महाशिवरात्री

महाशिवरात्रि ला हे व्रत केल्याने मह्देवाची भक्तांवर कृपा होते. MAHASHIVRATRI 2021

महाशिवरात्रीव्रत: ‘अर्धरात्रियुता यत्र माघकृष्णचतुर्दशी । शिवरात्रिव्रतं तत्र सोऽश्वमेधफलं लभेत् ।।’

महाशिवरात्रि चे व्रत  आणि संकल्प  MAHASHIVRATRI 2021

महाशिवरात्री  :- अर्थात ज्या अर्धरात्री माघ कृष्ण चतुर्दशी असेल त्या दिवशी उपवासपूर्वक शिवरात्रीव्रत करुन शिवपूजन केल्यास अश्वमेध यज्ञाहून अधिक फल मिळते. या दिवशी प्रदोषकाळी किंवा निशिथकाळी स्नान करुन भस्मधारण करावे व रुद्राक्षमाला धारण करुन शिवपूजनासाठीचा पुढील संकल्प करुनच शिवपूजन करावे. ॐ विष्णू; (३ वेळा म्हणणे), ॐ तत्सद् श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीयेपरार्द्ध श्रीश्वेतवाराहकल्पे जम्बुद्वीपे भारतवर्षे भरतखंडे आर्यावर्ते दंडकारण्येदेशे पुण्यक्षेत्रे कलियुगे कलिप्रथमचरणे शालिवाहनशके शार्वरी नामसंवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतौ माघ मासे कृष्ण पक्षे …..तिथौ अमुकवासरे …….नक्षत्रे …….योगे …….करणे …….राशीस्थितेचंद्रे …….राशीस्थितेसूर्ये …….राशीस्थितेदेवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशीस्थान स्थितेषु ……गोत्रोत्पन्नः …….नामाऽहं मम एतद्वर्षकृत समस्तपातकोपपातक प्रकीर्णकादि कायिकवाचिकमानस ज्ञाताज्ञातप्रकाशरहस्यपापस्य क्षयार्थं पुत्रधनदीर्घायु: प्रभृति सकल काम | अवाप्त्यर्थं शिवरात्र्यां शिवपूजनं करिष्ये । असे म्हणून उजव्या हातातील पाणी ताम्हणात सोडावे. त्यानंतर अधिकारपरत्वे वेदोक्त अथवा पुराणोक्त ‘श्री शिवाय नम:‘ या मंत्राने शिवलिंगाची यथासांग पूजा करावी. पूजेत शंकरास धोत्र्याचे फूल, बेलाचे पान वाहून घृतमिश्रित गुग्गुळाचा धूप दाखवावा नंतर आरती करुन पुढील मंत्राने ताम्हणात शंकरास उद्देशून तीन अर्घ्य द्यावेत

Maha shiv ratri
Maha shiv ratri

‘शिवरात्रीव्रतं देव पूजाजपपरायणः ।

करोमि विधिवद्दत्तं गृहाणायँ नमोस्तु ते ।।’

शेवटी ‘श्री रुद्राय नम:’ या मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेवर उत्तरेकडे तोंड करुन कमीत कमी १०८ वेळा जप करावा.वेगवेगळ्या प्रकारच्या शिवलिंग पूजनाचे फळ – स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – मनोरथ सिद्धि, चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – राज्यप्राप्ती व पितरांचा उद्धार, सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – सत्यलोक व लक्ष्मी प्राप्ती, हस्तीदंताच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – सेनापतित्व, तांब्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – पुष्टि व दीर्घायुष्य, पितळ्याच्याशिवलिंगाची पूजा केल्यास – तुष्टि, काशाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – कीर्ति, लोखंडाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – शत्रुनाश, शिश्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – दीर्घायुष्य, गंधाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – सौभाग्य, धान्यांच्या पिठापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास – पुष्टि, सुख, रोगनाश, उडदाच्या पिठापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास – स्त्रीप्राप्ती, लोण्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – सुख, गायीच्या शेणापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास – रोगनाश, गूळापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास – अन्न इ. प्राप्ती, बांबूच्या अंकुरापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास – वंशवृद्धि होते.

महाशिवरात्री व्रत MAHASHIVRATRI 2021

Hanuman jayanti 2021 | हनुमान जयंती 2021

Hanuman jayanti 2021 | हनुमान जयंती 2021

Holi 2021 | होळी २०२१

Holi 2021 | होळी २०२१

महाशिवरात्री

महाशिवरात्री

Similar Posts

  • Ratha Saptami 2021

      रथसप्तमी तथा भगवान सूर्यकी महिमा दि. 19 फेब्रुवारी 2021 Ratha Saptami 2021 ब्रह्माजी बोले-हे रुद्र! माघ मासके शुक्ल पक्षकी षष्ठी तिथिको उपवास करके गन्धादि उपचारोंसे भगवान् सूर्यनारायणकी पूजाकर रात्रिमें उनके सम्मुख शयन करे। सप्तमीमें प्रात:काल विधिपूर्वक पूजा करे और उदारतापूर्वक ब्राह्मणोंको भोजन कराये। इस प्रकार एक वर्षतक सप्तमीको व्रतकर रथयात्रा करे। कृष्णपक्षमें तृतीया तिथिको…

  • ज्येष्ठ मास | Jyeshtha montha

    ज्येष्ठ महिन्यात कोणते सन व व्रत करावे? या महिन्यातील सन कशे साजरे करावे? ज्येष्ठ दशहरा :- ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदे पासून दशमी पर्यंत दहा दिवस गंगास्नान , गंगापूजा गंगास्तोत्र पठण ,दान , होम, यापैकी शक्य ते करावे. शरीर ,वाणी मन यांचे कडून काळात नकळत होणारी पापे नष्ट होतात. निर्जला एकादशी :- या एकादशीला पानि सुद्धा प्राशन…

  • वैशाख माह 2026 वैशाख माह 2026 कब शुरू होगा? त्योहारों की पूरी लिस्ट Vaishakha

    वैशाख Vaishakha माह 2026 कब शुरू होगा? जानें सभी व्रत-त्योहारों की पूरी लिस्ट स महीने में जल दान का विशेष महत्व होता है,

  • hanuman jayanti 2024 | हनुमान जयंती 2024

    हनुमान जयंती 2024 मे कब है ओर कोनसा उपाय करे? इस उपाय दुख से मुक्त होगे| hanuman jayanti 2024 हनुमान जयंती 2024 | hanuman jayanti 2024 इस साल कि हनुमान जयंती सभी भारत वासियो केलीय महत्व पूर्ण है | इस साल मे श्री राम कि स्थापना इस साल मे अयोध्या मे हुई है | इस…

  • वैशाख मास | vaishakha montha

    कोणता सन कशा प्रकारे साजरा करावा? वर्षातील येणारे सन व व्रत याबदल पूर्ण माहिती. वैशाख मास अक्षय तुतीय गौरीहर दोलोत्सवाची समाप्ति अक्षय तुतियेस करावी, सुवासिनिस भोजनास बोलावून सत्कार करावा . या दिवशी कृत युगाचा आरम्भा झााल्या मुळे याला युगादी म्हणतात . या दिवशी पिताराचे श्राद्ध करतात . अक्षय तुतियेस जप , दान, होम , केल्याने…

  • सण-व्रत चैत्र | Hindu Festival

    कोणता सन कशा प्रकारे साजरा करावा? वर्षातील येणारे सन व व्रत याबदल पुन माहिती. चैत्र गुडीपड़ावा :- या दिवशी सकाळी अभंगस्नान करुण गुढी उभी करावी. ब्रह्मध्वजाय नम: असे म्हणुन गुढीचे पूजन करावे . ब्र्म्हाध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद | प्राप्ते स्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु || या मंत्र ने प्रार्थना करुण नंतर पंचंगावरिल गणपतीचे पूजन करावे….

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.