Rashi fal 2024 2023 2022

Vrushbh Rashi | वृषभ राशीसाठी 2023 कसे असेल.

rashi-removebg-preview

चैत्र:- तरुणांना अतिशय सुंदर ग्रहमान शैक्षणिक संधी. सामाजिक पतप्रतिष्ठेचा लाभ. नौकरीत अपवादात्मक भाग्योदय. पौर्णिमेजवळ मोठ्या सुवार्ता. व्यावसायिक गुंतवणुकींतून लाभ. सूर्यग्रहणाजवळ प्रवासात सांभाळा.

वैशाख:- शुक्रभ्रमण पूर्वार्धात मोठे सांपत्तिक लाभ देईल. व्यावसायिक वसुली. चंद्रग्रहणाजवळ मातृपितृचिंता. उत्तरार्धात भावाबहिणींचे भाग्योदय. पर्ती वा पत्नीचा उत्कर्ष. अमावास्या घबाडयोगाची. मोठे लाभ.

ज्येष्ठः- मध्यस्थी टाळा. सार्वजनिक जीवनात आचारसंहिता पाळा. उत्तरार्धात मंगळशुक्र सहयोग तरुणांना धार्जिणाच. कलागुणांतून भाग्योदय. परियचोत्तर विवाह. अमावास्येजवळ चैनीवर खर्च. सहकुटुंब प्रवास. अनपेक्षित गाठीभेटी.

आषाढ:- पूर्वार्धात परिस्थितीचे पाठबळ राहणार नाही. पौर्णिमेनंतर वैयक्तिक सुवार्ता. घरात उंची खरेदी. पुत्रोत्कर्षातून धन्यता. वास्तुविषयक खरेदीविक्रीतून लाभ. अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात दुखापती जपा.

अ. श्रावण:- शनिमंगळाच्या प्रतियुतीचे एक फील्ड राहील. वादग्रस्त प्रकरणे चिघळू शकतात. काहींचे नोकरीतील स्थित्यंतर अस्वस्थता वाढवेल. बाकी पौर्णिमा शुक्रभ्रमणातून वैयक्तिक सुवार्तातून धन्यतेची. अमावास्या भातृचिंतेची. नि. श्रावण:- रविशनि प्रतियुतीचा अंमल पौर्णिमेपर्यंत राहील. घरात कोणाची आजार वा शस्त्रक्रीया. उत्तरार्धात गुरुशी होणारे शुभयोग संकटविमोचनाचे. तरुणांचे स्पर्धात्मक यश. अमावास्या गुप्तचितेची.

भाद्रपदः- पूर्वार्ध तरुणांना शैक्षणिक संधी देणारा. परदेशी भाग्योदय. शुक्रभ्रमण पौर्णिमेजवळ कलाकारांना प्रकाशात आणणारे. नूतन वास्तुप्रवेश. उत्तरार्ध शंकास्पद आर्थिक व्यवहाराचा. सूर्यग्रहणाजवळ गर्भवतींनी जपावे.

आश्विनः- विरोधी ग्रहस्थिती राहील. उधारउसनवारी सांभाळा. व्यावसायिक जुगार टाळा. सरकारी नियम पाळा.. मात्र गुरुशुक्राचा शुभयोग स्वतंत्र व्यावसायिकांना छानच. वैवाहिक जीवनात भाग्योदय मात्र विवाहेच्छुनी प्रेमप्रकरणात गुंतू नये. चंद्रग्रहण कुसंगतीचे.

कार्तिक:- शनिमंगळांचे योग कुरापती काढणारे. अपवादात्मक परिस्थितीचे भान ठेवून नियोजन करा. नोकरीत वरिष्ठांशी नमते घ्या. उत्तरार्ध बुधगुरु योगातून तरुणांच्या शैक्षणिक चिंता घालवेल. खरेदीविक्रीतून लाभ होईल.

मार्गशीर्ष:- मंगळाशी होणारा बुधाचा योग तारुण्यातील प्रश्न निर्माण करेल. प्रेमप्रकरणातील नैराश्य टाळा. पौर्णिमेजवळ व्यावसायिक जुगार टाळा. उत्तरार्धातील शुक्रभ्रमण सर्वंकष फलदायी होईल. नोकरीत प्रसन्नता लाभेल. अमावास्या चोरीची.

पौषः- पूर्वार्धात मंगळबुधाची स्थिती मनाविरुद्ध घटना घडवणारी. संयम ठेवा. वैवाहिक जीवन सांभाळा. उत्तरार्ध व्यावसायिक आडाखे यशस्वी करणारा. कर्जप्रकरणातून मुक्त व्हाल. विशिष्ट ग्रासलेली चिंता दूर होईल.

माघः- अतिशय छानच महिना. स्वतंत्र व्यावसायिकांचे उपक्रम यशस्वी होतील. पौर्णिमा जीवनातील मोठ्या सुवार्ता देणारी. मंगळशुक्र सहयोग विवाहयोगाचा. उत्तरार्ध नोकरीत त्रासाचा. वरिष्ठांचा विरोध.

फाल्गुन:- शुक्रशनि सहयोग व्यावसायिक महत्वाच्या कामांतून फलदायी होईल. वादग्रस्त व्यवहारांतून सुटका. नोकरीतील विशिष्ट सावट जाईल. चंद्रग्रहणाजवळ गर्भवतींनी सांभाळावे. उत्तरार्ध मित्रसंगतीतून अडचणींचा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *