महाशिवरात्रि ला हे व्रत केल्याने मह्देवाची भक्तांवर कृपा होते. MAHASHIVRATRI 2021
महाशिवरात्रीव्रत: ‘अर्धरात्रियुता यत्र माघकृष्णचतुर्दशी । शिवरात्रिव्रतं तत्र सोऽश्वमेधफलं लभेत् ।।’
महाशिवरात्रि चे व्रत आणि संकल्प MAHASHIVRATRI 2021
महाशिवरात्री :- अर्थात ज्या अर्धरात्री माघ कृष्ण चतुर्दशी असेल त्या दिवशी उपवासपूर्वक शिवरात्रीव्रत करुन शिवपूजन केल्यास अश्वमेध यज्ञाहून अधिक फल मिळते. या दिवशी प्रदोषकाळी किंवा निशिथकाळी स्नान करुन भस्मधारण करावे व रुद्राक्षमाला धारण करुन शिवपूजनासाठीचा पुढील संकल्प करुनच शिवपूजन करावे. ॐ विष्णू; (३ वेळा म्हणणे), ॐ तत्सद् श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीयेपरार्द्ध श्रीश्वेतवाराहकल्पे जम्बुद्वीपे भारतवर्षे भरतखंडे आर्यावर्ते दंडकारण्येदेशे पुण्यक्षेत्रे कलियुगे कलिप्रथमचरणे शालिवाहनशके शार्वरी नामसंवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतौ माघ मासे कृष्ण पक्षे …..तिथौ अमुकवासरे …….नक्षत्रे …….योगे …….करणे …….राशीस्थितेचंद्रे …….राशीस्थितेसूर्ये …….राशीस्थितेदेवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशीस्थान स्थितेषु ……गोत्रोत्पन्नः …….नामाऽहं मम एतद्वर्षकृत समस्तपातकोपपातक प्रकीर्णकादि कायिकवाचिकमानस ज्ञाताज्ञातप्रकाशरहस्यपापस्य क्षयार्थं पुत्रधनदीर्घायु: प्रभृति सकल काम | अवाप्त्यर्थं शिवरात्र्यां शिवपूजनं करिष्ये । असे म्हणून उजव्या हातातील पाणी ताम्हणात सोडावे. त्यानंतर अधिकारपरत्वे वेदोक्त अथवा पुराणोक्त ‘श्री शिवाय नम:‘ या मंत्राने शिवलिंगाची यथासांग पूजा करावी. पूजेत शंकरास धोत्र्याचे फूल, बेलाचे पान वाहून घृतमिश्रित गुग्गुळाचा धूप दाखवावा नंतर आरती करुन पुढील मंत्राने ताम्हणात शंकरास उद्देशून तीन अर्घ्य द्यावेत
‘शिवरात्रीव्रतं देव पूजाजपपरायणः ।
करोमि विधिवद्दत्तं गृहाणायँ नमोस्तु ते ।।’
शेवटी ‘श्री रुद्राय नम:’ या मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेवर उत्तरेकडे तोंड करुन कमीत कमी १०८ वेळा जप करावा.वेगवेगळ्या प्रकारच्या शिवलिंग पूजनाचे फळ – स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – मनोरथ सिद्धि, चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – राज्यप्राप्ती व पितरांचा उद्धार, सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – सत्यलोक व लक्ष्मी प्राप्ती, हस्तीदंताच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – सेनापतित्व, तांब्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – पुष्टि व दीर्घायुष्य, पितळ्याच्याशिवलिंगाची पूजा केल्यास – तुष्टि, काशाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – कीर्ति, लोखंडाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – शत्रुनाश, शिश्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – दीर्घायुष्य, गंधाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – सौभाग्य, धान्यांच्या पिठापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास – पुष्टि, सुख, रोगनाश, उडदाच्या पिठापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास – स्त्रीप्राप्ती, लोण्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास – सुख, गायीच्या शेणापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास – रोगनाश, गूळापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास – अन्न इ. प्राप्ती, बांबूच्या अंकुरापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास – वंशवृद्धि होते.
महाशिवरात्री व्रत MAHASHIVRATRI 2021