श्री सूर्य स्तुती | SURYA GRAH UPAY

kundali janm kundali

श्री सूर्य स्तुती | SURYA GRAH UPAY

Whatsapp Image 2022 05 19 At 10.20.34 Pm

जयाच्या रथा एकची चक्र पाही | नसे भूमि आकाश आधार कांही || असे सारथी पांगुळा ज्या रथासी | नमस्कार त्या सूर्यनारायणासी || १ ||
करी पद्म माथां किरीटी झळाळी | प्रभा कुंडलांची शरीरा निराळी || पहा रश्मि ज्याची त्रिलोकासी कैसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || २ ||
सहस्रद्वये दोनशे आणि दोन | क्रमी योजने जो निमिषार्धतेन || मन कल्पवेना जयाच्या त्वरेसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ३ ||
विधीवेदकर्मासी आधारकर्ता | स्वधाकार स्वाहादि सर्वत्र भोक्ता || असे अन्नदाता समस्तां जनांसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ४ ||

युगें मंत्रकल्पांत ज्याचेनि होती | हरीब्रम्हरुद्रादि ज्या बोलिजेती || क्षयांती महाकाळरूप प्रकाशी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ५ ||
शशी तारका गोवुनी जो ग्रहाते | त्वरें मेरू वेष्टोनिया पुर्वपंथे || भ्रमें जो सदा लोक रक्षावयासी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ६ ||
समस्ता सुरांमाजी तू जाण चर्या| म्हणोनिच तू श्रेष्ठ त्या नाम सूर्या || दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ७ ||
महामोह तो अंधकारासि नाशी | प्रभा शुद्ध सत्वाची अज्ञान नाशी || अनाथां कृपा जो करी नित्य ऐसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ८ ||
कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची | न पाहू शके शत्रु त्याला विरंची || उभ्या राहती सिद्धी होऊनी दासी || नमस्कार त्या सुर्यनारायणासी || 9 ||
फळे चंदने आणि पुष्पेकरोनी || पूजावें बरे एकनिष्ठा धरोनी || मानी इच्छिले पाविजे त्या सुखासी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || १० ||

नमस्कार साष्टांग बापा स्वभावे | करोनी तया भास्करालागि ध्यावे | दरिद्रे सहस्त्रादी जो क्लेश नाशी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ११ ||
वरी सुर्य आदित्य मित्रादि भानू | विवस्वान इत्यादीही पादरेणू | सदा वांछिती पूज्य ते शंकरासी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || १२ |||

Similar Posts

  • Prime Minister Shri Narendra Modi Ji : जानिए क्या कहती है माननीय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्र मोदीजी की कुंडली |

    क्या दिखाती है माननिय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्र मोदीजी की कुंडली जानिए | स्वयंसेवक से प्रधान सेवक , इसके बाद सीएम ( CM ) फिर पीएम ( PM ) का सफ़र प्रधानमंत्री मोदी जी की जन्म की सबसे बड़ी खासियत है, केंद्र स्थानों में पाच ग्रहों का उपस्थित होना , इससे भी बड़ा एक राजयोग है…

  • नक्षत्र — Nakshatrea

    01 — नक्षत्र: अश्विनी नक्षत्र देवता : अश्विनीकुमारनक्षत्र स्वामी : केतुनक्षत्र आराध्य वृक्ष : कुचलानक्षत्र पर्यायी वृक्ष : अडुळसाराशी व्याप्ती : ४ हि चरण मेष राशीमध्येनक्षत्र प्राणी: घोडानक्षत्र तत्व : वायुनक्षत्र स्वभाव : शुभपौराणिक मंत्र:अश्विनी देवते श्वेतवर्णो तौव्दिभुजौ स्तुमः|सुधासंपुर्ण कलश कराब्जावश्च वाहनौ ||नक्षत्र देवता मंत्र: १)ॐअश्विनी कुमाराभ्यां नमः२) ॐ अश्विभ्यां नमःनक्षत्र पीडाहर मंत्र:स्वर्वेद्यावश्वीनौ देवौव्दिभुजौ शुक्लवर्णकोlसर्वारिष्ट…

  • Mulank 1 मूलांक 1 का विवाह भाग्य का फल ?

    Mulank 1 मूलांक 1 का विवाह भाग्य का फल ? अपना मुलांक-भाग्यअंक कैसे पता करे ? यहाँ आपको मूल अंक अर्थात मूलांक बनाना बता रहे हैं। यह जन्म की तारीख सेबनाया जाता है। यदि किसी की जन्म तारीख न हो तो यह जन्म तिथि से भी बनाया जासकता है। मान लो किसी व्यक्ति की जन्म…

  • मिथुन राशी 2023 | Mithun Rashi

    Mithun Rashi | मिथुन राशीसाठी 2023 कसे असेल. चैत्रः- रविगुरु शुभयोगाचा उत्तम लाभ उठवाल. पूर्वार्ध नोकरी व्यवसायात छानच. पौर्णिमा पुत्रोत्कर्षाची. उत्तरार्ध आर्थिक व्यवहारांतून फसगतीचा. जगार टाळा. अमावास्येजवळ वाहन सांभाळा. गर्भवतींनी सांभाळा. वैशाख:- राशीतील शुक्रभ्रमण उत्तरार्धात सर्वार्थाने फलदायी. जनसंपर्कातून लाभ. व्यावसायिक उत्सव प्रदर्शने. नोकरीच्या मुलाखतींतून यश. सरकारी कामे. उत्तरार्धात जुगार नको. उधारउसनवारी जपा. ज्येष्ठ:- ग्रहांचे फील्ड…

  • Rahu ketu Gochar Badal, Rashi var Parinam राहू केतू गोचर ३० ऑक्टो २०२३

    राहू केतू गोचर ३० ऑक्टो २०२३ पासून पुढील १८ महिने राशीपरत्वे मिळणारे परिणाम – Rahu ketu Gochar Badal १ – मेष राशीच्या व्यक्तीसाठी राहु १२ व्या घरातून आणि केतू ६ व्या घरातून गोचर करेल. तुमचा प्रवास आणि सुखसोयींवर होणारा खर्च वाढू शकतो.जे लोक नोकरी बदलण्याचा किंवा घर बदलण्याचा विचार करत आहेत किंवा परदेशात सेटल करण्याचा…

  • Disha | Direction

    Disha दिशाओं की पहचानया दिशेची अधिपती देवता इंद्र आहे. इंद्राची पत्नी शची देवी, निवास स्थान अमरावती, वाहन ऐरावत (पांढरा हत्ती), आयुध वज. द्वारपाल नंदी व चंद्र पूर्व दिशा ही ऐलक्ष्मीस्थान आहे. या दिशेला पांढऱ्या रंगाचे अधिपत्य असते, अधिपती ग्रह सूर्य व रास मेष व वृषभ आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.