5 पंचतत्त्वे/पंचमहाभूते आणि वास्तुशास्त्र: जीवनाचा समतोल साधणारे प्राचीन तत्त्वज्ञान | Panchatatve vastu shastra

पंचतत्त्वे/पंचमहाभूते आणि वास्तुशास्त्र: जीवनाचा समतोल साधणारे प्राचीन तत्त्वज्ञान Panchatatve vastu shastra

पंचतत्त्वे/पंचमहाभूते आणि वास्तुशास्त्र: जीवनाचा समतोल साधणारे प्राचीन तत्त्वज्ञान Panchatatve vastu shastra

मित्रांनो, हल्ली आपल्या कानावर पंचतत्त्वे/पंचमहाभूते हे शब्द नेहमी
पडत असतात. मग काय आहेत ती पंचतत्त्वे व त्याचा काय परिणाम आपल्यावर व
आपल्या वास्तूवर होतो, हे आपण या प्रकरणात बघणार आहोत. संपूर्ण सजीव सृष्टीची
निर्मिती ही पंचमहाभूतांपासून झालेली आहे. आपले शरीर ज्या हाडामासापासून
बनलेले आहे ते देखील हे या पंचतत्त्वानी बनलेले आहे. त्यामुळे त्या गोष्टींची माहिती
आपल्याला वास्तूशास्त्राचा अभ्यास करण्यापूर्वी असणे खूप आवश्यक आहे. सृष्टी ह्या
पाच तत्त्वांमुळे टिकून आहे. १) पृथ्वी २) आप (जल) ३) तेज (अग्नी) ४) वायू
आणि ५) आकाश ह्या पाच तत्त्वांनी निर्माण झालेली आहे. त्यांच्यात असलेल्या गुणधर्मामुळे त्यांना ही नांवे देण्यात आलेली आहेत व तशीच रचना ही मनुष्याची आहे.

मनुष्याच्या शरीरात ही तत्त्वे कार्यान्वित असतात. ज्याप्रमाणे माती आणि
पाणी एकत्र आले की, चिखलाचा गोळा तयार होतो; त्याचप्रमाणे पृथ्वी आणि
पाणी एकत्र आले की, शरीरात कफ तयार होतो. त्यामुळे आयुर्वेदात सांगितले आहे
की, ज्या व्यक्तींना कफ असतो त्यांनी पाणी हे कमी प्रमाणात प्यावे.

अग्नीपासून शरीरात पित्ताची निर्मिती होते, तर वायू आणि आकाश यापासून वात निर्माण होतो.
वातावरणात असलेली पंचतत्त्वे व तुमच्या शरीरात असलेली पंचतत्त्वे यांचा खूप मोठा
संबंध आहे. त्यामुळे वातावरणातील बदलामुळे आपल्या शरिरात देखील वारंवार बदल
होतांना आपण बघत असतो. पंचमहाभूतांपैकी पृथ्वीमध्ये प्रचंड चुंबकीय शक्ती
असल्यामुळे त्याचा वातावरणीय लहरींवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो.
त्याचप्रमाणे पाणी, अग्नी, वायू आणि आकाश ह्या सर्व गोष्टींचा सृष्टीवर खूप मोठा
परिणाम होत असतो.

ह्या पाचतत्त्वांपैकी कोणत्याही एका तत्त्वात बिघाड झाला किंवा
अतिरेक झाल्यास पृथ्वीवर भूकंप, जलप्रलय, अग्नितांडव पाहण्यात येते. वातावरणात
होणाऱ्या या बदलांचा प्रत्येक मनुष्यावरच नव्हे तर संपूर्ण सजीव सृष्टीवर परिणाम
होताना आपण वारंवार बघत असतो. मग त्याची तीव्रता कुठे कमी कुठे जास्त या
प्रमाणात दिसून येते. या सर्व वातावरणीय बदलांचा अभ्यास करून मनुष्याने त्याची
ऋतूंमध्ये विभागणी केली व त्यानुसार त्याने कोणत्यावेळेस कोणती वातावरणीय
तत्त्वे ही जास्त प्रमाणात कार्यान्वित असतात याचा संपूर्ण अभ्यास करून उन्हाळा,
हिवाळा, पावसाळा ह्या ऋतूंमध्ये विभागणी केली. भारतामध्ये आपणास तीनही
ऋतूंचा आनंद घेता येतो. काही भागांत आपणास दोन ऋतू बघण्यात येतात.

पंचतत्त्वे/पंचमहाभूते आणि वास्तुशास्त्र: जीवनाचा समतोल साधणारे प्राचीन तत्त्वज्ञान Panchatatve vastu shastra
पंचतत्त्वे/पंचमहाभूते आणि वास्तुशास्त्र: जीवनाचा समतोल साधणारे प्राचीन तत्त्वज्ञान Panchatatve vastu shastra

त्यानुसार मनुष्याने पृथ्वीवर त्यास अनुकूल असणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेऊन
आपल्या सोयीनुसार त्यात कालपरत्त्वे बदल केले. पूर्वी मनुष्य संपूर्णतः निसर्गाच्या
सान्निध्यात राहात असल्याकारणाने ती वातावरणीय पंचतत्त्वे ही मनुष्याला पूर्णपणे
मिळत असत. त्यानंतर माणूस जसजसा प्रगत होत गेला, लोकसंख्या वाढत गेली,
जमिनीच्या वाढत्या किमती त्यामुळे वास्तू घेणे व वास्तूशास्त्रानुसार वास्तू मिळणे
तसे अवघड झाले. हल्ली प्रत्येकजण आपआपल्या घरात/वास्तूत राहतो.

आपल्या शरिरात जशी ही पंचतत्त्वे कार्यान्वित असतात, तशीच ती आपल्या वास्तूतदेखील
कार्यान्वित असतात; परंतु आजकाल ज्या ऊर्जा आपणास ज्या दिशेतून मिळावयास
हव्यात तशा त्या आपणास मिळत नाहीत. मग बऱ्याचदा असे होते की, आपली
वास्तू मोठी असते, पण वास्तूमध्ये मिळणाऱ्या ऊर्जा ह्या शून्य असतात. मग काय
होते अशा वास्तूत राहणाऱ्या व्यक्तीत सतत आजारपण दिसून येणे, चिडचिडेपणा
दिसून येणे, विनाकारण कटकटी निर्माण होणे अशा प्रकारच्या समस्या अशा वास्तूत
प्रामुख्याने दिसून येतात.

मग ज्यावेळेस आपण बाहेर फेरफटका मारायला एखाद्या
गार्डनमध्ये जातो, मंदिरात जातो त्यावेळेस तेथील वातावरणीय ऊर्जेने आपणास प्रसन्न
वाटते व त्या ऊर्जा घेऊन आपल्याला घरी आल्यानंतर प्रसन्न वाटते. आपणास जेव्हा
कंटाळा येतो तेव्हा आपण स्मशानात जातो का, तर नाही; कारण तेथील वातावरण
व तेथे निर्माण असलेल्या ऊर्जा ह्या माणसाला नकारात्मकता, नैराश्य देणाऱ्या व
अशांत करणाऱ्या असतात. ज्यावेळेस आपण वास्तूचा विचार करतो त्यामध्येदेखील
वातावरणीय बदलांचा खूप मोठा परिणाम होताना दिसतो. त्यामुळे घरात कधीआपणास प्रसन्नता, तर कधी कंटाळा येतो. जर तुमच्या वास्तूत ती पंचतत्त्वे योग्य प्रमाणात येत असतील तर, वास्तूत राहणारी व्यक्ती, सजीव प्राणी निरोगी, प्रसन्न व
आनंदी राहील त्यामुळे ती पंचतत्त्वे योग्य दिशेतून व योग्य भागातून येणे व जाणे हे
खूप महत्त्वाचे असते.

आज मनुष्याने वैज्ञानिक प्रगती मोठ्या प्रमाणावर केली, पण
त्याचबरोबर या सृष्टीने बनविलेल्या या पंचतत्त्वाचे आपण नुकसान करीत चाललो
आहोत हे मात्र नाकारता येत नाही. आज माणूस निसर्गाची पायमल्ली करीत चालला
आहे. त्यामूळे आज आपण बघतो की, वाढते वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वाहते
नाले जे आज आपण नद्यामध्ये, समुद्रामध्ये सोडले आहे त्यामूळे पाणी प्रदूषण व
त्यातून निर्माण होणाऱ्या विपरीत परिणामामुळे या नैसर्गिक पृथ्वी, आप, तेज,
आकाश, वायू या सर्व तत्त्वांचा आपण -हास करित चाललो आहोत.

ghar vastu nusar kashe asave

Staff picks

आज जगभरातून मोठमोठ्याला कारखान्यांमधून विषारी वायू बाहेर पडत आहेत. त्यामुळे ओझोनचा
असलेला थर हा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. पावसाच्या अनियमितता व
कमतरता यामूळे पाण्याची भीषणता त्यामूळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी
होत आहे. तर एकीकडे वाढलेल्या तापमानामुळे समुद्राची पातळी, पृथ्वीची दाहकता
वाढत चालली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज आपण बघतो की, या आधुनिक,
वैज्ञानिक व प्रगतशील युगातदेखील आपणास असंख्य रोगांना सामोरे जावे लागत
आहे.

नवनवीन व्हायरस / विषाणूमुळे संपूर्ण जग आज त्रस्त झाले आहे व ती सृष्टीच
आज आपणास संपवत चालली आहे असे म्हणावे लागेल. आज आपण बाहेर जाऊन
मोकळा श्वास घेऊ शकत नाही. निसर्गाने आपल्याला ज्या गोष्टी फुकट दिल्या त्या
आज आपल्याला विकत घेण्याची वेळ येत आहे. ऑक्सिजन, पाणी, अन्न यासाठी
माणसाची वणवण चालली आहे. माणसाने आजही या गोष्टीचे गांभीर्य ओळखले नाही
आणि त्यापासून जर आपण अज्ञानी राहिलो तर मात्र ही पंचतत्त्वे जी संपूर्ण सजीव
सृष्टीसाठी संजीवनी आहेत तीच येणाऱ्या भविष्यकाळात पंचमहाराक्षस म्हणून संपुर्ण
जीवसृष्टीला गिळणार यात शंका नाही.

वास्तु शास्त्र
वास्तु शास्त्र दशदिशा
24K Gold-Plated Vastu Dosh Nivaran Yantra –

24K Gold-Plated Vastu Dosh Nivaran Yantra –

Original price was: ₹340.Current price is: ₹269.

Vastu Dosh Nivaran Yantra 24 Gold Plated – for Health,…

SKU: VastuY1252
Category:

Similar Posts

  • किचन रूम – kitchan

    किचन रूम – kitchan room उत्तम – भरभराट. स्वयंपाकगृह म्हणजे किचन. ही खोलीसुद्धा वेगळीच हवी. सुंदर वास्तूच्या दृष्टीने ही खोली सर्वांत महत्त्वाची. तेथे अग्नीची प्रतिष्ठापना होते. सर्व कुटुंबातील वातावरण नित्य सुरळीत व आनंददायी असणे हे या स्वयंपाकगृहावर अवलंबून असते. याची जागा चुकली की संपले.. त्याची खुलासेवार माहिती पुढीलप्रमाणे ईशान्य वाईट – बरकत नसते. पूर्व मध्यम…

  • प्रवेश दालन – pravesh dalan

    संपूर्ण वास्तूमध्ये एकदम प्रवेश करता येऊ नये, म्हणून पूर्वीपासून प्रवेश दालन अगर व्हरांडा वास्तुरचनेत ठेवलेला असे. बाहेरचे वाईट गुणधर्म घेऊन आलेली व्यक्ती क्षणभर तेथे थांबते. प्रवेश करण्यापूर्वी व्हरांड्यात पादत्राणे काढून वास्तूच्या मुख्य दालनात प्रवेश करता येतो. स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तमच, म्हणून व्हरांड्याची पद्धत.

  • |

    Vastu

    भवन में सबसे पहले दीवारो की ओर ध्यान देना चाहिए। दीवार सीधी, प्रत्येक कोण ६० डिग्री का होना चाहिए। कमरों में रोशनी हवा का पूरा ख्याल रखते हुए खिड़कियों एवं सामान रखने के लिए आलमारी आदि का निर्माण करना चाहिए। भवन में विभिन्न कक्षों की वास्तु अनुरूप स्थिति निम्नलिखित स्थिति में होना चाहिए।

  • वास्तू शांती मुहूर्त | vastu shanti muhurta

    वास्तू शांती मुहूर्त कीस लिए देखाजाता है? कब करें भूमि पूजन तथा गृह प्रवेश | वास्तू शांती ? मनुष्य की तीन मूलभूत आवश्यकताएं होती है रोटी कपड़ा और मकान| इनमें मकान यानी घर के महंता सबसे अधिक है| प्रत्येक व्यक्ति का सपना होता है कि उसका स्वयं का एक अच्छा सा घर हो जहां वह…

  • देव घर कोठे व कसे असावे.

    समाधान वाटावे म्हणून देवासाठी स्वतंत्र खोली असावी. तेव्हा तेच ‘देवघर’ होय. ही खोली वास्तूच्या ईशान्य दिशेच्या कोपऱ्यामध्ये असावी. कारण ईशान्य या दिशेचा अर्थच ‘ईश्वर’ असा आहे. ईश्वराचे स्थान म्हणजे ईशान्य. नेहमी देवाच्या मूर्तीचे तोंड पश्चिमेकडे व पूर्वेकडच्या भिंतीस पाठ असावी. नव्या घरात देवघरासाठी स्वतंत्र खोली नसल्यास देवाचे स्थान निदान ईशान्येस कोपऱ्यामध्ये निश्चित करावे.

  • बैठक-Hall

    बैठक म्हणजे गप्पा मारण्याचे ठिकाण. मग त्या धंद्याच्या किंवा सुखदुःखाच्या असोत. वास्तूमधील बैठकीची जागा फार महत्त्वाची असते. उत्तर दिशेस ही बैठक असावी. येथे सर्व चर्चा आनंददायी व उत्तम फलदायी ठरतात. समजा, बैठक दक्षिणेकडील बाजूस मांडली, तर सूर्यकिरणे अथवा उत्तरेच्या ध्रुवाची किरणे न मिळता यमदेवतेची दृष्टी राहते. त्यामुळे चर्चा गप्पा करता करता आपण क्षीण होतो. थोडक्यात…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.