|

Bhartat disnare Chabndra Grahan

: Bhartat disnare Chabndra Grahan

Chabndra Grahan ani kojagiri pornima 28 Oct. 2023 | खंडग्रास चंद्रग्रहण आणि कोजागिरी पोर्णिमा कशी साजरी करावी ?


खंडग्रास चंद्रग्रहण

आश्विन शु. १५,दि. २८ ऑक्टोबर शनिवार रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री खंडग्रास चंद्रग्रहण आहे .

👉ग्रहण स्पर्श -रात्री १:०५

👉ग्रहण मध्य – रात्री १.४४

👉ग्रहण मोक्ष -रात्री २.२३

👉ग्रहण पर्वकाल – १ तास २८ मि.चा आहे.
( संदर्भ दाते पंचांग )

हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.
👉ग्रहण दिसणारे प्रदेश – भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण अफ्रिका खंड या प्रदेशात ग्रहण दिसणार आहे.

👉पुण्यकाल – ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंत पुण्यकाळ आहे.

👉ग्रहणाचा वेध* -हे ग्रहण रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्याने ३ प्रहर आधी म्हणजे शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:१४ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. बालक, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी शनिवारी सायंकाळी ७:४१ पासून वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इ. करता येतील, तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजे १:०५ ते २:२३ या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत.

🙏ग्रहणातील कृत्ये🙏

ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे.पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध , जप, होम, दान करावे.पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चेदग्रहणात करावे, ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये पर्वकालामध्ये झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन, व कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते.

🙏ग्रहणाचे राशिपरत्वे फल🙏

मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशीना🚩 शुभफल.🚩
सिंह, तुला, धनु, मीन या राशीना 🚩मिश्रफल.🚩
मेष,वृषभ, कन्या आणि मकर या राशीना 🚩अनिष्ट फल आहे.🚩
ज्या राशींना अनिष्ट आहे त्या राशीच्या व्यक्तीनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.

*🙏कोजागिरी व ग्रहण🙏

👉यावर्षी २८ ऑक्टोबर २०२३ रोजी शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच चंद्रग्रहण आल्यामुळे रात्री १:०५ मि. ते २:२३ असा ग्रहणाचा पर्वकाल आहे . त्यापूर्वीच्या वेधकाळात म्हणजे संध्याकाळ पासून रात्री १:०५ मी.पर्यंत प्रतीवर्षीप्रमाणे रात्रीचे वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवता येईल . मात्र प्रसाद म्हणून केवळ एक पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे . राहिलेले दूध दुसरे दिवशी घेता येईल . मात्र दूध झाकून ठेवून त्यावर तुळशीपत्र ठेवावे .

👉ज्यां गर्भवतींना या काळात नियम पाळायचे असतील त्यांच्यासाठी

👉नियम :-
१) या काळात कापणे , चिरणे , पिळणे व शिवणे पूर्ण बंद ठेवावे .
२) पायाची अढी घालून बसू नये .
३) पाणी पितांना त्यात तुळशीपत्र घालून प्यावे .
४) झोप घेऊ नये .
५) शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे .

वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन नांदेड.
मो.7588363518

  • vedashree jytish
  • Screenshot 20230108 191753
  • Screenshot 20230108 191734
  • Screenshot 20230108 191717
  • Screenshot 20230108 191649
  • Screenshot 20230108 191605
  • Makar Sankranti | मकरसंक्रांती 2023 कशी आहे मकरसंक्रांती या वर्षीची
  • shani dev
  • Whatsapp Image 2022 06 30 At 3.33.36 Pm
  • Whatsapp Image 2022 06 14 At 10.48.35 Pm
  • Whatsapp Image 2022 04 29 At 3.04.04 Pm
  • Whatsapp Image 2022 03 14 At 12.08.17 Pm
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.22 Pm 3
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.21 Pm 3 2
  • Whatsapp Image 2022 03 09 At 11.12.07 Pm
  • Whatsapp Image 2022 03 03 At 6.41.35 Pm 1
  • Whatsapp Image 2022 03 03 At 6.41.35 Pm
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.22 Pm 2
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.21 Pm 3 1
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.21 Pm 2 1
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.21 Pm (2)
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.21 Pm (3)
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.22 Pm
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.22 Pm (1)

Similar Posts

  • घटस्थापनेचे शुभ मुहूर्त

    घटस्थापनेचे शुभ मुहूर्त !!! गुरुवार दि. ०३/१०/२४ रोजी घटस्थापना आहे.गुरुवार दि.०३/१०/२०२४ रोजी सूर्योदयापासून दिवसभर प्रतिपदा तिथी आहे.गुरुवार दि. ०३/१०/२४ रोजी हस्त नक्षत्र दु.०३:३१ पर्यंत आहॆ नंतर चित्रा नक्षत्र आहे.घटस्थापना करण्याकरीता सकाळच्या वेळेस योग्य मुहूर्त आहे.गुरुवार दि. ०३/१०/२३ रोजी घटस्थापना सकाळीचे मुहूर्त:- चंचल मुहूर्त:- स. ८:०० ते ९:३० पर्यंत.लाभ मुहूर्त:- स. ९:३० ते ११:०० पर्यंत.अमृत मुहूर्त:-…

  • | | |

    श्री पांडुरंगाष्टकम्

     श्री पांडुरंगाष्टकम्   महज्ञायोगपीठे तटे भीमरथ्या। वरं पुंडरीकाय दातुं मुनिद्रैः ।। समागत्य तिष्ठतमानंदकंदं । परब्रम्हलिंगं भजे पांडुरंगम् ।।१।। तडिद्वससं नीलमेघवभासं। रमामंदिरं सुंदर चित्प्रकाशम् ।। वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं। परब्रम्हलिंगं भजे पांडुरंगम् ।।२।। प्रमाणं भवाब्धेरिंद मामकानां। नितंब: कराभ्यां धृतो येन तस्मात् ।। विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः। परब्रम्हलिंगं भजे पांडुरंगम् ।।३।। स्फुरत्कौस्तुभालंकृतं कंठदेशे। श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् ।। चिवं शान्तमीड्यं…

  • | |

    शनि व साडेसाती 2025 तुमच्या राशी वरती होणारा प्रभाव ?

    shani dev sadesati 2025 शनिपालट व साडेसाती तुमच्या राशी वरती होणारा प्रभाव ?शनिपालट  केव्हा  ?साडेसाती म्हणजे काय ?..साडेसातीत काय काळजी घ्यावी. ?   फाल्गुन कृष्ण.आमावस्या शनिवार २९ मार्च २०२५ रात्री  ०९:४२ मी शनी मीन राशीत प्रवेश करीत आहेत 

  • |

    Vastu

    भवन में सबसे पहले दीवारो की ओर ध्यान देना चाहिए। दीवार सीधी, प्रत्येक कोण ६० डिग्री का होना चाहिए। कमरों में रोशनी हवा का पूरा ख्याल रखते हुए खिड़कियों एवं सामान रखने के लिए आलमारी आदि का निर्माण करना चाहिए। भवन में विभिन्न कक्षों की वास्तु अनुरूप स्थिति निम्नलिखित स्थिति में होना चाहिए।

  • Problem Solving Solution | समस्याओं से मुक्त होने के आसान तरीके !

    समस्याओं से मुक्त होने के आसान तरीकेः व्यावहारिक समाधान | Problem Solving Solution जीवन कभी-कभी भारी महसूस कर सकता है, जैसे कि आप कीचड़ भरे खेत में फंस गए हों। चाहे वह तनाव हो, नकारात्मकता हो, या अन्य बोझ हों, बोझ को हल्का करने का सही तरीका खोजना महत्वपूर्ण है। यहाँ, हम सरल और प्रभावी…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.