: Bhartat disnare Chabndra Grahan

Chabndra Grahan ani kojagiri pornima 28 Oct. 2023 | खंडग्रास चंद्रग्रहण आणि कोजागिरी पोर्णिमा कशी साजरी करावी ?


खंडग्रास चंद्रग्रहण

आश्विन शु. १५,दि. २८ ऑक्टोबर शनिवार रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री खंडग्रास चंद्रग्रहण आहे .

👉ग्रहण स्पर्श -रात्री १:०५

👉ग्रहण मध्य – रात्री १.४४

👉ग्रहण मोक्ष -रात्री २.२३

👉ग्रहण पर्वकाल – १ तास २८ मि.चा आहे.
( संदर्भ दाते पंचांग )

हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.
👉ग्रहण दिसणारे प्रदेश – भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण अफ्रिका खंड या प्रदेशात ग्रहण दिसणार आहे.

👉पुण्यकाल – ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंत पुण्यकाळ आहे.

👉ग्रहणाचा वेध* -हे ग्रहण रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्याने ३ प्रहर आधी म्हणजे शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:१४ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. बालक, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी शनिवारी सायंकाळी ७:४१ पासून वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इ. करता येतील, तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजे १:०५ ते २:२३ या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत.

🙏ग्रहणातील कृत्ये🙏

ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे.पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध , जप, होम, दान करावे.पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चेदग्रहणात करावे, ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये पर्वकालामध्ये झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन, व कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते.

🙏ग्रहणाचे राशिपरत्वे फल🙏

मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशीना🚩 शुभफल.🚩
सिंह, तुला, धनु, मीन या राशीना 🚩मिश्रफल.🚩
मेष,वृषभ, कन्या आणि मकर या राशीना 🚩अनिष्ट फल आहे.🚩
ज्या राशींना अनिष्ट आहे त्या राशीच्या व्यक्तीनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.

*🙏कोजागिरी व ग्रहण🙏

👉यावर्षी २८ ऑक्टोबर २०२३ रोजी शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच चंद्रग्रहण आल्यामुळे रात्री १:०५ मि. ते २:२३ असा ग्रहणाचा पर्वकाल आहे . त्यापूर्वीच्या वेधकाळात म्हणजे संध्याकाळ पासून रात्री १:०५ मी.पर्यंत प्रतीवर्षीप्रमाणे रात्रीचे वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवता येईल . मात्र प्रसाद म्हणून केवळ एक पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे . राहिलेले दूध दुसरे दिवशी घेता येईल . मात्र दूध झाकून ठेवून त्यावर तुळशीपत्र ठेवावे .

👉ज्यां गर्भवतींना या काळात नियम पाळायचे असतील त्यांच्यासाठी

👉नियम :-
१) या काळात कापणे , चिरणे , पिळणे व शिवणे पूर्ण बंद ठेवावे .
२) पायाची अढी घालून बसू नये .
३) पाणी पितांना त्यात तुळशीपत्र घालून प्यावे .
४) झोप घेऊ नये .
५) शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे .

वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन नांदेड.
मो.7588363518

  • vedashree jytish
  • Screenshot 20230108 191753
  • Screenshot 20230108 191734
  • Screenshot 20230108 191717
  • Screenshot 20230108 191649
  • Screenshot 20230108 191605
  • Makar Sankranti | मकरसंक्रांती 2023 कशी आहे मकरसंक्रांती या वर्षीची
  • shani dev
  • Whatsapp Image 2022 06 30 At 3.33.36 Pm
  • Whatsapp Image 2022 06 14 At 10.48.35 Pm
  • Whatsapp Image 2022 04 29 At 3.04.04 Pm
  • Whatsapp Image 2022 03 14 At 12.08.17 Pm
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.22 Pm 3
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.21 Pm 3 2
  • Whatsapp Image 2022 03 09 At 11.12.07 Pm
  • Whatsapp Image 2022 03 03 At 6.41.35 Pm 1
  • Whatsapp Image 2022 03 03 At 6.41.35 Pm
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.22 Pm 2
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.21 Pm 3 1
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.21 Pm 2 1
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.21 Pm (2)
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.21 Pm (3)
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.22 Pm
  • Whatsapp Image 2022 03 08 At 4.59.22 Pm (1)

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *