विष कन्या विष पुत्र योग म्हणजे काय? हा योग कसा होतो?

विष कन्या योग : – रवी, मंगळ, शनि यापैकी एका वारी जर कृतिका, आश्लेषा , शततारका यापैकी एका नक्षत्रावर द्वितीया, सप्तमी, द्वादशी. यापैकी एक तिथी येईल तर त्या वार नक्षत्र तिथीच्या योगावर जन्मलेल्या कन्येला विष कन्या असे म्हणतात. अथवा दोन शुभग्रह वाराच्या शत्रुस्थानी असून तेथे कन्येच्या जन्म लग्न असतील तर तोही विषयोग आहे. जर वराच्या शत्रुस्थानी असणारा एक खलग्रह वधूच्या जन्म लग्नी असता विषयोग होतो. अथवा जन्म लग्न शनी, पंचमात रवी व नवमात मंगळ असेल ग्रह एका वेळी असतात त्यास विष योग्य होतो.

यावरती उपाय म्हणून कुंभ विवाह करावा.

Maxresdefault (1)

मूळ नक्षत्राच्या पहिल्या तीन चरणावर जन्मलेली कन्या सासऱ्यास, आश्लेषाच्या शेवटच्या तीन चरणावर सासूस, विशाखाच्या चौथा चरणावर धाकट्या दिरास आणि ज्येष्ठाच्या चौथा चरणावर मोठ्या दिरास वाईट असते. मघाच्या प्रथम चरणाचे फळ मूळ नक्षत्राप्रमाणे असते.

यावरती उपाय म्हणून या नक्षत्राची शांती केल्याने हा दोष निवारण होतो,

विषपुत्र योग:- मूळ नक्षत्राच्या पहिल्या तीन चरणावर जन्मलेला पुत्र सासऱ्यास आश्लेषाच्या शेवटच्या तीन चरणावर सासूस, विशाखाच्या चौथा चरणावर बायकोच्या धाकट्या भावास आणि ज्येष्ठाच्या चौथ्या चरणावर बायकोच्या मोठा भावास वाईट असतो मघाच्या प्रथमचरणाचे फळ मुळ नक्षत्राप्रमाणे असते हे विषय योगाचे नयनानंतर पुरुषास नाही असे कित्येक ऋषींचे मत आहे. परंतु उपनयन मूळ वा आश्लेषा या नक्षत्रावर झालेले नसावे.

ज्येष्ठ विचार :- विवाहात तीन ज्येष्ठ असू नयेत जेष्ठ कन्या ज्येष्ठवर यांच्या ज्येष्ठ मासात विवाह करू नये कारण तो त्री जेष्ठ योग होतो परंतु वधूवरातून एक ज्येष्ठ असतात ज्येष्ठ मासात विवाह केला तरी चालेल तसेच ज्येष्ठ पुत्राचे उपनयन ज्येष्ठभासात करू नये मात्र सूर्याचे कृतिका नक्षत्र संपल्यावर जेष्ठ दोष मानू नये (मुहूर्त चिंतामणी)

प्रवेश व निर्गम विचार : – मुलाचे विवाह नंतर सहा महिन्याचे आत मुलीचा विवाह करू नये कारण वधू घरात आल्यानंतर आपल्या कन्येला सासरी पाठविणे तसेच मुलीच्या अगर मुलाच्या विवाहनंतर सहा महिन्याचे आत मुंज व नूतन गृहात प्रवेश नूतन व्रत ग्रहण व उद्यापन करणे अनिष्ट आहे पण संवत्सर भेदाने असे केले तर चालेल.

मंगलोतर कार्याकार्य विचार :- एका अविभक्त कुटुंबात विवाह नंतर सहा महिन्यांपर्यंत उपनयन, तीर्थयात्रा नवे घर बांधणे नूतन व्रत ग्रहण व उद्यापन इत्यादी करू नयेत

कुंभ विवाह

विष कन्या विष पुत्र योग म्हणजे काय? | VISH YOG

ग्रहों के उपाय

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *