meen rashi 2023

Rashi fal 2024 2023 2022

मीन 2023 | meen rashi 2023

rashi-removebg-preview

चैत्रः- शुभग्रहांचे भ्रमण उत्तम राहील. पौर्णिमेपर्यंत मोठी दैवी प्रचिती अनुभवाल. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक भाग्योदय. पौर्णिमा वैवाहिक जीवनात जल्लोषाची. व्यावसायिक पतप्रतिष्ठा लाभेल. सूर्यग्रहणाजवळ चोरी.

वैशाख:- पूर्वार्धात संशयास्पद आर्थिक व्यवहार नकोत. व्यावसायिकांना पौर्णिमेपर्यंत वसुलीतून लाभ. घरात मंगलकार्ये ठरतील. वास्तुयोग आहेत. उत्तरार्धात कलाकारांचे मोठे भाग्योदय. पर्यटनाचे योग. अमावास्या सन्मानाची.

ज्येष्ठः- मंगळशुक्र सहयोग तरुणांना उत्तम फलदायी. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मोठे भाग्योदय. काहींना प्रसिद्धीयोग. उत्तरार्धात थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ. उत्तम विवाहयोग. अमावास्येजवळ लहान मुलांची काळजी घ्या. पूर्वार्धात घरात खर्चाचे प्रसंग. पौर्णिमा व्यावसायिक प्राप्तीची. सरकारी धोरणांतून फायद्याची. पुत्रोत्कर्ष धन्य करेल. उत्तरार्ध चैनीवर खर्च करेल. अमावास्येजवळ पित्तप्रकोप, नेत्रपीडा.

अ. श्रावणः- शनिमंगळ प्रतियुती पूर्वार्धात नैसर्गिक पाठबळ देणार नाही. शिस्त पाळा. पौर्णिमा नोकरीत भाग्योदयाची. पुत्रचिता जाईल. उत्तरार्धात कलाकारांचे भाग्योदय. अमावास्या खडतर प्रवासाची. नि. श्रावण:- साडेसातीच्या छाया रुंदावणार आहेत. पौर्णिमेपर्यंत संयमाने वाटचाल करा. बाकी उत्तरार्ध गुरुशी होणाऱ्या शुभयोगांतून तारक ठरेल. रेंगाळलेले आर्थिक व्यवहार होतील. तरुणांचे प्रश्न सुटतील. गॉडफादर भेटेल.

भाद्रपदः- शुभग्रहांची लॉबी पौर्णिमेपर्यंत उत्तमच साथ देईल. व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढेल. कोर्टप्रकरण सुटेल. पौर्णिमेजवळ अचानक धनलाभ. उत्तरार्धात जुगार टाळा. सूर्यग्रहणाजवळ वैवाहिक जीवनात वाद.

आश्विनः- कुयोगांची पार्श्वभूमी राहील. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक पातळीवर दक्षता बाळगाच. कागदपत्रे जपा. पौर्णिमा घरात कोणाच्या आजार, शस्त्रक्रीयेची. उत्तरार्ध तरुणांना शुभग्रहांचा राहील. अमावास्येजवळ वाहन जपा.

कार्तिक:- विशिष्ट कोर्टप्रकरणाचे गांभीर्य वाढू शकते. काहींना कर्ज प्रकरणांतून त्रास. पौर्णिमेजवळ दुखापती जपा. पौर्णिमेनंतर आर्थिक चिंता जाईल. नौकरीत वरिष्ठांचा अनुग्रह प्राप्त होईल. बदलीचे संकट जाईल. अमावास्या चैनीवर खर्चाची.

मार्गशीर्ष:- गुरुशी होणारे शुभयोग तारक ठरतील. घरात सुवार्ताचा भर राहील. वास्तुयोग येतील. तरुणांचे परिचयोत्तर विवाह. पौर्णिमेजवळ विशिष्ट बहुमान. उत्तरार्ध सरकारी बहुमान | देईल. अमावास्या गर्दीच्या ठिकाणी घातक.

पौषः- शुक्रभ्रमण बलवत्तर फळे देईल. पौर्णिमा मोठ्या यशाची. व्यावसायिक उपक्रम गाजतील. मंगळगुरु योग नोकरीत आसन बळकट करेल. उत्तरार्धात तरुणांचे स्पर्धात्मक यश. कर्जमंजुरी. अमावास्येजवळ फसवणूक टाळा.

