श्री सूर्य स्तुती | SURYA GRAH UPAY

kundali janm kundali

श्री सूर्य स्तुती | SURYA GRAH UPAY

Whatsapp Image 2022 05 19 At 10.20.34 Pm

जयाच्या रथा एकची चक्र पाही | नसे भूमि आकाश आधार कांही || असे सारथी पांगुळा ज्या रथासी | नमस्कार त्या सूर्यनारायणासी || १ ||
करी पद्म माथां किरीटी झळाळी | प्रभा कुंडलांची शरीरा निराळी || पहा रश्मि ज्याची त्रिलोकासी कैसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || २ ||
सहस्रद्वये दोनशे आणि दोन | क्रमी योजने जो निमिषार्धतेन || मन कल्पवेना जयाच्या त्वरेसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ३ ||
विधीवेदकर्मासी आधारकर्ता | स्वधाकार स्वाहादि सर्वत्र भोक्ता || असे अन्नदाता समस्तां जनांसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ४ ||

युगें मंत्रकल्पांत ज्याचेनि होती | हरीब्रम्हरुद्रादि ज्या बोलिजेती || क्षयांती महाकाळरूप प्रकाशी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ५ ||
शशी तारका गोवुनी जो ग्रहाते | त्वरें मेरू वेष्टोनिया पुर्वपंथे || भ्रमें जो सदा लोक रक्षावयासी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ६ ||
समस्ता सुरांमाजी तू जाण चर्या| म्हणोनिच तू श्रेष्ठ त्या नाम सूर्या || दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ७ ||
महामोह तो अंधकारासि नाशी | प्रभा शुद्ध सत्वाची अज्ञान नाशी || अनाथां कृपा जो करी नित्य ऐसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ८ ||
कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची | न पाहू शके शत्रु त्याला विरंची || उभ्या राहती सिद्धी होऊनी दासी || नमस्कार त्या सुर्यनारायणासी || 9 ||
फळे चंदने आणि पुष्पेकरोनी || पूजावें बरे एकनिष्ठा धरोनी || मानी इच्छिले पाविजे त्या सुखासी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || १० ||

नमस्कार साष्टांग बापा स्वभावे | करोनी तया भास्करालागि ध्यावे | दरिद्रे सहस्त्रादी जो क्लेश नाशी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ११ ||
वरी सुर्य आदित्य मित्रादि भानू | विवस्वान इत्यादीही पादरेणू | सदा वांछिती पूज्य ते शंकरासी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || १२ |||

Similar Posts

  • Shree Ganesh pooja | श्री गणेशमानसपूजा

    Shree Ganesh pooja | श्री गणेशजी की पूजा होने पर यह मानस पूजा का वचन करना चाहिया | श्री गणेशजी की पूजा होने पर गणेश जी को प्रसन्न करने केलिया यह मानस पूजा करने से या वचन करनेसे भगवान गणेशजी प्रसन्न होते है आपसभी यह मानसपूजा का वचन कीजिय

  • कंजुष कदर्याची कथा

    अध्याय २९ – कंजुष कदर्याची कथा वाल्मिकी मुनी निघून गेल्यावर दृढधन्वा राजा आणि गुणसुंदरी राणी यांनी खूप विचार केला तेव्हा राजा म्हणाला, “मी आता है सगळे राजवैभव सोडून तपोवनात जातो. तेथे तपश्चर्या करून माझ्या जन्माचे सार्थक करतो.” राणी म्हणाली, “मग मी ह्या राजवाड्यात राहून सुनांच्या हाताखाली कुत्रीप्रमाणे जीवन कंठू, की काय? महाराज, जेथे पती तेथे…

  • आपली जन्म कुंडली पहा तुम्ही स्वतः | janm kundali dekhe

    जन्म कुंडली पहा आपण स्वतः कशी आहे आपली कुंडली | janm kundali dekhe कुंडली पाहणे शिका मराठी मध्ये. कुंडली शिका अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपली कुंडली पहात असताना किंवा एखाद्या व्यक्तीची किंवा जातकाची कुंडली पाहत असताना सर्वात प्रथम काय पाहिल्या जाते. त्या व्यक्तीची राशी काय आहे कोणत्या नक्षत्रावर ती त्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे. यावरून आपल्याला…

  • कुलदेवी के आशीर्वाद क्यों जरूरी हैं ?

    कुलदेवी के आशीर्वाद क्यों जरूरी हैं ? विषय बहुत महत्वपूर्ण हैं । इस विषय को समझते वक़्त सभी साधना , कुण्डलिनी , श्रीविद्या , दसमहाविद्या जो भी कोई साधना आप कर रहे हो , सब एक बाजू रखें । क्योंकि कुलदेवी की कृपा का अर्थ है , सौ सुनार की एक लोहार की , बिना…

  • Jyotish Astrology Beginners

    Unlocking the Secrets of Jyotish Astrology: A Comprehensive Guide for Beginners Are you intrigued by astrology and its mystical powers? Have you ever wondered how the positions of celestial bodies can influence our lives? If so, you’re not alone. Jyotish astrology, also known as Vedic astrology, offers a comprehensive and well-established system for uncovering the…

  • Bhdra kay hai ?

    भद्रा क्या है | ज्योतिषनुसार भद्रा का्य होती है | Bhdra kay hai ? who is bhdra भद्रा (Bhdra) क्या है| देव दोनों संग्राम नमक पौराणिक क्षण में कहा गया है | कि पूर्व काल में जब देवताओं और असुरों में युद्ध हो रहा था उसी समय देव हारने लगेथे, तब भगवान शंकर को क्रोध…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.