मकर संक्रांत विषयी माहिती.
संक्रांतीचा पर्वकाळ. – दिनांक 14/1/2021 गुरुवारी सकाळी 8:14 ते दुपारी 4:14 मि. पर्यंत. पुण्यकाळ आहे. संक्रांतीच्या दिवशी तीलमिश्रित पाण्याने स्नान करावे. तीळाचे उटणे लावावे. तीलहोम, तील तर्पण, तील दान, तील भक्षण करावे. तील दान, तर्पण , होम हवन..आदी केल्याने पापांचा नाश होतो. या काळात दान तर्पण…आदी केल्याने पुण्य प्राप्ती होते. गुरवारी सकाळी 8:14 मि. सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. वाहन सिंह आहे. उपवाहन हत्ती आहे. पांढरे वस्त्र परिधान केले आहे. कस्तुरीचा टीळा लावला आहे. अन्न भक्षण करत आहे. देव जाति आहे. वार नाव नंदा, नक्षत्र नाव महोदरी आहे. पश्चिम कडून पूर्वे कडे जात आहे. आग्नेय दिशेला पाहत आहे. संक्रांतीच्या काळात.. दात घासणे, वाईट बोलणे, झाड गवत तोडणे, कामविषय सेवन करणे, दूध काढणे..आदी कामे करू नये. टीप – संक्रांत अशुभ आहे, ही संक्रांत चांगली नाही… असे अनेक गैरसमज, अफवा केल्या जातात. अश्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो. त्या मुळे यावर विश्वास ठेऊ नये. संक्रांती काळात करावयाची दाने. – नवे भांडे, गोग्रास, अन्न, गुळ, सोने , तीळ ,वस्त्र…आदी यथा शक्ती द्यावे. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपले प्रेम ,जिव्हाळा.. वृद्धिंगत व्हावा.
श्री वैभव गुरु डंख