कार्यसिद्धी प्रयोग Kary Siddhi Ke Tin Prayog
कार्यसिद्धी प्रयोग
कोणतेही कार्य व्हावे म्हणून ग्रहण काळ किंवा पर्वकाळी (होळी किंवा दिवाळी) कार्य सिद्धी मंत्राने प्रतिष्ठित केलेले ५१ शंखचक्र घ्यावेत. त्याची पंचोपचार पद्धतीने साधारण प्रकारे पूजा करावी. तत्पूर्वी त्याची एक ढेरी व वर अंगठाभर अशी उंची येईल अशी रचना करावी. त्यानंतर एक महिन्यापर्यंत जितेन्द्रिय व संयमित राहून निरन्तर एक महिना ‘ॐ पंचान्तकं ॐ अन्तरिक्षाय स्वाहा ।’ मंत्राने भक्तिपूर्वक लाल हकीकच्या माळेने जप करावा. असे केल्याने कार्य सिद्ध होईल.
कार्यात सफलता मिळावी म्हणून
जर तुमची कार्ये सहजतेने सफल होत नसतील, कार्य करण्यात अडचणी जास्त व सतत येत असतील तर कोणत्याही शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी हा प्रयोग करावा. सकाळी ६ ते ९ च्या दरम्यान सूर्यदेवाच्या समोर तोंड करुन उभे राहा. मग सूर्यदेवाला नमस्कार करुन ‘ॐ हीं घ्राणि सूर्य आदित्य श्री’ मंत्र म्हणत वडाच्या दुधाचा तिलक आपल्या मस्तकी लावावा. मग सूर्यदेवाला पाणी वाहावे. पाण्यात साखर तसेच थोडे दूध घालावे. हा प्रयोग सातत्याने एक सप्ताह करावा. यामुळे लवकरच सफलता प्राप्त होते.
कार्यात सफलता मिळावी म्हणून
जर तुम्ही एखाद्या विशेष कामासाठी जात आहात तर निळ्या रंगाचा धागा घ्यावा आणि घरातून बाहेर पडावे. घरातून बाहेर पडल्यावर जो तिसरा खांब लागेल, त्यावर आपले काम बोलून तो धागा बांधावा. काम होण्याची शक्यता वाढेल.