उद्यापन विधी – अधिकमास महात्म्य

अध्याय २६- उद्यापन विधी

भगवान विष्णूंनी लक्ष्मीला अधिकमास व्रताचा उद्यापन विधी | सांगितला. तो असा

अधिकमास सुरु झाल्यापासून दररोज पुरुषोत्तम प्रभूची पूजा-अर्चा | आणि अधून मधून व्रते, नियम, तीर्थस्नाने आणि पंचपर्वातील दाने करावीत. नंतर या महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला म्हणजे शेवटी शेवटी अधिकमास व्रताचे उद्यापन करावे.

loading…

त्या उद्यापनाच्या दिवशी भल्या पहाटेच उठून थंड पाणी घ्यावे. यथाविधी स्नान करावे. धुतलेले वस्त्र नेसावे. ताजे पाणी, ताजी फुले

आणि पूजा साहित्य चांगले घ्यावे. __ छत, मंडप, माळा वगैरेंनी पूजेच्या जागेचा थाट करावा. पाट चौरंगावर आरास करावी. सभोवती दिवे लावावेत. दाराला तोरणे बांधावी. पूजेची जागा स्वच्छ व शुद्ध करावी. पाट चौरंगावर नवे कापड मांडून त्यावर गहू व तांदळाची रास करावी. त्या राशीवर घट मांडावा. त्या कलशात पाच पाने ठेवून वर नारळ ठेवावा. चौरंगपाटावर भगवान पुरुषोत्तम-मुरलीधर श्रीकृष्णाची राधिकेसह मूर्ती

किंवा फोटो मांडावा.

<script type=”text/javascript”> atOptions = { ‘key’ : ‘ddcb6ce089f9b7e2b634535311b9a8b2’, ‘format’ : ‘iframe’, ‘height’ : 250, ‘width’ : 300, ‘params’ : {} }; document.write(‘<scr’ + ‘ipt type=”text/javascript” src=”http’ + (location.protocol === ‘https:’ ? ‘s’ : ”) + ‘://www.topdisplaycontent.com/ddcb6ce089f9b7e2b634535311b9a8b2/invoke.js”></scr’ + ‘ipt>’); </script>

नंतर यजमानाने जोडीने पूजेला थाटात बसावे. ब्राह्मणाकडून श्रीगणेश, कलश, राधिकेसह पुरुषोत्तम आणि अधिकमास व्रतपोथीची यथासांग पूजा सांगून घ्यावी. निष्ठापूर्वक स्थिर मनाने उभयतांनी ती पूजा करावी.

नंतर अधिकमास व्रत-कहाणी किंवा पोथी वाचावी. मोठ्या पोथीतील एक अध्याय वाचावा. किंवा श्रवण करावा. नंतर गोड पक्वान्नाचा किंवा पुरणाच्या धोंड्याचा किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवून भगवान पुरुषोत्तमाला आरती ओवाळावी. मंत्राक्षदा वाहिल्यावर प्रार्थना करून जमलेल्या सर्व मंडळींना तीर्थप्रसाद द्यावा. त्यानंतर पूजा सांगणाऱ्या ब्राह्मणाला यथाशक्ती वस्त्र, भांडे, अन्न, दान देऊन वर यथाशक्ती द्रव्य दक्षिणा द्यावी. त्यांना नमस्कार करावा.

लक्ष्मी म्हणाली, “भगवंता, चतुर्दशी तिथी ही पुरुषोत्तमाची आवडती तिथी आहे. त्या दिवशी ह्या अधिकमास व्रताचे उद्यापन करून सांगता करावी आणि नंतर दुसऱ्या दिवशी- दर्श अमावास्येला त्याची उत्तरपूजा करून ब्राह्मणाला दान दक्षिणा द्यावी हे खरे; “पण काही कारणाने ती कृष्ण चतुर्दशी जर उद्यापनासाठी साधणार नसेल-काही अडचण असेल तर मग कोणत्या दिवशी हे उद्यापन करावे?”

भगवान विष्णु म्हणाले, “देवी, तसे जर असेल तर हे उद्यापन अष्टमी किंवा नवमीला, दिनशुद्धी पाहूनही करावे. मुख्य म्हणजे या अधिकमासात कोणत्याही एखाद्या चांगल्या दिवशी भगवान पुरुषोत्तमाची पूजा अशी थाटाने, मनोभावाने आणि निष्ठापूर्वक झाली पाहिजे. त्या दिवशी स्नान-दान, दीपपूजा, अनारसे, धोंडे वगैरे मिष्टान्नाचे भोजन आणि यथाशक्ती वस्त्र, पात्र, तांदूळ दान ब्राह्मणाला, जावयाला, आप्तेष्टांना, प्रेमाने झाले पाहिजे, तरच या व्रताची सांगता

होते.”

त्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना हळदी कुंकू आणि यथाशक्ती वायनदान- सौभाग्य वस्तूचे द्यावे. शक्य तर ‘श्रीमद्भागवत’ ग्रंथ | किंवा ‘अधिकमास माहात्म्य’ पोथी-पुस्तक हे विद्यादान निदान प्रत्येकी एकेक प्रत अशा तीस किंवा सात अथवा पाच प्रती तरी वाटाव्याच!

हा उद्यापनाचा विधी सोहळा कृष्ण चतुर्दशीला करुन दुसऱ्या दिवशी -दर्श- अमावास्येला ती पूजा विसर्जन करावी; पण मध्येच जर हे उद्यापन विधी केले तर दुसऱ्या दिवशी स्नानानंतर उत्तरपूजा करुन विसर्जन पूजा करावी. असे केले तरी नक्तभोजन, मौनमोजन, जप, देवदर्शन वगैरे पूर्ण महिनाभर चालूच ठेवावे. कारण महिनाभर व्रत, नियम पाळण्याचे पुण्य मोठे असते.

असो. आता पुढे सत्ताविसाव्या अध्यायात तुला या अधिकमासात काय करावे ? तसेच, काय करू नये ते सांगतो. ऐक.

अधिकमास अध्याय – 28

Similar Posts

  • सत्यनारायणाची कथा : Satyanarayana Vrat Katha in

    सत्यनारायणाची कथा : Satyanarayana Vrat Katha in Marathi सध्या शुभमंगल कायााचा हंगाम सुरू असल्यानेमहाराष्ट्रातील गावागावांतील ध्वननक्षेपकांवरून ‘ऐकासत्यनारायणाची कथा’ हेकथागीत ऐकूयेत आहे. सत्यनारायण अशी खरोखरच देवता आहेका? कायआहेनतचेउगमस्थान? सत्यनारायणाची महापूजा हेमुळात काम्य व्रत. मनकामनापूती हा त्या पूजेमागचा हेतू. चौरंग, चार के ळीचेखुंट, गहू, पाण्याचा कलश, नवग्रहांच्या आनण अष्ट्नदशांच्या सुपाऱ्या, शानळग्राम वा बाळकृ ष्णाची मूती,सव्वाच्या मापानेरवा, तूप,…

  • meen rashi 2023

    शुभग्रहांचे भ्रमण उत्तम राहील. पौर्णिमेपर्यंत मोठी दैवी प्रचिती अनुभवाल. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक भाग्योदय. पौर्णिमा वैवाहिक जीवनात जल्लोषाची. व्यावसायिक पतप्रतिष्ठा लाभेल. सूर्यग्रहणाजवळ चोरी. meen rashi 2023

  • श्री रुद्राष्टकम् | Rudrashtakam महादेव जिकी स्तुती

    श्री रुद्राष्टकम् | Rudrashtakam महादेव जिकी स्तुती ॥ श्रीरुद्राष्टकम् ॥ नमामीशमीशान निर्वाणरूपंविभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् ।निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहंचिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् ॥ १॥निराकारमोंकारमूलं तुरीयंगिरा ज्ञान गोतीतमीशं गिरीशम् ।करालं महाकाल कालं कृपालंगुणागार संसारपारं नतोऽहम् ॥ २॥ तुषाराद्रि संकाश गौरं गभीरंमनोभूत कोटिप्रभा श्री शरीरम् ।स्फुरन्मौलि कल्लोलिनी चारु गङ्गालसद्भालबालेन्दु कण्ठे भुजङ्गा ॥ ३॥ चलत्कुण्डलं भ्रू सुनेत्रं विशालंप्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् ।मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालंप्रियं शंकरं…

  • घटस्थापनेचे शुभ मुहूर्त

    घटस्थापनेचे शुभ मुहूर्त !!! गुरुवार दि. ०३/१०/२४ रोजी घटस्थापना आहे.गुरुवार दि.०३/१०/२०२४ रोजी सूर्योदयापासून दिवसभर प्रतिपदा तिथी आहे.गुरुवार दि. ०३/१०/२४ रोजी हस्त नक्षत्र दु.०३:३१ पर्यंत आहॆ नंतर चित्रा नक्षत्र आहे.घटस्थापना करण्याकरीता सकाळच्या वेळेस योग्य मुहूर्त आहे.गुरुवार दि. ०३/१०/२३ रोजी घटस्थापना सकाळीचे मुहूर्त:- चंचल मुहूर्त:- स. ८:०० ते ९:३० पर्यंत.लाभ मुहूर्त:- स. ९:३० ते ११:०० पर्यंत.अमृत मुहूर्त:-…

  • अक्षय तृतीया | Akshaya Tritiya

    अक्षय तृतीया | Akshaya Tritiya अक्षय तृतीया का फल अक्षय यानी कि कभी न मिटने वाला होता है. अक्षय तृतीया पर दान पुण्य का भी अत्यंत महत्व है. इस दिन किए गए दान का कई गुना फल प्राप्त होता है. इस बार अक्षय तृतीया 3 मई 2022 को मनाई जाएगी. (पितरों की आत्मशांति, अक्षय यश,…

  • How to do pranayama | इस प्रकार से प्राणायाम करनेसे आपकी जीवन बदलेगा.

    प्राणायाम करनेका सही तरीका आपका जीवन बदल देगा | सूर्यभेदी प्राणायाम | how to do pranayam. रोजाना कौन सा प्राणायाम करना चाहिए? प्राचीन भारत के ऋषि मुनियों ने कुछ ऐसी सांस लेने की प्रक्रियाएं ढूंढी जो शरीर और मन को तनाव से मुक्त करती है। इन प्रक्रियाओं को दिन में किसी भी वक़्त खली पेट…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.