शीघ्र विवाह योग उपाय

शीघ्र विवाह योग उपाय

शीघ्र विवाह योग उपाय

शीघ्र विवाह योग उपाय

बुधवारचे गणपती व्रत

ज्यांचा विवाह लवकर होत नाही अशा मुला-मुलीने हे बुधवारचे गणपती व्रत अवश्य करावे. या व्रतामुळे विवाह ठरण्यास अडथळे येत नाहीत व विवाह त्वरीत होतो. हा उपाय अत्यंत सोपा आहे..

कोणत्याही शुभ मुहूर्तावर बुधवारी एका ताटामध्ये स्वस्तिक चिन्ह कुंकवाने काढावे. या स्वस्तिकवर मातीचा गणपती किंवा गणपतीची लहान मूर्ती ठेवून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी. याला पार्थिव गणेश असे म्हणतात. १०८ दूर्वाच्या जुड्या ११ कराव्यात

गणपतीला ताम्हण मध्ये ठेवून पाणी पंचामृत पुन्हा चांगले पाणी वाहून अभिषेक करावा व गणपतीला स्वच्छ पुसून गंध अक्षता फूल वाहावे नंतर गणपतीला पुढे सांगितल्याप्रमाणे दूर्वा वाहाव्यात दूर्वा अकराशे मिळाल्या तर ठीक अन्यथा अकराशे दुर्वा नाही मिळाल्या तर 108 दुर्वा अर्पण करून सबंध लाल अक्षदा गणपतीला मंत्र म्हणत म्हणत एकेक अक्षदा व्हावी.

“ॐ गं गणपतये नमः” हा मंत्र म्हणत म्हणत एक एक दूर्वा गणपतीला वहावी. या दूर्वा संपल्या की मंत्र तेथेच संपवावा. गणपतीची आरती करावी व मोदकांचा नैवेद्य दाखवावा. आणि गणपतिला शीघ्र विवाह योग यावा अशी प्रार्थना करावी. त्या दिवशी साधकाने बुधवार चा उपवास करावा. फराळात दूध, केळी, ऋतुफळे खावीत, मीठ खाऊ नये. सायंकाळी सूर्यास्तानंतर गणपतीची पूजा-अर्चा आरती आणि नैवेद्यार्पण करुन उपवास सोडावा. मीठाचा वापर करु नये. हा उपाय प्रत्येक बुधवारी नियमाने करावा. समजा काहीं अडचणी येत असतील किंवा बाहेर गावी जायचे असेल तर मुला-मुलीच्या जवळच्या नातेवाईकांने हा उपाय करत रहावे. खंडीत करु नये. साधारण तीन महिन्यातच शीघ्र विवाह ठरतो असा अनुभव आहे.

Similar Posts

  • adhik mas kay karave ani kay nahi

    अधिक मास (मलमास) विशेष 🕉 ✦ ❧ ✦ अधिक मास (मलमास) विशेष काय करावे · काय टाळावे · दान-श्राद्ध नियम ✦ ❧ ✦ 🙏 पुरुषोत्तम मास म्हणजे भगवान विष्णूंना समर्पित अत्यंत पवित्र महिना. या महिन्यात योग्य आचरण, दान आणि भक्ती यांद्वारे विशेष पुण्य प्राप्त होते. शास्त्रानुसार कोणती कार्ये करावीत आणि कोणती टाळावीत, याचे संपूर्ण मार्गदर्शन…

  • |

    Kaalsarpa dosh

    Kaalsarpa dosh | आपल्या कुंडलीत कालसर्प दोष आहे का? याचे परिणाम कसे होतात आणि त्या परिणाम ला कसे कमी करावे?जेव्हा लग्नामध्ये राहु व सप्तम भावामधे केतु असेल आणि त्याच्यामधे सर्व अन्य ग्रह असतील तर तो अनंत काळसर्प योग होतो. या अनंत काळसर्प योगाच्या जातकाला जीवनभर मानसिक शांतता मिळत नाही. तो सदैव अशांत, क्षुब्ध, गोंधळलेला, अस्थिर राहतो. बुध्दीहीन होऊन जातो

  • कंजुष कदर्याची कथा

    अध्याय २९ – कंजुष कदर्याची कथा वाल्मिकी मुनी निघून गेल्यावर दृढधन्वा राजा आणि गुणसुंदरी राणी यांनी खूप विचार केला तेव्हा राजा म्हणाला, “मी आता है सगळे राजवैभव सोडून तपोवनात जातो. तेथे तपश्चर्या करून माझ्या जन्माचे सार्थक करतो.” राणी म्हणाली, “मग मी ह्या राजवाड्यात राहून सुनांच्या हाताखाली कुत्रीप्रमाणे जीवन कंठू, की काय? महाराज, जेथे पती तेथे…

  • Satynarayan Vrat Katha

    Satynarayan Vrat Katha ॥ श्री सत्यनारायण व्रत कथा ॥ ॥ श्री सत्यनारायण व्रत कथा ॥ Satynarayan Vrat Katha ॥ श्री सत्यनारायण व्रत कथा ॥ भगवान श्री सत्यनारायण भगवान को प्रसन्न करने केलिए , बंधनसे मुकत्ती, विवाह योग केलिए,श्री सत्यनारायण भगवान की हर month मे पोरणिमा के दिन श्री सत्यनारायण जी की पूजा करनी चाहिए |…

  • भृगु संहिता bhrugu sahita jyotish

    भृगु संहिता से भविष्य जाना जाता है ! bhrugu sahita भृगु सहित क्या है ? bhrugu sahita भृगु संहिता का ज्ञान एक बहुत ही पुराना ग्रंथ के रूप में भृगु ऋषि ने लिखा था। बताया जाता है कि भृगु ऋषि दुनिया के हर आदमी और औरत की कुंडली उसके अंदर थी। जो भी मानव धरती…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.