Vishnu Avtar Upay Kundali Dosh | Badha | बाधा

राहू केतू गोचर ३० ऑक्टो २०२३ पासून पुढील १८ महिने राशीपरत्वे मिळणारे परिणाम – Rahu ketu Gochar Badal

Whatsapp Image 2022 04 29 At 3.04.04 Pm

१ – मेष राशीच्या व्यक्तीसाठी राहु १२ व्या घरातून आणि केतू ६ व्या घरातून गोचर करेल. तुमचा प्रवास आणि सुखसोयींवर होणारा खर्च वाढू शकतो.जे लोक नोकरी बदलण्याचा किंवा घर बदलण्याचा विचार करत आहेत किंवा परदेशात सेटल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना अनुकूल काळ: दशा जर धनेश आणि दशमेश चालू असेल त्यांच्यासाठी फायद्याचा काळ आहे,पण सावध राहा,आरोग्य आणि रुग्णालयावर खर्च होऊ शकतो. मातृपक्षासाठी काही त्रास संभवतो.

उपाय – लाल कपड्यात मूठभर बडीशेप/साखर ठेवून झोपताना डोक्याजवळ ठेवावी.दररोज जेवल्यानंतर एक चमचा बडीशेप खावी.

२ – वृषभ राशीच्या लोकांच्या इच्छा आणि मनोरंजनाच्या संधी वाढतील.हेरफार आणि मेहनतीतून पैसे कमावतील.व्यवसाय आणि नोकरीसाठी अनुकूल काळ आहे, परंतु प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात थोडा संघर्ष होईल.

उपाय – ११ मूळे दान करावे,लोखंडाची अंगठी मधल्या बोटात घालावी.

३ – मिथुन राशीच्या लोकांसाठी राहु १०व्या स्थानातून आणि केतू ४ थ्या स्थानातून गोचर करत आहे.तुम्ही घर आणि कुटुंबापासून दूर राहू शकता, परंतु कामाच्या ठिकाणी राहू नवीन ऊर्जा आणि नवीन लहरी घेऊन बोलेल. राहू १० व्या स्थानामध्ये येतो जग त्याच्या नियंत्रणात येते असे म्हणतात,म्हणजेच व्यावसायिक आघाडीवर नवीन कल्पना आणि उर्जेने यशाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करेल.

उपाय – उन्हात जाताना डोक्यावर सफेद/नारंगी रंगाची टोपी घालूनच बाहेर जावे.

४ – कर्क राशीच्या लोकांसाठी राहू नवव्या भावात आणि केतू तिसऱ्या भावातून गोचर करेल.तुमच्या लहान भावंडांना किंवा शेजाऱ्यांना काही समस्या येण्याची शक्यता आहे. तुमचे लहान अंतराचे प्रवास वाढतील,तुम्ही गोंधळलेले राहू शकता,तुम्ही चिंतेने त्रस्त होऊ शकता,तुमच्या शिक्षणावर आणि व्यवसायावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमचे नशीब तुम्हाला साथ देणार नाही आणि तुम्ही दडपणाखाली असाल.

उपाय – दोन झाडू धर्मस्थानात दान करावेत.

५ – सिंह राशीच्या लोकांसाठी राहू आठव्या भावात आणि केतू दुसऱ्या भावातून गोचर करेल.राहु केतूचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी अडचणींनी भरलेले असू शकते,तुम्हाला पैशाची कमतरता,पैशाशी संबंधित भांडणे,घरात/कुटुंबात अशांतता आणि काही अचानक घटना घडण्याची शक्यता आहे.

जर तुम्ही संशोधन कार्य,ज्योतिषशास्त्र,सकारात्मक तंत्र/मंत्र विद्या इत्यादींमध्ये गुंतले असाल तर हे गोचर संक्रमण तुमच्यासाठी रहस्याचे पदर उघडण्यास सक्षम असेल,परंतु जर तुम्ही जुगार,सट्टा आणि गैरकृत्यांमध्ये गुंतलेले असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगा,कोणताही समाज घातक काम किंवा चुकीचे काम तुम्हाला अडकवू शकते.

उपाय – खोटे सिख्खे,चलनातून बंद केलेलं २५/५० पैशांची नाणी जल प्रवाहित करावेत.

६ – कन्या राशीच्या लोकांसाठी राहू सातव्या भावात आणि केतू लग्न भावातून गोचर करेल.कन्या राशीच्या लोकांसाठी राहू आणि केतू संघर्षाची स्क्रिप्ट लिहित आहेत,काळ आहे.तुमच्या वैवाहिक जीवनात आणि व्यवसायावर संघर्ष होईल. तुम्ही धावपळीत व्यस्त असाल. कागदोपत्री कामात वेळ वाया घालवावा लागेल. तुम्ही स्वतःवर प्रेम कराल किंवा तुमच्या स्वतःच्या कामगिरीवर समाधानी नसाल.

उपाय – ६ नारळ शेंडीसहित असलेले आणि वाळलेले जल प्रवाहित करावेत.

७ – तूळ राशीच्या लोकांसाठी राहू सहाव्या भावात आणि केतू व्ययातून गोचर करेल.सहाव्या स्थानातून राहूचे गोचर संक्रमण चांगले मानले जाते,राहू सहाव्या स्थानात एकदम comfortable असतात,शत्रूहांत योग,कर्जातून मुक्तता,आजारावर मात होईल.तूळ राशीसाठी हे गोचर अद्भूत ठरणार आहे,गेली दोन अडीच वर्षांपासून भोगत असलेले भोग,कर्ज,रोग,शत्रू ह्यापासून मुक्तता मिळेल.ज्यांच्या जन्म कुंडलीत शनि आणि राहूची स्थिती शुभ,बलवान आहे त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी येण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेसाठी चांगला काळ. नोकरी शोधणारे यश मिळेल.नोकरीत बदल होईल.तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्येही यश मिळू शकते. ज्या महिलांना संतती हवी आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे.दुसरीकडे,व्ययातील केतू तुम्हाला मोक्षाच्या भावनेने आध्यात्मिक जीवनातही पुढे नेईल.ह्या अठरामहीन्यात जास्तीजास्त धर्तमीक राहण्याचा प्रयत्न करावा,आचरण करावे.

उपाय – ४३ निळे फूल जमिनीत गुरुवारी संध्याकाळी दाबावेत आणि खोदकामाचे सामान तिथेच टाकून यावे.

८ – वृश्चिक राशीसाठी राहू पाचव्या स्थानातू तर केतू अकराव्या भावातून गोचर करेल.

तुमची बुद्धिमत्ता सातवे अस्मान पे म्हणतात तशी राहील,तुमच्या बुद्धिमत्तेला सट्टा, जुगार किंवा शेअर बाजारातून पैसे कमविण्याचे व्यसन लागू शकते,काळजी घ्या,सावध राहावे,आहारी जाऊ नये.प्रेम प्रकरणे तुमच्या बुद्धिमत्तेवर वर्चस्व गाजवू शकतात.तुम्हाला पैसा किंवा नफा मिळण्यास विलंब होऊ शकतो.तुम्हाला जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतील.तुम्ही कुटुंब साठी खास आहात.तुमच्या आरोग्याची काळजी घेणे उचित आहे.

उपाय – ५ मुळे ५ दिवस दान करावे.चांदीचा चौकोन तुकडा मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याखाली दाबून ठेवावा.

९ – धनु राशीच्या लोकांसाठी राहू चतुर्थ भावात आणि केतू दशमतून गोचर करेल.राहू केतूचे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी चढ-उताराचे असू शकते,तुमचे मन कामात कमी असेल,तुमची उर्जा तुमच्या आई आणि घराच्या मालमत्तेवर केंद्रित राहील, तुम्ही चिंतांनी त्रस्त असाल.स्थानांतर होऊ शकते(कराच).

उपाय – एका शनिवारी ४ वाळलेले नारळ जल प्रवाहित करावेत.राहत्या घराचे कसलेही रिनोवेशन करू नये.

१० – मकर राशीच्या लोकांसाठी राहू तृतीय भावात आणि केतू नवमातून गोचर करेल.मकर राशीच्या लोकांसाठी राहु केतूचे संक्रमण तुमचे शौर्य आणि बुद्धिमत्ता वाढवेल. तुम्ही साम,दाम,दंड,भेद वापरण्यास सुरुवात कराल,तुम्ही धार्मिक यात्रा कराल,तुमच्या वडिलांना काही चिंता असू शकतात.हे संक्रमण तांत्रिक कामात गती देईल आणि विक्री वाढवेल,जे काम कराल ते आश्चर्यकारक असेल.

उपाय – तंबाखू,मोहरी दान करावेत.हस्ती दंती वस्तू घरात ठेवू नये.

११ – कुंभ राशीच्या लोकांसाठी राहू द्वितीय भावात आणि केतू अष्टमातून गोचर करेल.कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या कामानुसार फळ मिळेल.जे लोक भाषण किंवा टेलीमार्केटिंग किंवा संशोधन कार्यात गुंतलेले आहेत त्यांना लाभ मिळतील.एकंदरीत,हे संक्रमण तुम्हाला कठोर परिश्रम आणि आत्मसंयमाने लाभ देईल.

उपाय – चांदीची गोळी सुती कपड्यात शिवून खिशात ठेवावी,गळ्यात धारण करावी.केसर/हळद ह्याचा टिळा कपाळावर दररोज लावावा.

१२ – मीन राशीच्या लोकांसाठी राहु लग्नात आणि केतू सप्तम भावातून गोचर भ्रमण करतील.हा काळ तुमच्यासाठी नवीन आव्हाने देईल.तुम्ही जितके जास्त देव आणि कुलदेवतेचा आश्रय घ्याल तितके तुम्ही टिकून राहाल. तुमच्या इच्छा अपूर्ण राहतील. आणि खर्च वाढतील.तुम्ही विवाहित असाल तर जीवनसाथीकडून उदासीनता आणि भ्रम निर्माण होऊ शकतो.

उपाय – गळ्यात चांदीची चैन धारण करावी.गुळ,गहू,तांबे मंदिरात दान करावे.

शुभम भवतु,

7c3a19bdab9b42ad7ba850f8ff9e75b3
  • Images (2)
  • half moon at nighttime
  • Download (3)
  • vedashree jytish
  • Screenshot 20230108 191753
  • Screenshot 20230108 191734
  • Screenshot 20230108 191717
  • Screenshot 20230108 191605
  • Screenshot 20230108 191649
  • Makar Sankranti | मकरसंक्रांती 2023 कशी आहे मकरसंक्रांती या वर्षीची
  • shani dev
  • Kundali1 1547094032
  • shani dev
  • Whatsapp Image 2022 05 19 At 9.53.44 Pm
  • Whatsapp Image 2022 05 19 At 10.03.45 Pm
  • Whatsapp Image 2022 05 19 At 9.58.00 Pm
  • Whatsapp Image 2022 05 19 At 10.20.34 Pm
  • Whatsapp Image 2022 06 14 At 10.48.35 Pm
  • Whatsapp Image 2022 05 19 At 10.22.14 Pm
  • Whatsapp Image 2022 06 02 At 5.23.49 Pm
  • Whatsapp Image 2022 06 02 At 5.23.49 Pm
  • Whatsapp Image 2022 04 29 At 3.04.04 Pm

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *