तिसरा गुरुपालट कार्तिक शु. ६, शुक्रवारी 20-11-2020 रोजी दुपारी १३:२६ वाजता गुरु (पुनः) मकर राशीत प्रवेश करतो. त्याचा पुण्यकाल | शुक्रवारी सकाळी ११:३५ ते दुपारी १५:१७ पर्यंत आहे. तुला, | मिथुन व कुंभ या राशींना अनुक्रमे ४-८-१२ वा गुरु येत
असल्याने त्यांनी व लोहपादाने ज्या राशीस येत आहे त्यांनी पीडापरिहारार्थ गुरुच्या उद्देशाने जप, दान, पूजा अवश्य करावी. मकर, वृश्चिक, सिंह, मेष या राशींना गुरु १-३-६-१० वा येत असल्याने त्यांनी जप, दान, पूजा यापैकी एखादा प्रकार केल्याने त्या पीडेचा परिहार होईल. जन्म राशि
सिंह-मकर-मीन —– सुवर्ण ——-चिंता
वृषभ-कन्या-धनु ——-रौप्य ——–शुभ
मेष-कर्क-वृश्चिक—— ताम्र—– श्रीप्राप्ति
मिथुन-तुला-कुंभ ——लोह——-कष्ट
गुरु उपासना
पीडापरिहारार्थ पुण्यकालात जप, दान, पूजा करणे अत्यंत पुण्यकारक आहे. गुरु सुवर्णपादाने आल्यास त्याचे फल जरी चिंता असे आहे, तरी सुवर्णपादी गुरु शुभ आहे. पीडापरिहारक दानवस्तु : सुवर्ण, कांसे, पुष्कराज, हरभऱ्याची डाळ, घोडा, साखर, पिवळे वस्त्र, पिवळी फुले. जपसंख्या – १९ हजार, प्रतिमा : सुवर्णाची.
जपमंत्र
देवानांच ऋषीणांच गुरुं कांचनसन्निभम् ।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् ।।
गुरु प्रतिमेच्या पूजनाचा व दानाचा संकल्प ममजन्मराशे: सकाशात् अनिष्टस्थानस्थितगुरो: पीडापरिहारार्थं | एकादशस्थानवच्छुभफलप्राप्त्यर्थं सुवर्ण प्रतिमायां बृहस्पतिपूजनं तत्प्रीतिकरं (अमुक) दानंच करिष्ये।
गुरूच्या ध्यानाचा श्लोक
अहो वाचस्पते जीव सिंधुमंडलसंभव । एह्यांगिरससंभूत हयारूढ चतुर्भुज ।। दंडाक्षसूत्र वरद कमंडलुधर प्रभो।
महानिंद्रेति संपूज्यो विधिवन्नाकिनां गुरुः।।
दानाचा श्लोक: बृहस्पतिप्रीतिकरं दानं पीडा-निवारकम्।
सर्वापत्ति विनाशाय द्विजाग्र्याय ददाम्यहम्।।