माघः- पौर्णिमेपर्यंतचे ग्रहमान छानच. ओळखीतून मोठे लाभ. व्यावसायिकांना भागिदारीतून लाभ. स्त्रीवर्गास उत्तरार्ध अनारोग्याचा. गर्भवतींना अमावास्या विशिष्ट लक्षणं दाखवू शकते. अर्थातच पथ्ये पाळा.

फाल्गुन:- न दिसणाऱ्या चंद्रसूर्यग्रहणांचा प्रभाव राहील. पूर्वार्ध नोकरीतील घटनांतून प्रसन्न ठेवणारा. चंद्रग्रहणाजवळ चोरीनुकसानी जपा. उत्तरार्ध वैयक्तिक कलागुणांतून प्रसिद्धी देणारा. मात्र सूर्यग्रहणाजवळ | व्यावसायिक कामगार पीडा. नुकसानीचे प्रसंग.

Similar Posts

  • |

    Kaalsarpa dosh

    Kaalsarpa dosh | आपल्या कुंडलीत कालसर्प दोष आहे का? याचे परिणाम कसे होतात आणि त्या परिणाम ला कसे कमी करावे?जेव्हा लग्नामध्ये राहु व सप्तम भावामधे केतु असेल आणि त्याच्यामधे सर्व अन्य ग्रह असतील तर तो अनंत काळसर्प योग होतो. या अनंत काळसर्प योगाच्या जातकाला जीवनभर मानसिक शांतता मिळत नाही. तो सदैव अशांत, क्षुब्ध, गोंधळलेला, अस्थिर राहतो. बुध्दीहीन होऊन जातो

  • Gurucharitra 11 Adhyay | गुरुचरित्र 11

    ॥ श्रीमत् गुरुचरित्र ॥ अध्याय अकरावा – कथासार अध्याय अकरावा. श्री नृसिंहसरस्वतींचा जन्म फलश्रुती – संततीविषयी वाटणारी चिंता दूर होईल श्रीगणेशाय नमः । सिद्धमुनी नाम धारकाला म्हणाले – ‘ज्या विधवा स्त्रीने शनिप्रदोषव्रत केले तीच पुढच्या जन्मी अंबाभवानी म्हणून जन्मास आली. कारंजा गावातील माधव नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. यथावकाश त्यांना पुत्र झाला. तो जन्मतःच ‘ॐ…

  • gudipadwa 2025 kadhi,muhurta all in one: गुडीपाडवा कधी गुडी कशी कधी उभी करावी

    gudipadwa | गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती मराठी 2025. gudipadwa information in marathi रविवार, 30 मार्च 2025 महाराष्ट्र गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी गुढीपाडवा रविवार, 30 मार्च 2025 ला साजरा केला जाणार आहे. या वर्षी भारतातील…

  • Panchamukhi hanumankavach |॥ श्रीपञ्चमुखी हनुमत्कवचम् ॥

    Panchamukhi hanumankavach॥ श्रीपञ्चमुखी हनुमत्कवचम् ॥श्री हनुमान जी ऐसी देवता है जो हमेशा अपने भक्तों का संकट निवारण करके सब के ऊपर कृपा बरसाती है. श्री पंचमुखी हनुमान कवच पढ़ने से सभी भक्तों का कष्ट, दुख ,बाधा और अशोक परिणाम दूर होकर शुभ आशीर्वाद प्राप्त होता है.

  • Disha | Direction

    Disha दिशाओं की पहचानया दिशेची अधिपती देवता इंद्र आहे. इंद्राची पत्नी शची देवी, निवास स्थान अमरावती, वाहन ऐरावत (पांढरा हत्ती), आयुध वज. द्वारपाल नंदी व चंद्र पूर्व दिशा ही ऐलक्ष्मीस्थान आहे. या दिशेला पांढऱ्या रंगाचे अधिपत्य असते, अधिपती ग्रह सूर्य व रास मेष व वृषभ आहे.

  • |

    KUNDALITIL GRAH | कुंडलीतील ग्रह फल.

    तुमच्या कुंडलीत कोणत्या स्थानात आहे? कोणता ग्रह? जब सूर्य लग्न में हो,जातक के सिर पर बाल कम होंगे।बालों को पीछे की ओर कंघी करेंगे.जातक अहंकारी एवं स्वाभिमानी होगा। • चंद्रमा लग्न है,जातक सुंदर चेहरे और कोमल शरीर वाला होगा। लग्न में मंगल हो तोजातक लापरवाह, साहसी होगा।जिद्दी और गुस्सैल. • बुध लग्नेश,विनोदी,*बुद्धिमान,गुप्त विद्या में रुचि…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.