kundali janm kundali

रवि ग्रह स्थानानुसार फळ कोणते देतो त्याचा परिणाम का्य होतो? | Ravi (Sun) planet how impact to human?

रवि प्रथम भावामधे


शुभ फळ सर्वसामान्यपणे लग्नामधे रवि हा प्रगती तसेच भाग्योदयाचा पोषक असतो. जन्मलग्नामधे रवि असल्याने जातक उंच, सुदर डोळे असणारा, सरळ नाक आणि मोठे कपाळ असणारा असतो. जातक बलवान, निरोगी आणि पितकारक प्रवृतीचा असतो. उदर उष्ण असते. जातक स्वाभिमानी, आत्मविश्वासी, दृढ निश्यची, महान विचारांचा, स्वाभिमानी असतो. उदार हृदय असणारा, हलक्या कामांच्या तिरस्कार करणारा, कठोर, न्यायी आणि प्रामाणिक असतो. जातक बुद्धिवान, कुशाग्र, बुद्धिचा, अल्पभाषी, जन्मत: सुखी, प्रवासी किंवा परदेशी जाणारा असतो. सर्व कामात यशस्वी, स्वतंत्रपणे उंची जागा मिळवणारा असतो. सुशील, ज्ञानी आणि आचारामधे मग्न, सदाचारी असतो. कमी खाणारा, शूरवीर, युद्धामधे पुढे जाऊन लढणारा असतो. लग्न स्थित सूर्याचा जातक, बाग-बगीचाचा शौक असणारा असतो.
सूर्यावर बलवान गृहाची दृष्टी असेल, तर जातक विद्धान असतो.
अग्निराशि (1,5,9) मधे रवि असल्यास जातक महत्वाकांक्षी, लवकर रागावणारा, सर्वावर अधिकार गाजवण्याची इच्छा असणारा. गंभर आणि कमी बोलणारा असतो.
धनु राशिमधे रवि असल्यास जातक विद्धान-धर्म-शास्त्रज्ञ, बॅरिस्टर, जज्ज किंवा उच्च अधिकार पद, मिळवतो. परंतु स्त्री सुखाला वंचित रहातो. अनेक स्त्रिया असूनही संतती प्राप्त होत नाही. अशातन्हेने कोठले दु:ख रहातेच.
दक्षिणायन रवि (कर्कपासून धनू राशिपर्यंत) भाग्यवान बनवतो. दैवी वृती वृद्धिगत होते.

अशुभ फळ ज्याच्या जन्मलग्नात रवि असेल असा जातक स्त्रियांमुळे दूषित, दुष्ट संतति असणारा, बाजार किंवा वाटिकेमधे फिरणारा, आणि वेश्येवर अनुरक्त होणारा असतो. काम करण्यात आळशी, क्रूर आणि क्षमा न करणारा असतो. शरीरवात आणि पित व्याधीने ग्रासलेले असते. म्हणून अंगाने बारिक असेल. बाल्यावस्थेत रोगी असेल. जातकास डोळयांचे विकार होतील. डोळे कोरडे असतील रवि लग्नात रोगी बनवतो चक्षुरोगी, डोळे दुखी, वायु विकार, रक्त विकार, गुल्म रोग, वस्ति संबंधित रोग, वीर्य क्षय तसेच बहुमूत्रतेसारखे रोग असतात. परदेशात जातो आणि विदेशात व्यापार करण्याने पैसा कमी मिळतो. अस्थिर संपती असणारा, अर्थात पैशाचे सुख उतम असते आणि कधी कधी पैशाचा त्रास असतो. रवि लग्नात असल्यास संतती कमी करते. देवक्रपेनेच पुत्र सुख मिळते लग्न स्थित रवि जातकास अशाक, स्त्रियांमूळै दूषित बनवतो नीच लोकांची नोकरी करतो. जातक एका ठिकाणी घर करून रहात नाही आणि नेहमी फिरत रहातो.
पुयषराशिचा रवि लग्नात असेल तरू थेडासा दु:खदायकही असतो.
सूर्यात्रा पापग्रहाशी संबंध असल्यास अथवा शत्रुक्षेत्री किंवा नीचक्षेत्री असल्यास जातकाला तिसन्या वर्षी ज्वरपीडा होते. जर या सूर्यावर शुभग्रहाची दृष्टी असेल तर ज्वरपीडा होत नाही.
धनुराशित रवि असल्याने जातक स्त्री-सुखाला वंचित असतो. अनेक स्त्रिया असूनही संतति हो नाही. अशाप्रकारे कुठले ना कुठले दु:ख होत असते.

शुभ फळ पंचम भावात रवि

शुभ फळ पंचम भावात रवि असल्याने जातक सदाचारी, कुशाग्रबुद्धीचा, तीव्र बुद्धिमता असलेला, बुद्धिवान असतो. अति सूक्ष्म विषय समाजणयाएवढी कुशाग्र बुद्धी असते. जातक मंत्रविद्या प्रिय असणारा, किंवा मंत्रशास्त्राचा पंडित असतो. रवि शिव यांचा भक्त असतो. पैशाचा (द्रव्याचा) संग्रह करणारा असतो. हळू हळू पैसा साठवतो. राजाचा प्रिय तसेच परदेशी जाणारा असतो. जातक सुखी असतो. संततिे कमी असतात. बहुतेक एकच पुत्र असतो.

अशुभ फळ जन्मलग्नाने पंचम भावात रवि असेल, तर तो शुभकर्म करत नाही. आणि धर्माच कामामधे आळस करणारा असतो. चिंता तसेच व्यथा असणारा, चंचल, निर्बल लवकर रागावणारा आणि लहानपणी दु:खी असतो. भटकत राहतो. बुद्धी स्थिर आणि निश्चयी नसते असावधान, बेफिकिर तसेच बेपर्वा, मस्तीत राहणारा, चुका करत राहणारा असतो. पंचमभावात रवि असल्यास जातक कपट करण्यामधे चतुर, दुसन्याला धोका द्यायला कचरत नाही, दुरून्यांना फसवण्यात आनंद मिळवणारा असतो.पोट खूप मोठे असते. पोटाचे विकार असतात. जातक हाताच्या रोगाने किंवा बाहुरोगाने त्रस्त असतो. जाताकाचा मृत्यु हदयरोग किंवा हदयाच्या त्रासामुळे होतो. तारूण्यात रोग होतात. धनप्राप्ती होत नाही. धनहीन असतो. खूप पैसा खर्च करतो. डोंगर-किल्यामधे हिंडत राहतो. चंचलबुद्धी आणि विलासी असतो. स्त्रीसंगामधे खुश राहतो. पंचम रवि कमी पुत्र, जास्त कन्या देतो. वाईट कार्य करता आणि वाईट सदृश देतो. हदयात वाईट भावना असते. सातव्या वर्षी जातकाच्या पित्यावर अरिष्ट येते. सुतस्थानामधे स्थित रवि अल्पसंततीवान, पुत्राला त्रास तसेच पुत्रसुखाचा विनाश करतो. आपल्या मोठया मुलाच्या मृत्युचे दु:खही भोगावे लागते. किंवा प्रथम पुत्रास त्रास सहन करावा लागतो.
जलराशिने भिन्न राशित झाल्याने संतती होत नाही.
रवि मेष, सिंह, धनु राश्ज्ञित असल्याने शिक्षण पूर्ण होते. धनुचा रवि शिक्षणासाठी चांगला आहे.

guruji
guruji

जन्म कुंडली

Manik

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *