वृषभ राशी | Vrushbh Rashi

Rashi fal 2024 2023 2022

Vrushbh Rashi | वृषभ राशीसाठी 2023 कसे असेल.

rashi-removebg-preview

चैत्र:- तरुणांना अतिशय सुंदर ग्रहमान शैक्षणिक संधी. सामाजिक पतप्रतिष्ठेचा लाभ. नौकरीत अपवादात्मक भाग्योदय. पौर्णिमेजवळ मोठ्या सुवार्ता. व्यावसायिक गुंतवणुकींतून लाभ. सूर्यग्रहणाजवळ प्रवासात सांभाळा.

वैशाख:- शुक्रभ्रमण पूर्वार्धात मोठे सांपत्तिक लाभ देईल. व्यावसायिक वसुली. चंद्रग्रहणाजवळ मातृपितृचिंता. उत्तरार्धात भावाबहिणींचे भाग्योदय. पर्ती वा पत्नीचा उत्कर्ष. अमावास्या घबाडयोगाची. मोठे लाभ.

ज्येष्ठः- मध्यस्थी टाळा. सार्वजनिक जीवनात आचारसंहिता पाळा. उत्तरार्धात मंगळशुक्र सहयोग तरुणांना धार्जिणाच. कलागुणांतून भाग्योदय. परियचोत्तर विवाह. अमावास्येजवळ चैनीवर खर्च. सहकुटुंब प्रवास. अनपेक्षित गाठीभेटी.

आषाढ:- पूर्वार्धात परिस्थितीचे पाठबळ राहणार नाही. पौर्णिमेनंतर वैयक्तिक सुवार्ता. घरात उंची खरेदी. पुत्रोत्कर्षातून धन्यता. वास्तुविषयक खरेदीविक्रीतून लाभ. अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात दुखापती जपा.

अ. श्रावण:- शनिमंगळाच्या प्रतियुतीचे एक फील्ड राहील. वादग्रस्त प्रकरणे चिघळू शकतात. काहींचे नोकरीतील स्थित्यंतर अस्वस्थता वाढवेल. बाकी पौर्णिमा शुक्रभ्रमणातून वैयक्तिक सुवार्तातून धन्यतेची. अमावास्या भातृचिंतेची. नि. श्रावण:- रविशनि प्रतियुतीचा अंमल पौर्णिमेपर्यंत राहील. घरात कोणाची आजार वा शस्त्रक्रीया. उत्तरार्धात गुरुशी होणारे शुभयोग संकटविमोचनाचे. तरुणांचे स्पर्धात्मक यश. अमावास्या गुप्तचितेची.

भाद्रपदः- पूर्वार्ध तरुणांना शैक्षणिक संधी देणारा. परदेशी भाग्योदय. शुक्रभ्रमण पौर्णिमेजवळ कलाकारांना प्रकाशात आणणारे. नूतन वास्तुप्रवेश. उत्तरार्ध शंकास्पद आर्थिक व्यवहाराचा. सूर्यग्रहणाजवळ गर्भवतींनी जपावे.

आश्विनः- विरोधी ग्रहस्थिती राहील. उधारउसनवारी सांभाळा. व्यावसायिक जुगार टाळा. सरकारी नियम पाळा.. मात्र गुरुशुक्राचा शुभयोग स्वतंत्र व्यावसायिकांना छानच. वैवाहिक जीवनात भाग्योदय मात्र विवाहेच्छुनी प्रेमप्रकरणात गुंतू नये. चंद्रग्रहण कुसंगतीचे.

कार्तिक:- शनिमंगळांचे योग कुरापती काढणारे. अपवादात्मक परिस्थितीचे भान ठेवून नियोजन करा. नोकरीत वरिष्ठांशी नमते घ्या. उत्तरार्ध बुधगुरु योगातून तरुणांच्या शैक्षणिक चिंता घालवेल. खरेदीविक्रीतून लाभ होईल.

मार्गशीर्ष:- मंगळाशी होणारा बुधाचा योग तारुण्यातील प्रश्न निर्माण करेल. प्रेमप्रकरणातील नैराश्य टाळा. पौर्णिमेजवळ व्यावसायिक जुगार टाळा. उत्तरार्धातील शुक्रभ्रमण सर्वंकष फलदायी होईल. नोकरीत प्रसन्नता लाभेल. अमावास्या चोरीची.

पौषः- पूर्वार्धात मंगळबुधाची स्थिती मनाविरुद्ध घटना घडवणारी. संयम ठेवा. वैवाहिक जीवन सांभाळा. उत्तरार्ध व्यावसायिक आडाखे यशस्वी करणारा. कर्जप्रकरणातून मुक्त व्हाल. विशिष्ट ग्रासलेली चिंता दूर होईल.

माघः- अतिशय छानच महिना. स्वतंत्र व्यावसायिकांचे उपक्रम यशस्वी होतील. पौर्णिमा जीवनातील मोठ्या सुवार्ता देणारी. मंगळशुक्र सहयोग विवाहयोगाचा. उत्तरार्ध नोकरीत त्रासाचा. वरिष्ठांचा विरोध.

फाल्गुन:- शुक्रशनि सहयोग व्यावसायिक महत्वाच्या कामांतून फलदायी होईल. वादग्रस्त व्यवहारांतून सुटका. नोकरीतील विशिष्ट सावट जाईल. चंद्रग्रहणाजवळ गर्भवतींनी सांभाळावे. उत्तरार्ध मित्रसंगतीतून अडचणींचा.

Similar Posts

  • | |

    Dhan Prapti

    Dhan Prapti | धन प्राप्ती केलीय राशी के अनुसार उपाय | कैसे मिलेगा धन इन उपायोसे? Dhan Prapti | धन प्राप्ती केलीय राशी के अनुसार उपाय | कैसे मिलेगा धन इन उपायोसे? ✅मेष राशि :-  1- रात में लाल चंदन और केसर घिसकर उससे रंगा हुआ सफेद कपड़ा यदि आप अपने गल्ले अथवा तिजोरी में…

  • Navratrti ghatasthapana

    नवरात्रीत आदिशक्तीचे चिंतन/स्मरण कशाप्रकारे करावे? Navratrti ghatasthapana Shardiya Navratri 2023: नवरात्रि पर इस शुभ मुहूर्त में करें रहे हैं तैयारी तो यहां पढ़ें संपूर्ण जानकारी शारदीय नवरात्र उत्सव तिथि प्रधान उत्सव असल्यामुळे दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रविवार रोजी दिवसभर प्रतिपदा तिथि असल्यामुळे कोणत्याही वेळेत घटस्थापना करता येते. तरीपण बऱ्याच भक्तांना चौघडिया मुहूर्त पाहून घटस्थापना करण्याची…

  • Shree Ram Ayodhya 2024 | श्री राम

    श्री राम प्रभु अयोध्या में आ रहे है 22 जानेवारी 2024 | रामोत्सव 2024 | shree Ram prabhu 2024 | श्री राम जन्म भूमि पर इस साल श्री राम प्रभु अपने भव्य सिहासन पर विराज मन होगे और अपने भारत को दिशा दिखायेंगे . 2024 या साल सभी श्री राम भक्तो केलिए, अत्यंत विशेष है |…

  • Gurucharitra 11 Adhyay | गुरुचरित्र 11

    ॥ श्रीमत् गुरुचरित्र ॥ अध्याय अकरावा – कथासार अध्याय अकरावा. श्री नृसिंहसरस्वतींचा जन्म फलश्रुती – संततीविषयी वाटणारी चिंता दूर होईल श्रीगणेशाय नमः । सिद्धमुनी नाम धारकाला म्हणाले – ‘ज्या विधवा स्त्रीने शनिप्रदोषव्रत केले तीच पुढच्या जन्मी अंबाभवानी म्हणून जन्मास आली. कारंजा गावातील माधव नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. यथावकाश त्यांना पुत्र झाला. तो जन्मतःच ‘ॐ…

  • gudipadwa 2025 kadhi,muhurta all in one: गुडीपाडवा कधी गुडी कशी कधी उभी करावी

    gudipadwa | गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती मराठी 2025. gudipadwa information in marathi रविवार, 30 मार्च 2025 महाराष्ट्र गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी गुढीपाडवा रविवार, 30 मार्च 2025 ला साजरा केला जाणार आहे. या वर्षी भारतातील…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.