|

सुंदर दत्त गुरूंची कथा | Gurucharitra ki katha

swami samartha

गुरूचरित्राचे पारायण सोहळा करायचा आहे तर कथा/ story नाकी वाचा| gurucharitra ki katha

गोविंदरावांच्या समाराधनेच कौतुक हा गावातल्या गप्पांचा नेहेमीचा विषय ,नित्य अन्न संतर्पण होत असे . दुपारी बारा वाजता पहिली पंगत बसली कि चार वाजून जाईस्तोवर पंगती सुरूच असत. स्वतः गोविंदराव पंगतीत फिरून सावकाश होऊ द्यात म्हणत असत . मोठे दत्त भक्त असा गोविंदरावांचा लौकिक होता . दत्त महाराजांच्या कृपेने मला काही कमी पडलं नाही तेव्हा मी देखील दानधर्मात काही कमी करणार नाही हा त्यांचा विचार असे .
पंगतीत दत्त महाराजांची पदे म्हटली जात आणि अनेकदा स्वतः गोविंदराव गुरुचरित्रातील एखादा कथाभाग पंगतीत येऊन सांगत असत . त्याच गावी एक अत्यंत गरीब अशी म्हातारी राहत असे . फाटक तुटक नेसून ती त्या वाडयाच्या दाराशी येऊन बसे ,सर्व पंगती झाल्यावर उरलेले पदार्थ ती घेऊन जात असे .ती अन्न घेऊन जाताना नेहेमी म्हणे अरे दोघाना पुरेल इतकं दे रे बाबा . ती झोपडीत एकटीच राहणारी मग दुसरा कोण हा प्रश्नच असे .असेल कोणा प्राण्यासाठी म्हणून सर्व दुर्लक्ष्य करीत .Gurucharitra ki katha


ती झोपडीत आल्यावर दार लावून घेत असे . झोपडीत एक जीर्ण अशी दत्त महाराजांची तसबीर होती . दत्त महाराजांना त्या अन्नाचा नैवेद्य दाखवीत असे ,म्हणे दत्ता ,दमला असशील ! ये S खा दोन घास माझ्या बरोबर . एक मंद अशी चंदन सुगंधाची झुळूक त्या झोपडीत शिरे . एक दिवस चुकून दार लावायला म्हातारी विसरली आणि हे सर्व एका मनुष्याने पाहिले . त्याने ताबडतोब हि बातमी गोविंरावांपर्यंत पोहोचवली . आपल्या अन्नातील उरलेल्या अन्नाचा नैवेद्य दत्त महाराजांना ??? हि कल्पनाच त्यांना सहन होईना .

श्री दत्त महाराज
श्री दत्त महाराज


त्यांनी त्वरित मुदपाकखान्यातील सर्व सेवकांना फर्मान सोडले ,उद्यापासून त्या म्हातारीला काहीही देऊ नये .झाले — म्हातारीला दटावून सेवकांनी हाकलून दिले . आपल्याला खायला काही नाही पेक्षा दत्त उपाशी या जाणिवेने म्हातारी कळवळली .इकडे दत्त महाराजांची नित्य पूजा करणाऱ्या पुजारी वर्गाला त्याच रात्री दत्त महाराजांचा दृष्टांत झाला ,अरे मला उपवास घडतोय ,त्या गोविंदाला जाऊन सांग .गोविंदरावांना हा दृष्टांत निरोप मिळाला ,त्यांनी पुजारी आणि सेवक वर्गाला विचारले ,काल नैवेद्य होता ना ? हो असे उत्तर सर्वांकडून मिळताच ते विचारात पडले .


दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच दृष्टांत आणि ह्या खेपेस दत्त महाराजांची मुद्रा क्रोध व्याप्त अशी . सकाळ होण्याची वाट न बघता पुजारी रात्रीच धावत वाड्यात आला . घामाने ओलाचिंब आणि अत्यंत घाबरलेला . हा काय प्रकार असावा हे जाणून घेण्यासाठी गावातील सर्वाना सकाळी गोविंदरावांनी बोलावणे केले तेव्हा तो म्हातारीच्या नैवेद्याची बातमी देणारा मनुष्य दिसला . तात्काळ काही तरी उमगून गोविंदरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ,ते तडक म्हातारीच्या झोपडीकडे गेले . उपवासाने क्षीण अशा अवस्थेत म्हातारी निजूनचं होती . तिचे पाय अश्रुनी धुवत गोविंदराव म्हणाले ,आजपासून नित्य नैवेद्य दाखवत जा . झोपडीतील जीर्ण दत्त महाराजांच्या तसबिरीत एक बदल मात्र झाला होता . महाराजांच्या चेहेऱ्यावर मोहक हास्य दिसत होते .

श्रीगुरुदेव दत्त !!!—अभय आचार्य

Similar Posts

  • नर वानराचा उध्दार

    भगवान नारायण नारद मुनींना म्हणाले, “नारदा, यमराजाने कदर्याला चित्रगुप्ताच्या सल्ल्याने लोभी आणि कंजुषपणाचे फळ म्हणून राक्षस योनीत फिरण्याची घोर शिक्षा दिली. आणि त्यानंतर बागेत फळे चोरुन खाल्ली व मित्राचा विश्वासघात केला म्हणून वानर योनीत | राहन रानावनात भटकत राहण्याची शिक्षा दिली.

  • Disha | Direction

    Disha दिशाओं की पहचानया दिशेची अधिपती देवता इंद्र आहे. इंद्राची पत्नी शची देवी, निवास स्थान अमरावती, वाहन ऐरावत (पांढरा हत्ती), आयुध वज. द्वारपाल नंदी व चंद्र पूर्व दिशा ही ऐलक्ष्मीस्थान आहे. या दिशेला पांढऱ्या रंगाचे अधिपत्य असते, अधिपती ग्रह सूर्य व रास मेष व वृषभ आहे.

  • | | |

    श्री पांडुरंगाष्टकम्

     श्री पांडुरंगाष्टकम्   महज्ञायोगपीठे तटे भीमरथ्या। वरं पुंडरीकाय दातुं मुनिद्रैः ।। समागत्य तिष्ठतमानंदकंदं । परब्रम्हलिंगं भजे पांडुरंगम् ।।१।। तडिद्वससं नीलमेघवभासं। रमामंदिरं सुंदर चित्प्रकाशम् ।। वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं। परब्रम्हलिंगं भजे पांडुरंगम् ।।२।। प्रमाणं भवाब्धेरिंद मामकानां। नितंब: कराभ्यां धृतो येन तस्मात् ।। विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः। परब्रम्हलिंगं भजे पांडुरंगम् ।।३।। स्फुरत्कौस्तुभालंकृतं कंठदेशे। श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् ।। चिवं शान्तमीड्यं…

  • अमावस्या शांती साहित्य

    अमावस्या शांती साहित्य अमावस्या साहित्य लिस्ट अमावस्या शांती पूजा , ज्या व्यक्तीचा जन्म अमावस्या तिथी वरती झाला असेल त्या व्यक्तीस शांती जनन शांती असते . हि शांती पुंजा ब्रम्हाना च्या मदतीने करावी. या पूजे मध्ये 5 चौरंग मांडावे लागतात त्या मध्ये. गणेश पूजन , मातृका पूजन ( कुलदेवते चे पूजन )माख्या देवता चांदी च्या किवा…

  • How Saraswati Yoga Enhances Creativity and Knowledge in Your Horoscope”

    How Saraswati Yoga Enhances Creativity and Knowledge in Your Horoscope ज्योतिष में सरस्वती योग: बुद्धि, कला और विद्या का दिव्य वरदान ! Saraswati Yoga 🪔 माँ सरस्वती कौन हैं? Saraswati Yoga माँ सरस्वती को हिंदू धर्म में ज्ञान, संगीत, वाणी, कला, शिक्षा और विवेक की अधिष्ठात्री देवी माना गया है। वे ब्रह्मा जी की शक्ति…

  • |

    Will I Marry My Love? | प्रेम विवाह होगा क्या?

    आपने जीवन मे प्रेम जरूर होता है | किसिका School प्रेम होता है, या Collage प्रेम होता है | या जॉब दोने साथ करते है , उसी समय प्रेम (Love) हुवा . ए सभी व्यक्ति के जीवन में होता है | हम जिसे प्रेम करते है उसीसे शादी भी करना चाहते है | यही हम…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.