Rashi fal 2024 2023 2022
Rashi fal 2024 2023 2022

Sinha Rashi | सिंह राशी 2023

astrologer

सिंह राशीसाठी कसे असेल 2023 वर्ष

rashi-removebg-preview

चैत्र:- शुक्रभ्रमणाचा पूर्वार्धात लाभ. कलाकारांचे भाग्योदय. पौर्णिमेपर्यंत वैयक्तिक सुवार्ता. काहींना परदेशी नोकरी. जुन्या गुंतवणुकीतून लाभ. नोकरीत बढती. उत्तरार्ध व्यावसायिक शुभारंभाचा. सूर्यग्रहण पितृचितेचे.

वैशाख:- मोठा आवाका राहील. सुवार्तातून सतत चर्चेत राहाल. व्यावसायिक प्राप्तीचे रेकॉर्ड मोडाल. नव्या ओळखींतून लाभ. पौर्णिमेजवळ तरुणांचे मोठे भाग्योदय. अमावास्येजवळ राजकारणातून त्रास.

ज्येष्ठ:- खर्चाचे प्रसंग येतील. भावाबहिणींच्या प्रश्नांतून त्रास. पौर्णिमेजवळ नोकरीत भाग्योदय. परिस्थितीजन्य लाभ. उत्तरार्ध छान सहलीचा. स्वतंत्र व्यावसायिकांची सरकारी कामे. अमावास्येजवळ नुकसानीचे भय.

आषाढ :- गुरुचे उत्तम पाठबळ. पौर्णिमेच्या आसपास जीवनातले मोठे भाग्योदय. व्यावसायिक मोठा धनवर्षाव. वैयक्तिक समारंभ. तरुणांचा परदेशी भाग्योदय. अमावास्या स्त्रीचिंतेची.

अ. श्रावण:- शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर जपा. राशीचे शुक्रभ्रमण सर्वार्थाने उत्तम. उत्तरार्ध मोठा झगमगाटी. नोकरीतील सुंदर पर्व सुरु होईल. घरात मुलाबाळांचे मोठे भाग्योदय. अमावास्येजवळ मौल्यवान वस्तु जपा. नि.श्रावण:- पूर्वार्धातील रविशनि प्रतियुती पौर्णिमेपर्यंत अंमल करेल. आर्थिक प्रलोभन टाळा. बाकी पौर्णिमेजवळ विशिष्ट वैयक्तिक सुवार्तांचा जल्लोष राहील. नोकरीत अनपेक्षित भाग्योदय. अमावास्येजवळ अकारण वाद. – पूर्वार्ध तरुणांचा भाग्योदय करणारा. पौर्णिमेजवळ स्पर्धात्मक यश. उत्तरार्ध व्यावसायिकांना विशिष्ट करारमदारांतून लाभाचा. कोर्टप्रकरणांतून लाभ. उत्तरार्ध प्रसिद्धीयोगाचा. सूर्यग्रहणाजवळ खर्चाचे प्रसंग.

आश्विन:- कुयोगांवर मात कराल. गुरुशुक्र शुभयोगाचा पूर्ण लाभ उठवाल. व्यावसायिक समारंभ होतील. नोकरीत नवे पर्व सुरु होईल. परिस्थितीचा फायदा उठवाल. उत्तरार्ध विचित्र गाठीभेटी घडवणारा. नातेवाईकांशी गैरसमज. प्रवासात बेरंग. वाहनपीडा.

कार्तिक:- शुभग्रहांचे प्रचंड पाठबळ राहील. मात्र घरात वृद्धांची काळजी घ्या. गृहीणींनी भाजण्या कापण्यापासून जपावं. पौर्णिमा विचित्र दुखापतींची. उत्तरार्ध पूर्णपणे शुभग्रहांचा, व्यावसायिक उत्तम उलाढाली. मुलाबाळांचे भाग्योदय. उच्चशिक्षणाच्या संधी. वास्तुविषयक खरेदीविक्री.

मार्गशीर्ष:- रविगुरुच्या शुभयोगातून मोठा उत्साह राहील. व्यावसायिक भाग्यलक्षणं दिसतील. पौणिमेजवळ सुवार्तांचा मोठा भर. उत्तरार्धात घरात शुभकार्यांचा धमाका. मोठ्या पर्यटनाचे योग. पौषः- गुरुभ्रमणाचे पाठबळ राहीलच. पूर्वार्धात सतत प्रवास. पौर्णिमेजवळ शैक्षणिक चिंता जाईल. व्यावसायिक वादग्रस्त येणे येईल. उत्तरार्ध शुक्रभ्रमणातून तरुणांना संधी देणारा. व्यावसायिक प्रदर्शनातून लाभ. अमावास्या शारीरिक वेदनेची.

माघः- पूर्वार्ध मंगळशुक्रांच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक प्राप्तीचा. नोकरीत पगार वाढ. पौणिमेजवळ वास्तुविषयक व्यवहार, उत्तरार्धात सरकारी प्रकरणांतून त्रास. अमावास्या नवपरिणीतांना कलहाची.

फाल्गुनः- शुक्रशनि सहयोग पूर्वार्धात सर्वंकष बोलेल. नोकरी व्यावसायिक मोठे चमत्कार. पती वा पत्नीचा भाग्योदय. मात्र चंद्रग्रहणाजवळ देण्याघेण्याच्या व्यवहारांतून सांभाळा. उत्तरार्ध भागिदारीतून कटकटीचा. सूर्यग्रहणाजवळ शारीरिक वेदना.


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.