Jivanoopayogi Todga

जीवन उपयोगी उपाय | Jivanoopayogi Todga

(१) आपण रस्त्यावर अनेक वेळेला जोडपी चालताना पाहतो. अशा वेळी त्यांच्यामधून जाऊ नका. पत्नीशी अगर पतीशी वितुष्ट येण्याची शक्यता असते असा हा संकेत आहे.

(२) आपल्याकडे अनेक वेळेला पाहुणे येतात. जेवणाच्या वेळी अनेक भगिनी अगोदर पतीला अगर घरातील माणसाला पदार्थ प्रथम वाढते ही चूक आहे. प्रत्येक पदार्थ आधी पाहुण्याला वाढून नंतर घरातील इतर मंडळींना वाढावा.

(३) अनेक वेळेला परक्या ठिकाणी जेवणाचा प्रसंग येतो. अपरिचित घरचे अन्न दूषित आहे असे गृहित धरून जेवणाला सुरुवात करण्याच्या अगोदर डोळे मिटून ताटाला नमस्कार करावा व “ॐ नमो” अग्नये नमः हा मंत्र एकदाच म्हणावा. अन्नदोष जातो व काहीही त्रास होत नाही.
(४) रात्री केर काढल्यावर तो घराबाहेर टाकू नये. तसाच कोपऱ्यात ठेवावा. सकाळी तो केर नीट पाहून नंतर बाहेर टाकावा. एखादी लहान वस्तू केराबरोबर जाण्याची शक्यता असते. एक दिवस माझ्या पूजेतील गणपतीची अगदी लहान मूर्ती अशीच चुकून निर्माल्याबरोबर केरात गेली. सकाळी केर पाहताच ती सापडली.

(५) झोपताना दक्षिण दिशेकडे तोंड करून झोपावे. पूर्व-पश्चिम झोपल्यामुळे झोप स्वस्थ लागत नाही. या कल्पनेशी लोहचुंबकत्वाची कल्पना आहे इतकेच ध्यानात ठेवावे.
(६) अनेक व्यक्ती प्राणायाम, त्राटक, ध्यान वगैरे क्रिया करून मन

एकाग्र करण्याचा प्रयत्न करतात. मनाच्या अतिशय एकाग्रावस्थेत डोळ्यापुढे
अनेक तऱ्हेची दृश्ये अगदी स्पष्ट दिसतात. रंग तपकिरी असतो. अशी दृश्ये दिसू लागताच मनात एखादी इच्छा आणावी. ती १-२ दिवसांत पूर्ण झाली तरच त्या वेळी मन एकाग्र झाले होते असे खुशाल समजावे. अन्यथा नाही. मी एकदा अशा अवस्थेत असताना चिवडा मिळण्याची व दुसऱ्या वेळी तूप मिळण्याची इच्छा केली. आश्चर्य म्हणजे अगदी दोन्ही वेळेला मला पाहुण्यांनी त्या वस्तू लगेच दुसऱ्या दिवशी आणून दिल्या.

(७) सत्पुरुषाच्या दर्शनास (बाबालोकांच्या नव्हे) जाताना एखादे फळ व १-४ सुवासिक फुले अवश्य न्यावीत. त्याला नमस्कार करून वरील वस्तू त्याच्यासमोर ठेवाव्यात. पैसे वगैरे ठेवू नयेत. खऱ्या सत्पुरुषाला पैसे घेणे बिलकूल आवडणार नाही.

(८) एखाद्या वेळेला संताप अनावर झाला तर त्या वेळी भूतकाळातील एखादा विनोदी प्रसंग आठवावा. रागावर हा प्रभावी उतारा ठरतो. हे सर्व रेडिओचे सेंटर बदलण्यासारखे होते. रागावर हा रामबाण इलाज आहे.

(९) रात्री झोपण्याच्या अगोदर दातांना बारीक मीठ लावावे. नंतर गुळण्या करून झोपावे. परत काही खाऊ नये. यामुळे दात किडत नाहीत व शेवटपर्यंत भक्कम राहतात.

(१०) सकाळी घराचे पुढील दार केव्हाही बंद करू नये. असे करणे अशुभ मानतात. घरातील माणूस निधन पावल्याची ही खूण असते. (११) गरोदर स्त्रीने स्वनात हत्ती, वडाचे झाड अगर पोपट पाहिला

तर तिला सुलक्षणी व दीर्घायुषी पुत्र होतो हे त्रिवार सत्य. (१२) जेवत असताना काही वेळेला एखादा भिकारी दाराशी येतो व भीक मागू लागतो. अशा वेळी काय असेल ती चतकोर अर्धी त्याला वाढावी. “अतिथी देवो भव” अशी वेदाची आज्ञा आहे.
(१३) आजकाल जागेच्या अडचणीमुळे भगिनी मासिक विटाळ पाळीत नाहीत. त्यांनी पाचव्या दिवशी हातात थोडीशी राख घेऊन “ॐ चैतन्य नवनाथाय नमः” हा मंत्र अकरा वेळेला म्हणून सर्व ठिकाणी उडवावी. घर शुद्ध होईल. ती राख

(१४) अभ्यास सुरू करण्याअगोदर ५-१० मिनिटे स्वस्थ बसून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. अभ्यास संपल्यावर लगेच एक मेणबत्ती पेटवून ज्योती त्राटक सुमारे १० मिनिटे करा. अभ्यास पूर्ण लक्षात राहील.

(१५) कोणत्याही महत्त्वाच्या कामाला निघाला म्हणजे परत फिरू नका, काम न होण्याची ती अंतर्मनाने दिलेली सूचना आहे असे खुशाल समजा. हे काम परत दुसऱ्या दिवशी करावे.

(१६) पुस्तके, मासिके वगैरे दुसऱ्याला देऊ नका. ती परत येणार नाहीत अशी खूणगाठ बांधा. इतर व्यक्ती आपल्या पुस्तकाची काळजी घेत नाहीत. मी परवाच एका मित्राला माझे पुस्तक वाचावयाला दिले होते. ते मागण्यासाठी मला त्याच्या घरी जावे लागले. घरी जाऊन पाहतो तो त्याचे बालराजे ते पुस्तक पुढे घेऊन चक्क फाडीत होते. मी संतापून त्याच्या हातून ते पुस्तक घेऊ लागलो तो मातोश्री कडाडल्या, “अरे अनिल, देऊन टाक ते भिकार पुस्तक त्यांना आपण नवीन छान छान पुस्तक आणू.” अशी आहे माझी व माझ्या पुस्तकाची विटंबना.

(१७) स्नानाच्या वेळी आपल्या इष्टदेवतेचा जप अवश्य करा. वेळ सार्थकी लागतो. यासाठी गायत्री मंत्र अगर “ॐ हीं सूर्यायनमः” हे मंत्र उत्तम आहेत. जप मात्र न मोजता मनातल्या मनात करावा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *