Gurucharitra | गुरुचरित्र

7 दिनों में गुरु चरित्र कैसे पढ़ा जाए? | Gurucharitra

Download (3)

॥ श्रीमत् गुरुचरित्र ॥

॥ गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचे प्रारंभी करावयाचा संकल्प |

Images (2)

प्रथम दोन वेळा आचमन करावे – ॐ श्रीमन्महागणाधिपतये नमः । इष्टदेवताभ्यो नमः । कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः । श्रीपादश्रीवल्लभाय नमः । श्रीसद्गुरुनृसिंहसरस्वत्यै नमः । सर्वेभ्यो देवेभ्यो, ब्राह्मणेभ्यो नमो नमः । मातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः । निर्विघ्नमस्तु । सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णकः । लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः । धूम्रकेतुर्गणाध्यक्षो + भालचंद्रो गजाननः । द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि । विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥ शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं । प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये ॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते ॥ सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषांमङ्गलम् । येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः ।। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि ॥ लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः। येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थोजनार्दनः ।। विनायकं गुरुं भानुं ब्रह्माविष्णुमहेश्वरान्। गं सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ॥ अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै दि गणाधिपतये नमः ॥ सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः । देवा दिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ॥

श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जंबुद्विपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके अमुकनाम संवत्सरे अमुकायने अमुकऋतौ अमुकमासे अमुकपक्षे अमुकतिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकरणे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकस्थि श्रीसूर्ये अमुकस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ (येथे पूजा करणाराने स्वतः म्हणावे.)

मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थम् । अस्माकं सकलकुटुम्बानां सपरिवाराणां क्षेमस्थैर्यायुरारोग्यैश्वर्या-भिवृद्ध्यर्थम् । समस्तमङ्गलाप्राप्त्यर्थम् शान्त्यर्थं, पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थम् । अखण्डलक्ष्मीप्राप्त्यर्थम् सकलारिष्टशान्त्यर्थम् । श्रीपरमेश्वरश्रीपादश्रीवल्लभ श्रीसद्गुरुश्रीदत्तात्रेयदेवता प्रीत्यर्थम्। अद्य अमुकदिनमारभ्य सप्तदिनपर्यंन्तम् श्रीगुरुचरित्रपाठाख्यं कर्म करिष्ये । तत्रादौ श्री । निर्विघ्नतासिद्ध्यर्थम्। महागणपतिस्मरणचं करिष्ये । वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा । श्रीमहागणपतये नमः । अथ ग्रन्थपूजा । पुस्तकरूपिण्यै सरस्वत्यै नमः – नंतर उजव्या हाताने उदक गन्धपुष्पतुलसीदल-हरिद्राकुंकुमाक्षतान् समर्पयामि । धूपदीपनैवेद्यं समर्पयामि । सोडून पारायणास प्रारंभ करावा.

|| ध्यान ॥

मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे । मध्यस्थपाणियुगले डमरूत्रिशूले । यस्यास्ति ऊर्ध्वकरयोः शुभशंख- चक्रे । वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् ॥१ ॥ औदुंबरः कल्पवृक्षः कामधेनुश्च संगमः । चिंतामणीः गुरोः पादौ दुर्लभो भुवनत्रये । कृते जनार्दनो देवस्त्रेत्रायां रघुनन्दनः । द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद- श्रीवल्लभः ॥ २ ॥ त्रैमूर्ति राजा गुरु तोचि माझा । कृष्णातिरीं वास करून वोजा । सुभक्त तेथे करिता आनंदा । सुर स्वर्गी पाहती विनोदा ॥ ३ ॥

॥ ध्यानमंत्र |

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् । एकं नित्यं विमलमचलं सर्वधीः साक्षिभूतम् । भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥ काषायवस्त्रं करदंडधारिणं । कमंडलुं पद्मकरेण शंखम् ॥ चक्रं गदाभूषित भूषणाढ्यं । श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

।। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा || ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥ ।। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा || || दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥

॥ श्रीमत् गुरुचरित्र ॥

अ. फलश्रुती

श्रीगुरुचरित्र ग्रंथाची अध्यायानुक्रमे फलश्रुती

  • २. सद्गुरूप्राप्ती होईल, गुरुभक्ती दृढ होईल.
  • सद्ग्रंथ श्रवणाची गोडी लागेल, संकटात रक्षण होईल.
  • विवेक, धैर्यादी सद्गुण वाढतील, दत्तात्रेयांची कृपा होईल.
  • अतिथी संतुष्ट होतील, संतती पराक्रमी होईल
  • कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल. महापातकांचे निरसन होईल, गोकर्ण यात्रेचे पुण्य मिळेल. संतती विद्वान होईल, शनिप्रदोष व्रताचे पुण्य मिळेल
  • . ऐश्वर्य प्राप्ती होईल.
  • . संकटांचे निरसन होऊन कार्यसिद्धी होईल.
  • संततीविषयी वाटणारी चिंता दूर होईल.
  • कर्तव्यपूर्तीसाठी केलेले प्रयत्न सफल हातील.
  • आरोग्यप्राप्ती होईल, पचनक्रियेच्या तक्रारी दूर होतील.
  • अकस्मात आलेल्या संकटाचे निवारण होईल, रक्षण होईल.
  • . तीर्थक्षेत्रांची यात्रा घडेल. साधनेसाठी एकांत लाभेल,
  • गुरुसेवेत प्रमाद घडणार नाहीत, गुरुकृपेची प्रचिती येईल.
  • . विद्याभ्यासात प्रगती होईल, कलांमध्ये प्राविण्य मिळेल.
  • . कर्जमुक्ती लवकर होईल, घरात चोरी होणार नाही.
  • . साधुसंतांची सेवा घडेल, भाग्योदय होईल.
  • संततीवरचे गंडातर टळेल.
  • संततीचे आरोग्य चांगले राहील.
  • पशुधन सुरक्षित राहील, दूधदुभत्याची कमतरता पडणार नाही.
  • स्वतःच्या मालकीचे घर होईल, प्रतिष्ठा प्राप्त होईल.
  • गैरसमज दूर होतील, स्वभावातील दोष जातील.
  • अंगी विनम्रता बाणेल, वृत्ती निरहंकार होईल.
  • आपल्या अभ्यास विषयांत विशेष प्राविण्य मिळेल. २७. वादविवादात जय मिळेल.
  • वृत्ती सन्मार्गरत आणि धर्मानुगामी होईल. २९. साक्षात्कारी सत्पुरुषाचा सहवास लाभेल, उद्धार होईल. ३०. पती विषयी वाटणारी चिंता दूर होईल, पतिसहवास लाभेल. ३१. दांपत्यांमधील मतभेद दूर होतील, संसार सुखाचा होईल. ३२. सौभाग्य अखंड राहील, परदेशस्थ पती सुखरूप परत येईल. ३३. रुद्राक्ष धारण केल्याचे पुण्य मिळेल, शिवकृपेने मंगल होईल. ३४. रुद्रपाठाचे पुण्य मिळेल, संतती दीर्घायुषी होईल. ३५. कठीण कार्यात यश मिळेल, पतीवरील गंडांतर टळेल. ३६. पतिनिंदेचा दोष जाईल, स्वधर्माचरणाचे महत्त्व टळेल. ३७. व्यवहारज्ञान वाढेल, गृहस्थाश्रमात सुख लाभेल ३८. घरात अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. ३९. संतानप्राप्ती होईल, अश्वत्थ सेवेचे पुण्य मिळेल. ४०. गुरुवरील निष्ठा दृढ होईल. शंकराची कृपा होईल. ४१. गुरुसेवा घडेल, आशीर्वाद मिळतील. ४२. काशी यात्रेचे महापुण्य मिळेल.
  • वैभव प्राप्त होईल. श्रीकृष्ण कृपा होईल.
  • गुरुतत्त्व आणि शिवतत्त्व एकच आहे याची अनुभूती येईल. ४५. त्वचाविकार बरे होतील, काव्यप्रतिभा लाभेल, ४६. द्वैतभावाचे निरसन होईल.

४७. गुरुंचा, संतांचा व साधुजनांचा सहवास लाभेल,

४८. धनधान्याची समृद्धी येईल, शेती-व्यवसायात यश मिळेल. ४९. गाणगापूर यात्रेचे पुण्य मिळेल, श्रीगुरू कृपा करतील. ५०. दुःखद व्याधी बऱ्या होतील. दुरस्थ गुरूची साक्ष पटेल. ५१. गुरूचा विरह होणार नाही.५२. गुरू सेवेचा लाभ होईल.५३. श्रीगुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचे पुण्य मिळेल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *