिका : study room कोणत्या दिशेला आणि बाधकाम करताना हि काळजी घ्यावी?

अभ्यासिका पश्चिम दिशेला असावी. अभ्यासाचा टेबल असा मांडावा की

दक्षिण बसल्यावर अभ्यास करताना तोंड पूर्व, उत्तर अथवा ईशान्य दिशेला असले पाहिजे. देवाची अथवा सरस्वतीची तसबीर ईशान्य दिशेला लावावी. जड वस्तू व अनावश्यक अडगळीचे सामान अभ्यासिकेत नसावे. प्रकाश भरपूर आला पाहिजे. हवा खेळती पाहिजे.

अभ्यासिकेत शौचालय नसावे. पुस्तकांचे रॅक अथवा कपाट वायव्य किंवा नैऋत्येला ठेवावे. अभ्यासिकेतील रंगसंगती ही डोळ्यांना आल्हाददायक असावी भडक रंग वापरू नयेत. त्यामुळे अभ्यास करताना एकाग्रता होत नाही. एकाग्रतेसाठी वातावरण नेहमी प्रसन्न असावे. स्वच्छता व टापटीप असावी. अभ्यासिकेचा उपयोग । अभ्यासासाठीच करावा. तिला अडगळीची खोली व तत्सम दर्जा देऊ नये.

अभ्यासिका, अभ्यास आणि वास्तू :

अभ्यास ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक स्थिती असते. प्रत्येकाला अभ्यास हा कधी ना कधी तरी करावाच लागतो. कोणत्याही वास्तूंमध्ये अभ्यास हा कोणी ना कोणी तरी करीतच असतो. अभ्यासामुळे प्रगती होते. जीवनाला योग्य दिशा मिळते. म्हणूनच अभ्यासिका, अभ्यास करण्याची स्थिती हे महत्वाचे विषय ठरतात.

मुळातच शिक्षण हा महत्त्वाचा विषय असल्यामुळे त्यातील यश-अपयशाचा परिणाम घरातील वातावरणावर होत असतो.

अभ्यासिका ही मुख्य वास्तूमध्ये उत्तर ते पूर्व भागात असलेली उत्तम असते. या अभ्यासिकेत अशी व्यवस्था असावी की अध्ययन करताना तोंड नेहमी पूर्व दिशेस राहील अथवा ईशान्य दिशेस राहील. अभ्यासिका:

अभ्यासिकेत पूर्वेस खिडकी असल्यास अतिउत्तम. पूर्वेकडून येणारी सूर्यकिरणे मनावर सकारात्मक परिणाम करणारी असतात व त्यामुळे अभ्यास करण्यास मन प्रवृत्त होते. भरपूर प्रकाश येईल अशी मात्र व्यवस्था हवी.

वास्तूतील तिजोरीची व्यवस्था: धन पैसा घरात कोठे ठेवावा ज्यामुळे आपल्याला त्याचा उपयोग होईल?

वास्तूच्या उत्तर दिशेला तिजोरीची व्यवस्था करावी. तिजोरीची पाठ दक्षिणेला असावी व ती उत्तरेकडे तोंड करून उघडणारी असावी. ‘कबेर’ हा उत्तर दिशेचा दिशापालक आहे हे लक्षात घ्यावे. तिजोरीच्या खोलीस पूर्व वा उत्तर दिशेला दार असावे. तिजोरीसाठी स्वतंत्र खोली नसल्यास व तिजोरी नसल्यास दणकट कपाट तिजोरी म्हणून वापरावे. मात्र हे कपाट वरील नियमाप्रमाणेच ठेवावे.

तिजोरीतील मौल्यवान वस्तू, सोने, दागिने, नाणी पश्चिम दिशेला ठेवावीत. तिजोरीवर, अथवा कपाटावर, जड सामान ठेवू नये. आसपासच्या भिंतीवर जाळे लागू देऊ नये. जळमटे साफ करावीत. वास्तूच्या प्रवेशद्वारासमोर व इतर कोणत्याही दारासमोर तिजोरी नसावी. तिजोरीवर बाह्य व्यक्तींची दृष्टी पडता कामा नये. तिजोरीसमोर देवदेवतांच्या तसबिरी नसाव्यात. बीमखाली तिजोरी ठेवू नये.

जीना : जिना ची दिशा कोणत्या ठिकाणी असावा ?

वास्तूच्या दक्षिण, वायव्य अथवा नैऋत्य कोपऱ्यात जिन्याची रचना असावा. जीना नेहमी पश्चिमेस किंवा दक्षिणेस चढत जाणारा असावा व जिन्याचा उतार पूर्व अथवा उत्तर दिशेला असावा. जिन्याची पायऱ्यांची संख्या ही विषम संख्या घ्यावी. जस की, ९, ११, १३, १५, १७ वगैरे. जीना शक्यतो चौकोनी आकाराचा करावा. त्यातही दोन टप्प्याचा जिना असावा. गोल, चक्राकार असे जिने करू नयेत.जिन्याखाली देवघर कधीही नसावे. अभ्यासाचा टेबल, पुस्तकांचा रॅक वा डायनिंग टेबल जिन्याखाली नसावे. जीना चढण्या-उतरण्यास योग्य व सहज सुलभ असावा. जिन्यात घसरण निर्माण होणार नाही याची योग्य ती काळजी घ्यावी.

घरातील ब्रह्मस्थान : एक महत्त्वपूर्ण संकल्पना : ब्रम्हा स्थान म्हणजे काय? कोणत्या स्थानाला ब्रम्हा स्थान म्हणतात?

वास्तुशास्त्रात ब्रह्मस्थानाला फार महत्त्व आहे. ब्रह्मस्थान म्हणजे वास्तूचा मध्यबिंदू अथवा मध्यभाग. वास्तुशास्त्रानुसार वास्तूचा हा मध्यभाग अथवा मध्यबिंदू नेहमी मोकळा असला पाहिजे. तिथे कोणतेही दालन अथवा वस्तू ठेवलेली नसावी. कोणतीही भिंत, शौचालय, स्नानघर नसावे. ब्रह्मस्थान हे पूर्णपणे स्वच्छ, प्रकाशमान, अडगळरहित, साफ, मोकळे पाहिजे. ब्रह्मस्थान साफ, मोकळे पाहिजे. ब्रह्मस्थानात कोणतीही जड वस्तू, भिंत, तुळई, खांब नसावा. खड्डाही नसावा. हे स्थान संपूर्णपणे मोकळं हवं. आपणास माहिती असेलच की पूर्वी अशा पद्धतीने घरं बांधली जायची की वास्तूचा बरोबर मध्यभाग हा मोकळा असायचा. तेव्हा घरच नव्हे तर मंदिरे, गावं, नगर, पेण अशाच पद्धतीने बांधली जात असत. या हवेशीर खुल्या मध्यभागात कुटुंबातील सर्व सदस्य बसत. जसे जगण्यासाठी अन्न, पाणी, हवा लागते तसे वास्तूलाही दिशांचे अधिष्ठान लागते. वास्तुशास्त्रीय पद्धतीची वास्तू निश्चितच सौख्यदायी परिणाम देते. ब्रह्मस्थानाची योग्य निगा घेतली गेली पाहिजे. हे स्थान जर दोषयुक्त झाले, तर गंभीर स्वरूपाचा वास्तुदोष निर्माण होतो व त्याची अशुभ फळं मिळतात.

आपल्या वास्तु, घर, फक्ट्री

आपल्या वास्तु, घर, फॅक्टरी याबदल काही प्रश्न असतील तर खालील फॉर्म भरून आपला प्रश्न विचारावा…

Ask any query to vastuvisheshyagya

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *