गोमती चक्र के टोटके लाभ दायक फायदे | गोमती चक्र उपाय gomati-chakra-laabh-or-upay

गोमती चक्र हा चमत्कारिक असा दगड आहे. तो नदीत सापडतो. अनेक तांत्रिक कामात त्याचा
उपयोग केला जातो. उदा. आजारापासून मुक्तता, मानसिक शांततेसाठी, घरात बाहेरील
बाधा निवारणासाठी, व्यवसायातं यश येण्यासाठी, कार्यसिद्धीसाठी, व्यवसाय वृद्धीसाठी
११ गोमती चक्र, सहा हकिक खडे, ह्या दोन्ही वस्तू तुमच्या नावांवर अभिषेक करुन
एकत्र उत्तर दिशेला ठेवणे. सदर तोडगा ठेवल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला फरक
जाणवेल.

गोमती चक्राचे माहात्म्य आणि उपयोग

गोमती चक्र ही एक विशिष्ट प्रकारची वस्तु असते जी तांत्रिक क्रियाकर्मांमध्ये
अतिशय उपयोोगी सिद्ध झालेली आहे. ही वस्तू सुद्धा पाण्यातूनच निर्माण होते आणि
निसर्गात आढळून येते गोमती चक्राला सिद्धीदायक व जागृत करण्यासाठी बुधवारी
खाटेवरती पिवळ्या मोहरीवर स्थापित करून दिव्याने त्याला ओवाळून खालील मंत्राचा
जप करावा.

॥ ॐ ही लक्ष्मी दुभाग्य नाशिनी सौभाग्यप्रदायिनी श्री स्वाहा ।। या मंत्राचा दहा
हजार वेळेस जप केल्यावर हे सिद्ध होते. दिवसातून एक हजार जप पोवळ्याच्या माळेने
करावा.
गोमती चक्राचे विविध तोडगे

१) जर एखादा रोगी असाध्य रोगाने आजारी असेल तर गोमती चक्र त्याच्या
उशीखाली दाबून ठेवावे. यामुळे काही दिवसांतच रोग्याच्या रोग दूर होऊ लागतो.

२) रविवारच्या दिवशी गोमती चक्रावर थोडसे कुंकू लावून आपल्या शत्रूचे नाव
ध्यावे आणि हे चक्र वाहत्या पाण्यात नदीत किंवा तलावात सोडावे. शत्रू पराजित होईल.

३) एखाद्या विशेष कामासाठी बाहेर जाणार असाल तर गोमती चक्र दरवाजाजवळ
गालिच्याखाली ठेवावे. आणि बाहेर निघताना डाव्या पायाने दाबावे सरळ घराबाहेर निघावे.

४) धन प्राप्तीसाठी :- चार गोमती चक्र, चार तपकीरी कवड्या पाण्यात रात्रभर
बुडवून ठेवावे. सकाळी धुवून पुसून धूपदीपाने ओवाळून आपल्या तिजोरीत ठेवावे.
या उपायाने धनप्राप्ती होऊ लागेल.

५) धनामध्ये सतत वृद्धी होत राहावी म्हणून :- एकादशीच्या दिवशी रात्री
अकरा वाजता वर दिल्याप्रमाणे ५ गोमती चक्राची पूजा करावी आणि त्यावर नेहमी
केशराचा तिलक लावावा. व तिजोरीत ठेवावे. यामुळे धनवृद्धी सातत्याने होत राहील.

६) भूत-प्रेत आणि दुष्ट आत्मांपासून मुक्ती मिळविण्यासाठी :- ज्या जातकांवर
भूताखेतांचे सावट आहे अशा जातकांनी २ गोमती चक्र व २ पंचमुखी रुद्राक्ष घेऊन
स्वतःवरून सात वेळेस उतरवावे आणि आगीमध्ये जाळावे यामुळे त्यांना भूत-प्रेत
दुरात्मांपासून मुक्ती मिळेल.

७) शीघ्र रोग मुक्ती होण्यासाठी :- जर घरातील कोणाचा रोग किंवा ताप बरा
होत नसेल तर गोमती चक्रामध्ये एक चांदीचा तुकडा बसवावा आणि तो त्या रोग्याच्या
पलंगाच्या एका पायाला बांधावा यामुळे ताबडतोब रोगमुक्ती होईल.

८) व्यापारात सफलता मिळावी म्हणून :- २ गोमती चक्र दोन पारा भरलेल्या
कवड्या घेऊन त्यांना आपल्या कार्यालय किंवा दुकानाच्या मुख्य दरवाजावर अशा प्रकारे
लावावे जेणेकरून ग्राहक त्याच्याखालूनच ये-जा करतील तुमचा व्यापार यामुळे खूप
चालेल.

