काय करावे, काय करू नये!

अध्याय २७ – काय करावे, काय करू नये!

भगवान वैकुंठविहारी लक्ष्मीला म्हणाले, “रमा, प्रिये, अधिकमासातील व्रते, नियम, साधना, उपासना, दानादि पुण्यकर्मे केल्यामुळे मनुष्याला सुख, समाधान, शांती आणि प्रगती लाभते. मोक्षप्राप्ती होऊन जीवनाचे सार्थक होते.

ज्या घरी हे अधिकमास व्रत निष्ठापूर्वक विधीयुक्त होते त्या घरी उत्साहाचे पवित्र वातावरण राहाते. त्या घरी देवतांचा निवास होतो. त्यामुळे त्या घरातील दुःख व संकटे दूर पळतात. सर्व बाधा नाहीशा होतात. ते घर संतती व संपत्तीने भरून जाते.

loading…

अधिकमासात सांगितलेली अनेक व्रते, दाने, पुण्यकर्मे ज्या

कोणाला करणे शक्य नसेल त्याने आपली प्रकृती आणि परिस्थिती पाहून यथाशक्ती एखादा तरी नियम पाळावा. नित्यनेमाने स्नान, देवदर्शन, एकमुक्त भोजन, भूमिशयन, पोथीवाचन, श्रवण, शक्य ते दान, उपोषण, तुलसीपूजा याप्रमाणे नियम पाळावे.”

या नियमातील कोणतेही एक व्रत पाळल्यावर त्याचे उद्यापन शेवटी करावे. नक्तभोजन, मौनभोजन अशा व्रताचे उद्यापन म्हणजे शेवटी ब्राह्मणाला भोजन किंवा शिधा देऊन करावे. देवळात एखादी घंटा बांधूनही मौनभोजनाचे उद्यापन होते. दीपदान आणि तेहतीस अनारसे, बत्तासे, खारका, सुपाऱ्या, फळे वगैरे वस्तू यथाशक्ती दान दिल्यानेही उद्यापन साधते. याप्रमाणे शक्य ते एखादे तरी पुण्यकर्म करावे.

या महिन्यात कांदा, लसूण, मसूर डाळ, शिळे अन्न वगैरे उत्तेजक, मांसल, मादक वस्तू खाऊ नयेत. अपेय पिऊ नये. परद्रोह, परनिंदा करु नये. रागाने बोलू नये. नको तेथे बसू नये. अशा प्रकारे आपले आरोग्य बिघडेल. मन अस्वस्थ होईल-अशा गोष्टी करू नयेत. कारण या तेराव्या महिन्यात एकही सूर्यसंक्रात नसल्याने वातावरण मलीन बनलेले असते. अशावेळी निर्मळ राहून आपले आपण पवित्र बनले पाहिजे!

याप्रमाणे या महिन्यात काय करावे आणि काय करू नये ते सांगितल्यावर पुढे अठ्ठाविसाव्या अध्यायात आणखी एक कथा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितली ती ऐकावी.

Similar Posts

  • नवरात्री — Navaratri

    या वर्षी नवरात्र दिनांक 17- ओक्टोम्बर- 2020 रोजी वार:- शनिवार पक्ष:- आश्विन शुल्क पक्ष तिथि :- प्रतिपदा पासुन नवरात्रीची श्रीघट स्थापना होत आहे. दरवर्षी प्रमाने याही वर्षी नवरात्री,अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी हा देवी उपासनेचा काळ, म्हणजेच नवरात्र उत्सव काळ होय. नवरात्रित घरोघरी घट स्थापना केली जाते. नवरात्रीत देवीपुढे अखंड दिप लावला जातो….

  • Manglik Dosha Remedies 2025: मंगल दोष के प्रभावी उपाय, शादी में विलंब और कलह से पाएं मुक्ति

    🪔 Manglik Dosha Remedies 2025: मंगल दोष के प्रभावी उपाय, शादी में विलंब और कलह से पाएं मुक्ति 🔮 परिचय: क्या है मंगलीक दोष और क्यों होता है यह चिंताजनक? विवाह में देरी? रिश्तों में तनाव? जीवनसाथी के साथ मतभेद?यदि आपकी कुंडली में मंगल दोष (Manglik Dosha) है, तो यह सभी समस्याओं का एक बड़ा…

  • शापित कुंडली | shapit kundali !

    खरंच तुमची पण कुंडली शापित आहे का? नावाप्रमाणेच “शापित” असणाऱ्या काही कुंडल्या असतात ज्यात कुठल्याच मार्गाने सुखाची अपेक्षा करता येत नाही. कधी कधी संपूर्ण कुंडली ग्रहस्थिती ठीकठाक असून एखादा ग्रह अशी काही स्थिती निर्माण करतो की त्यामुळे सर्व अशुभ परिणामांना प्रारंभ होतो. या जीव सृष्टीवर जगायचे म्हणजे मन काबूत असणे गरजेचे आहे. शांत आणि स्थिर…

  • Gudi Padva 2021

    Gudi Padva 2021 गुढी पाडव्याच्या वेगवेगळ्या पौराणिक कथा आहे. गुढीपाडव्याची पौराणिक माहिती समजून घेण्याअगोदर शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी या मुहूर्ताचे अनन्य साधारण आणि पुजा कशी करावी याचे महत्व सांगितले आहे. गुढी पाडव्याचं अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केलं जाते. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावे. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजविलं जातं….

  • Mangal Dosh Kya Hai? Kya Manglik Ki Shaadi Sirf Manglik Se Hi Honi Chahiye

    Mangal Dosh Kya Hai? Kya Manglik Ki Shaadi Sirf Manglik Se Hi Honi Chahiye भारतीय संस्कृति में विवाह केवल एक सामाजिक अनुबंध नहीं बल्कि एक संस्कार माना गया है – सोलह संस्कारों में से एक।
    विवाह दो आत्माओं, दो परिवारों और दो कुलों का संगम है। यही कारण है कि विवाह से पहले कुंडली मिलान की परंपरा भारतीय समाज में अत्यंत महत्वपूर्ण मानी जाती है।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.