कंजुष कदर्याची कथा

अध्याय २९ – कंजुष कदर्याची कथा वाल्मिकी मुनी निघून गेल्यावर दृढधन्वा राजा आणि गुणसुंदरी राणी यांनी खूप विचार केला तेव्हा राजा म्हणाला, “मी आता है सगळे राजवैभव सोडून तपोवनात जातो. तेथे तपश्चर्या करून माझ्या जन्माचे सार्थक करतो.” राणी म्हणाली, “मग मी ह्या राजवाड्यात राहून सुनांच्या हाताखाली कुत्रीप्रमाणे जीवन कंठू, की काय? महाराज, जेथे पती तेथे…