९) पदोन्नतीसाठी :- एखाद्या शुभ मुहूर्तावर सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर
पाच गोमती चक्र, पाच तपकिरी कवड्या पूर्ण श्रद्धेने अर्पण करावे निश्चितच तुमची
पदोत्रती होईल.

१०) पारिवारिक कलह दूर करण्यासाठी तीन गोमती चक्र घराच्या दक्षिण
दिशेला ‘हालान वलंजाद’ हा मंत्र म्हणून स्थापन करावेत. यामुळे तुमच्या घरातील कलह. दूर होऊ लागतील. व तीन पिवळ्या कवड्या वाहत्या पाण्यात सोडणे

११) संतानप्राप्ती व्हावा म्हणून :- पाच गोमती चक्रांना वाहत्या नदीच्या
पाण्यात सोडावे. प्रत्येक वेळेस प्रवाहित करताना खालील मंत्राचा जप करावा. “हिली-
मिली, मिली-मिली, चिल्ली-चिल्ली हल” यामुळे निश्चितच संतानप्राप्ती हाते.

१२) वारंवार गर्भपात होत असेल तर :- एखाद्या स्त्रीचा वारंवार गर्भपात होत
असेल तर दोन गोमती चक्र घेऊन लाल कपड्यात बाधून गर्भवती झाल्यावर ते तिच्या
कमरेला बांधून ठेवावेत. व पूजेत संतानप्राप्ती यंत्र व गर्भ रक्षायंत्र ठेवावे व संतान गोपाल
स्तोत्र वाचावे.

१३) शत्रूचा प्रभाव कमी करण्यासाठी :- जर शत्रूचा प्रभाव वाढत असेल तर
तीन गोमती चक्र घेऊन शत्रूचे नाव घेत पहाटे पहाटे जमिनीमध्ये पुरावेत. आणि मागे
वळून न पाहता आपल्या घरी यावे. शत्रूचा पराभव होऊ लागेल. शत्रु वशिकरण यंत्र
नेहमी जवळ ठेवणे.

१४) कोर्टात केस जिंकण्यासाठी :- दोन गोमती चक्र व एक काळी हळद घेऊन
आपल्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या खाली ते पुरावेत. आणि कोर्टात तारखेसाठी
जाताना ते आधी डाव्या पायाने दाबावेत व उजवा पाय सरळ बाहेर टाकावा असे केल्याने
कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने लागेल.

१५) भाग्य उजळावे म्हणून :- तीन गोमती चक्रांचे व तीन तपकीरी कवड्यांचे
चूर्ण बनवावे आणि ते आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पुरावे, तुमचे भाग्य उजळू
लागेल.

१६) सन्मान प्राप्त करण्यासाठी :- दोन गोमती चक्र व दोन पांढऱ्या कवड्या
कुलदैवातेचे स्मरण करून वाहत्या पाण्यात सोडणे.

१७) शक्तीप्रदान होण्यासाठी :- चैत्र महिन्यातल्या नवरात्रामध्ये सप्तमी, अष्टमी
आणि नवमीच्या दिवशी गोमती चक्र सोनेरी धाग्यात बांधून तो धागा सूर्योदयाच्या वेळी
आपल्या उजव्या हातावर बांधावा. ह्याच दिवसांमध्ये गोमती चक्र चांदीमध्ये धारण
केल्यावरही हीच इच्छा पूर्ण होते.

१८) वास्तुदोष निघावा म्हणून :- एक मोठे गोमती चक्र आपल्या घर किंवा
व्यवसायाच्या मुख्य दरवाजावर लावावे. व सोबत दोन पारा भरलेली कवडी तिजोरीत
ठेवणे.

१९) मंगळ ग्रहाचा दोष जाण्यासाठी :- मंगळवारच्या दिवशी एक गोमती
चक्र गणपतीच्या सोंडेवर वाहावे आणि आपल्या देव्हाऱ्यात उजव्या बाजूला ठेवावे हे
काम मंगळवारच्या पहाटे करावे. मंगळवारी एखाद्या गाईला गूळ पोळी खाऊ घातल्यास
विवाहानंतरच्या किंवा विवाहपूर्वीच्या सर्व बाधा दूर करतात.

२०) व्यापार वाढण्यासाठी : सात गोमती चक्र घ्यावेत आणि तीन वेळेस
खालील मंत्र म्हणत स्वतःवरून उतरवून घ्यावे मग ते आपल्या दुकानाच्या किंवा
व्यवसायाच्या स्थलाच्या खाली पुरावेत. एक सोनेरी पिरॅमिड गल्यात ठेवणे. मंत्र खालील
प्रकारे
“ओम अप्रतिचक्रे फट् विच्चै स्वाहा ।’
शनिवारच्या दिवशी हा प्रयोग करू नये.
२१) व्यापार वाढण्यासाठी तसेच विघ्न दूर होण्यासाठी एक प्रयोग
एखाद्या बुधवारी खाटेवर पिवळी मोहरी पसरवून त्यावर सहा पिवळ्या व सहा
कवड्या ठेवाव्यात. त्यासमोर दिवा लावून ठेवावा आणि खालील मंत्राचा जप
करावा

“ॐ ह्रीं लक्ष्मी दुर्भाग्यनाशिनी
सौभाग्य प्रदायिनी श्रीं स्वाहा ।।”

हा मंत्र आपल्या वेळेनुसार नेहमी जप करत जावा. ह्याचा एकूण दहा हजार मंत्र जप
झाला पाहिजे आणि रोज एक हजार मंत्राचा जप केल्यास १० किंवा १५ दिवसांमध्ये
प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. हळदीच्या माळेनेच जप करावा.
हा प्रयोग व्यापारात समृद्धी आणतो तसेच दारिद्रयनाश करतो. त्याचबरोबर एखाद्या
शत्रूने तुमचे व्यापारात नुकसान व्हावे म्हणून काही जादूटोणा, तांत्रिक किंवा उपाय केले
असतील तर त्याचे पण शमन करतो. हा एक सिद्ध प्रयोग आहे. आणि हा करण्यामुळे
सर्व व्यापारातील समस्या, अडचणी नक्कीच दूर होतात.

२२) प्रेमविवाहात अडचणी येत असतील तर खालील शाबर प्रयोग करावा.
शुक्रवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर पूर्वेला तोंड करून बसावे आणि पिवळ्या
खाटेवर दोन मुठी मोहरी, दोन गोमती चक्र, एक पांढरी हकीकाची माळ ठेवावी. आतां
खालील मंत्राचा जप करावा (२वेळा)
“बिस्मिल्लाह मुहम्मद पीर आवे
घोडे की सवारी पवन करे बैठा
मन को संभाले
अनुकूल बनावे
‘हाँ’ भरे कहो ऐका करे
मुहम्मद पीर की दुहाई
सबद सत्व पिण्ड सच्चा
फुरो मंत्र ईश्वरो वाचा”
ह्या मंत्राचा दोन वेळा जप करावा. आणि एक गोमती चक्र आणि एक मूठ मोहरीची

दाणे आपल्या घरात ठेवावेत. आणि दूसरे गोमती चक्र आणि राहिलेले मोहरीचे
दाणे दुसऱ्या (तुमच्या प्रियतमेच्या/प्रियकराच्या) घरी ठेवायला द्यावेत. (दोन विवाहेच्छु
व्यक्तीपैकी दोघांच्याही घरी एक एक गोमती चक्र आणि एक मूठ मोहरी ठेवावी.)
किंवा एक गोमती चक्र आणि अशी दोन स्वतंत्र पाकीटे करून पूजेत ठेवावीत व
पूजा झाल्यावर दोघांनी आपापल्या घरी एक एक पाकीट जवळ ठेवावे. ह्या प्रयोगामुळे
निश्चितच प्रेमविवाह निर्विघ्नपणे आणि त्यांच्या मनाप्रमाणे संपन्न होईल.
गोमती चक्र हे स्वतःच एक शक्तीशाली यंत्र आहे म्हणून याचा उपयोग सावधगिरीने
आणि सांगितलेल्या पद्धतीनेच करावा. जर योग्य पद्धतीने उपाय केल्यास निश्चितच याचे
मनोवांछित फळ मिळते.

Related Products

२३) एक विशेष धन मिळवून देणारा उपाय
दिवाळीच्या दिवशी अथवा ज्या रविवारी पुष्य नक्षत्र असेल अशा दिवशी ज्याला
प्रयोग करायचा आहे त्यानी लवकर उठून दात न घासता आंघोळ वगैरे न करता एका
नारळाबरोबर गोमती चक्र दगडाला बांधून तलावात बुडवावे. बुडवाताना अशी प्रार्थना
करावी की हे लक्ष्मी माते, संध्याकाळी मी तुम्हाला ह्यांच्या बरोबर घ्यायला येईन.
संध्याकाळी परत जाऊन त्याच तलावात तेच नारळ आणि गोमती चक्र घेऊन घरी यावे
आणि गोमती चक्र तिजोरीत किंवा कोठी घरात ठेवावे. तुम्हाला पूर्ण पुढचे वर्षभर कायम
भरपूर धन लाभ होत जातो. gomati-chakra-laabh-or-upay

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *