kundali janm kundali

बृहस्पति नवम भावामधे | तुमच्या जन्म कुंडलित कोणत्य स्थानात आहे?


शुभ फळ नवव्या भावात गुरु असल्याने जातक धार्मिक, खरे, बोलणारा, नीतिवान, विचाराी आणि सन्माननीय असतो. जातक शांत स्वभावाचा आणि सदाचारी असतो – उच्च विचारांचा असतो. तीर्थयात्रा आणि देव-गुरु-ब्राह्म. यांच्यावर श्रद्धा ठेवतो. तसेच जातकाला पुण्यकर्मा बनवतो. जातक साधुंच्या सहवासात रहाणारा, भक्त, योगी, वेदान्ती, शास्त्रज्ञ, इच्छा तसणारा आणि ब्रह्मवेत्त असतो. जातक तपस्वी म्हणजे तपश्चर्या करणारा असतो. हा ज्ञानी, सर्वशास्त्रज्ञ, विद्वान, स्वत:च्या कुलाचे आचार पाळणारा आणि कुळाला पुघेऊन जाणारा असतो. सर्व शास्त्र आणि कला यांचापूर्णत: अभ्यास करणारा व्रती आणि देव-पितृ भक्त असतो. जातक तीर्थयात्रा आणि धार्मिक कार्यांची आवड असणारा असतो. पराक्रमी, यशस्वी, विख्यात, मनुष्यामधे श्रेष्ठ, भाग्यवान, सज्जन स्वभावाचा असतो. जातक खूप यज्ञ करतो. 35 व्या वर्षी देवयज्ञ करतो. नवम बृहस्पति अध्यात्मज्ञान आणि योगाभ्यासाचे द्योतक आहे. अंतर्ज्ञान किंवा भविष्याचे ज्ञान प्राप्त होते. न्यायकार्य लेखन इत्यादिसाठी गुरु शुभ आहे. जातकाला घराचे सुख पूर्णपणे मिळते. जन्मलग्नापासून नवव्या स्थानी बृहस्पति असल्याने जातकाचे घर चार मंजली किंवा चार चौकाचे असते. बृहस्पति नवव्या भावात असल्याने जातकाचे घर पिवळे-लाल-हिरव्या रंगाचे, चौकोनी व चारमजली असते. जातक राजाचा आवडता असतो. जातकावर राजाची कृपादृष्टी असते. जातक राजमंत्री, राजमान्य, नेता किंवा प्रधान असतो आणि अनेकांचा पालनकर्ता किंवा स्वामी असतो. राज्य आणि समाजात सन्मानित असतो व प्रसिद्धही होतो. धनवान, श्रीमंत असतो. सर्वप्रकारची संपत्ती वाढते. राजासारखे ऐश्वर्य मिळते. जीवनभर सुख मिळते. स्त्रियांचा प्रिय असतो. जातकाचे पिता दीर्घायुषी असतात, चांगले काम करतो म्हणून खूप आदर व सन्मान मिळते. नवव्या स्थानातील बृहस्पतिमुळे हत्ती-घोडे इत्यादि वाहनांचे सुख मिळते. जातकाला भावंड व नोकर-चाकर खूप असतात. जातकाला भावंडे जातकापुढे विनीत व विनम्रपणे आचरण करतात. जातकाला कायद्याचे काम, क्लार्कचे काम, धार्मिक विषय, वेदांत, दूरच्या प्रवासाने लाभ होतो. विवाह संबंधामुळे जे नविन नातेवाईक होतात, त्यांच्याकडून सुख मिळते, नवमभावाचा गुरु भावंडाबरोबर एकत्र कुटुंबात रहाण्यास अनुकूल नसतो. – एकत्र राहून दोन्ही भाऊ प्रगती करु शकत नाहीत.
गुरु मेष, सिंह, धनु किंवा मीनेत असल्यास, जातक एम. ए., पी एच डी, इत्यादि उच्च पदव्या मिळवतो. या व्यक्तिस प्रोफेसर, उपकुल गुरु इत्यादि पद प्राप्त होते.

अशुभफल जातक कोणतेही कार्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत तडीस नेण्याच्या आळशीपणाने ते सोडून देणे हा जातकाचा स्वभाव असतो. जातक आळशीपणामुळे धर्मात उदासीन असतो, म्हणजेच नित्यकर्म जसे संध्या वंदना करणाचाही कंटाला येतो. गुरु पीडित असल्याने वरवरचा देखावा तसेच वृथा अभिमान असतो. वाह्यात वागणुकीने जातकाची बेइज्जती होते. नवव्या स्थानातला गुरु पुत्र-चिंता देतो. पुत्र होतो, जिवंत रहात नाही. पुत्राची काळजी वाटत रहाते. जिवंत राहिला, तर उच्श्रंखल तसेच विरोधी व्यवहार करणारा असतो. पुत्राची चिंता वाटतच रहाते. सुशिक्षित असतो, परंतु वागणे चांगले नसते. पुत्राची चिंता वाटतच रहाते. नवम स्थान पितृस्थान आहे. परंतु ‘मातेचा मृत्यु होतो.’ बृहद्यवनजातकाचे हे फळही शक्य आहे. माता-पिता दोघांचाही मृत्यु शक्य आहे.
गुरु पुरुष राशित असल्याने बहिण-भावांसाठी इष्ट नाही – भाऊ बहिणी कमी असतात.
पुरुष राशिचा गुरु अल्प संतति (पुत्र) देतो. एक किंवा दोन पुत्र, मुलींनंतर होतात.

ग्रहों के उपाय

स्तोत्र

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *