ॐ हे अक्षर श्रेष्ठ आहे.
Om

ॐ हे अक्षर श्रेष्ठ आहे.

ओंकाराचा उच्चार सहजपणे करता येतो व दिर्घ काळ पर्यंत करता येऊ शकतो. त्यावर मन लवकर स्थिर होते. हे अक्षर मधुर आहे व त्याच्या उच्चाराने शांती प्राप्त होते. ॐ हे अक्षर ब्रह्म आहे. जो याचे ध्यान करून त्याचे महत्त्व जाणून घेतो तो परमेश्वराला जाणून घेतो व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आत्मा कशातुनही उत्पन्न होत नाही, त्याच्यापासून कांहीं उत्पन्न होत नाही. तो नित्य, शाश्वत आणि क्षय किंवा वृद्धी रहित आहे.

हे नचिकेता, परमात्मा जीवाच्या ह्रदयात अणुपेक्षा सूक्ष्म रुपात राहतो. निष्काम कर्म करणारा साधकचं त्याला जाणू शकतो. दुष्कर्मे करणारा, भोग, सांसारिक मोहात फसलेल्या माणसाला आत्मतत्व समजु शकत नाही. जीवात्मा, परमात्मा यांना सावली व प्रकाश म्हणतात. प्रकाशाने सावली बनते, प्रकाश नसेल तर सावली नसते. सावली म्हणजे अंधार नव्हे. सावली म्हणजे जीवात्मा व प्रकाश म्हणजे परमात्मा. शरीर जीवात्म्याचा रथ आहे, बुद्धि सारथी आहे व मन लगाम आहे. व आत्मा जेव्हा इंद्रिये व मनाशी जोडला जातो तेव्हा तो भोक्ता होतो. जसा सारथी घोडे नियंत्रणात ठेवतो तसे ज्याचे मन संयमी आहे तो इंद्रियांना नियंत्रणात ठेवतो.

🕉 हे अक्षर सृष्टी निर्मितीच्या वेळेला प्रथम उच्चारण केलेले अक्षर आहे.


वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन नांदेड.
वैभव गुरू डंख नांदेड.
9960223870

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *