Rashi fal 2024 2023 2022

तूळ राशी साठी 2023 कसे असेल | Tula Rashi 2023

tula Rashifal 2023: तुला राशि वालों की शनि देव नए साल में चमकाएंगे किस्मत, खूब धनलाभ होगा.

rashi-removebg-preview

चैत्र:- सप्ताहात वाद टाळा. नोकरीतील शत्रुत्व सांभाळा. पौर्णिमेपर्यत शुक्रभ्रमणाचा लाभ. व्यावसायिक प्राप्ती. तरुणांना विवाहयोग. उत्तराध कटकटीचा. सूर्यग्रहण वृद्धांना जपण्याचे. भागीदारीतून त्रास.

वैशाख:- संमिश्र स्वरुपाचे ग्रहमान. अट्टाहास टाळा. उत्तरार्धातील शुक्रभ्रमण व्यावसायिक प्राप्तीतून छानच. विशिष्ट मानसन्मातून लाभ. प्रेमप्रकरणे सांभाळा. अमावास्येजवळ वेदनायुक्त आजार. गर्भवतींना त्रास.

ज्येष्ठः- मंगळशुक्रांची खेळी उत्तमच राहील. विनासायास कामे होतील. नोकरीतील घटना प्रसन्न करतील. विवाहयोग येतील. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात अचानक धनलाभ. उत्तरार्ध नवपरिणितांचे प्रश्न सोडवेल.

आषाढ :- मंगळहर्षल योगाचा उच्चदाब राहील. सतत भांडणाचे प्रसंग. मात्र पौर्णिमा व्यावसायिक पार्श्वभूमीवर अतिशय शुभसूचक. तरुणांना मुलाखतीतून यश. उत्तरार्धात महत्वाचे करारमदार. अमावास्या सरकारी जाचाची.

अ.श्रावणः- मोठ्या ग्रहांच्या कुयोगातही शुक्रभ्रमणाचा उत्तम प्रभाव. पौर्णिमा नोकरीत भाग्योदयाची. पौर्णिमा मोठे संकल्प पूर्ण करेल. उत्तरार्ध वक्री शुक्रभ्रमणातून सुवार्तातून सतत चर्चेत ठेवेल. नि.श्रावण:- बुधशुक्रांची वक्र स्थिती कुयोगावर मात करेल. एखादा नैतिक विजय मिळेल. पौर्णिमेजवळ स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. खेळाडू, कलावंतांचे मोठे भाग्योदय. उत्तरार्ध नोकरीतील नव्या जडणघडणींतून लाभ देणारा.

भाद्रपद:- शुक्रभ्रमण पौर्णिमेपर्यंत झगमगाट करेल. समारंभ थाटात साजरे होतील. विशिष्ट सरकारी कामे होतील. पौर्णिमेजवळ हातापायाच्या दुखापती. उत्तरार्ध वैवाहिक जीवनातून वादाचा. सूर्यग्रहण व्यावसायिक फसवणुकीचे.

आश्विन:- कुयोगांचा उच्चदाब राहील. कोणताही अट्टहास टाळा. वृध्दांनी जपावे. नवपरिणीतांनी घरात वाद टाळावे. गुरुशुक्राचा शुभयोग पौर्णिमेजवळ प्रसिद्धीयोगाचा. कलाकारांचे भाग्योदय. अमावास्येजवळ वेदनायुक्त व्याधी.

कार्तिकः- संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा. सरकारी नियम पाळा. पौर्णिमेजवळ खर्चाचे प्रसंग. उत्तर्राधात राशीच्या शुक्राचे एक छान पर्व राहील. मोठे आर्थिक लाभ. नव्या ओळखीतून लाभ. तरुणांना नोकरीच्या संधी. परियचयोत्तर विवाह.

मार्गशीर्ष:- गुरुशी होणारे योग मोठे चमत्कार घडवतील. पूर्वार्ध तरुणांना मोठा प्रेरक राहील. पौणिमेजवळ कलागुणांतून प्रकाशात याल. नोकरीत सन्मान. उत्तरार्ध छान प्राप्तीचा. महत्वाच्या गुंतवणुकी.

पौष:- मंगळगुरु शुभयोगातून पूर्वार्ध विशिष्ट वैयक्तिक उपक्रम झगमगाटात साजरा करेल. पौर्णिमेजवळ सुवार्ताची परंपरा राहील. उत्तरार्ध उत्तम विवाहस्थळे आणणारा. व्यावसायिक नवे पर्याय फलद्रुप होतील. अमावास्या यंत्रपीडा देणारी.

माघः- महिन्यातील एक नशीबवान रास राहील. प्रत्येक कामात सहज यश. व्यावसायिकांचे विक्रमी लाभ. पौर्णिमेजवळ तरुणांचे विवाह. उत्तरार्धात विचित्र घरगुती विरोध. घरात वृद्धांशी मतभेद.

फाल्गुनः- पूर्वार्ध नोकरीव्यवसायात उत्तमच. अपयश धुवून काढाल. पौर्णिमेचे चंद्रग्रहण गुप्तचितेचे. प्रिय व्यक्तीशी विसंवाद. बाकी राशीच शुक्रभ्रमण चाख बोलणारे. उत्तरार्धात व्यावसायिक मोठे लाभ. मात्र सूर्यग्रहणाजवळ शंकास्पद व्यवहार टाळा.

Similar Posts