kundali janm kundali

खरंच तुमची पण कुंडली शापित आहे का?

नावाप्रमाणेच “शापित” असणाऱ्या काही कुंडल्या असतात ज्यात कुठल्याच मार्गाने सुखाची अपेक्षा करता येत नाही. कधी कधी संपूर्ण कुंडली ग्रहस्थिती ठीकठाक असून एखादा ग्रह अशी काही स्थिती निर्माण करतो की त्यामुळे सर्व अशुभ परिणामांना प्रारंभ होतो. या जीव सृष्टीवर जगायचे म्हणजे मन काबूत असणे गरजेचे आहे. शांत आणि स्थिर मनाने जग जिंकता येते परंतु मन अस्थिर – चंचल – दूषित असेल तर कितीही पराक्रमी व्यक्ती असली तरी पुढच्या मिनिटाला हार पत्करते. मन खंबीर तर सारेच खंबीर !!
म्हणूनच त्रिक स्थानात चंद्र असणारी व्यक्ती सुखी असूनही दुर्मुखलेली असते , आयुष्यातील लहान लहान गोष्टींचा आनंद ती घेऊ शकत नाही. शापित कुंडली काहीशी त्यावरच अवलंबून आहे.

💠 वर्गीकरण :

मागेच एका लेखामध्ये मी नमूद केले होते की , राहू – शनी एकत्र आले की शापित योगाची निर्मिती करतात. अर्थात ते दोघे अशुभ परिणामकारक होतील की शुभ हे त्या दोघांची कुंडलीतील भावस्थिती , नक्षत्रे , अवस्था यावरून कळेल. काही कुंडल्या ह्या कर्मभोगाच्या असतात. कुंडली पाहताच कळून जाते की “ही कुंडली पूर्वकर्माचे अत्यंत अशुभ भोग भोगण्यासाठी आहे”.

🌀 ग्रह :

  • भोग अतिशय जास्त प्रमाणात असतील तर पहिला गुरुने कुंडलीतून हात काढलेला असतो. तो नीच / अशुभ / बळहिन झालेला असतो. मग समजावे आपल्याला भोग येणार आहेत.
  • कुंडलीत राहू केतू च्याही आधी अशी भोगाची कुंडली तयार करतात ते चंद्र – रवी.
  • शनी महाराज तुमच्या कोणत्या भोगाची परतफेड करायची आहे ती दाखवतात.
  • ग्रह व त्याचे नक्षत्र हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तो जितका दूषित तितकाच त्या व्यक्तीचा आयुष्याचा आराखडा बिघडणार हे नक्की.
  • काही कुंडल्या मध्ये अतिशय कमी केंद्रयोग आणि षडाष्टक असतात. तर काहींमध्ये अतिशय कमी नवपंचम आणि लाभ्योग असतात.
  • राहू – शनी – गुरु हे तुमचे कर्तृत्वाचे कारक ग्रह असले तरी मागचे भोग देण्याचे कर्म ही त्यांच्याकडेच आहे.
  • त्रिक स्थानांनी कुंडली व्याप्त केली तर ती अशुभ भोगाची कुंडली बनते.
  • चंद्र कोणत्या राशीत आणि नक्षत्रात असेल यावरूनही तुमचे या जन्मीचे भोग समजतात.
  • रवी हा कुंडलीचा आत्मा आहे तो जर अशुभ झाला तरी भोग प्रचंड येतात.
  • राहू केतू १-२-४-५-८-१२ या स्थानात असल्यास देखील अत्यंत भोग भोगावे लागतात

🌀 राशी वर्गीकरण :

  • मेष – धनु – सिंह या राशी प्रवाहाच्या विरुध्द आक्रमक होणाऱ्या असल्याने या भोगात त्या होरपळून निघतात. नियतीच्या आणि विधिलिखिताच्या विरुध्द अजून कोणीही जाऊ शकलेला नाही , शकतही नाही.
  • पृथ्वी राशी फक्त इथे टिकून राहतात. त्या खलोखाल वायुराशी ह्या देखील उत्तम निभावतात.
  • कर्क – मीन या राशी खरतर खूप सहन करतात. त्यांची मानसिकता तेवढी भोग भोगण्याची नसते.

💠 काय करावे ?

  • कुठलेच काम यशस्वी होत नसेल तर वेळीच कुंडली विश्लेषण करून घ्यावे.
  • कुळाचार – कुलधर्म नित्याने केल्याने भोगाची दाहकता कमी होत असते.
  • कुळाचार न करणाऱ्यांना भोग घातक जातात हा अनुभव पाहण्यातला आहे.
  • पिढ्यांची / मृत व्यक्तींची कुठलीही कर्मे अर्धवट ठेवू नये.
  • ज्यांचा जन्म गंडातरीत नक्षत्रात झाला असेल त्यांनी शांती विधी करून घ्यावेत.
  • यूट्यूब वर दाखवलेले उपाय खरे जरी असले तरीही परस्पर ते करायला जाऊ नये.
  • अगदीच आयुष्यात भरपूर वाईट अनुभव असेल तर नित्यनियमाने नवग्रह पूजा करत जावी.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

|| श्री गुरुदेव दत्त ||

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *