Mithun Rashi | मिथुन राशीसाठी 2023 कसे असेल.
चैत्रः- रविगुरु शुभयोगाचा उत्तम लाभ उठवाल. पूर्वार्ध नोकरी व्यवसायात छानच. पौर्णिमा पुत्रोत्कर्षाची. उत्तरार्ध आर्थिक व्यवहारांतून फसगतीचा. जगार टाळा. अमावास्येजवळ वाहन सांभाळा. गर्भवतींनी सांभाळा.
वैशाख:- राशीतील शुक्रभ्रमण उत्तरार्धात सर्वार्थाने फलदायी. जनसंपर्कातून लाभ. व्यावसायिक उत्सव प्रदर्शने. नोकरीच्या मुलाखतींतून यश. सरकारी कामे. उत्तरार्धात जुगार नको. उधारउसनवारी जपा.
ज्येष्ठ:- ग्रहांचे फील्ड सुसंगतच राहील. आर्थिक ओघ राहीलच. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीतून लाभ. कार्याप्रीत्यर्थ प्रवास होतील. उत्तरार्धात मोठी सरकारी कामे. वादग्रस्त भूखंड सोडवून घ्याल. अमावास्येजवळ भातृचिंता.
आषाढ :- जीवनातील महत्वाकांक्षा पूर्ण होतील. पौर्णिमेजवळ तरुणांना स्पर्धात्मक यश. कॅम्पसमधून नोकरी. व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढेल. पतीपत्नीचा मोठा भाग्योदय. उत्तरार्ध कलावंतांचे भाग्योदय करेल.
अ. श्रावण:- शुभग्रहांची लॉबी प्रभावी राहील. स्वतंत्र व्यावसायिकांचे भाग्योदय. जनसंपर्कातून मोठे लाभ. सरकारी लाभ. पौर्णिमा कोर्टप्रकरणं सोडवेल. उत्तरार्ध व्यावसायिक उत्सवप्रदर्शन गाजवेल. नि. श्रावण:- गुरुशी होणारे शुभयोग फलदायी होतील. वक्री बुधशुक्रांची स्थिती नोकरी व्यावसायिक पार्श्वभूमीवर उत्तम फलदायी होईल. पौणिमेजवळ मोठे लाभ. उत्तरार्धात कुसंगत जपा. सहलीचे करमणुकीचे योग.
भाद्रपदः- शुभग्रहांची लॉबी कार्यरत राहील. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मोठे विक्रम प्रस्थापित करेल. व्यावसायिक लाभांची परंपरा राहील. सरकारी कामे होतील. उत्तरार्ध प्रेमप्रकरणांतून त्रासदायक. सूर्यग्रहणाजवळ बदलीचे सावट. स्त्रीचिता.
आश्विन:- तरुणांनी कुसंगत टाळावी. बाकी शुक्रभ्रमण नवकल्पना देणारे. काहींना विशिष्ट प्रसिद्धी योग. चंद्रग्रहणासमीप गर्भवतींनी काळजी घ्यावी. काहींना व्याधीतून वेदना. उत्तरार्धात कायदेशीर कटकटी. अमावास्या भातृचिंतेची.
कार्तिक:- पूर्वार्ध आरोग्यविषयक तक्रारींचा. व्यावसायिक हितशत्रुपीडा होईल. पौर्णिमेजवळ उत्सव समारंभातून बेरंग. उत्तरार्ध बुध, गुरु आणि शुक्र यांच्या योगांतून वैयक्तिक सुवार्तांचा भर ठेवेल. विवाहयोग. प्रसिद्धीयोग. अमावास्या वेदनायुक्त.
मार्गशीर्षः- पूर्वार्ध वैवाहिक व जीवनात वादंगाचा. स्त्रीवर्गास गैरसमजातून त्रास. बाकी रविगुरुचा शुभयोग व्यावसायिक पतप्रतिष्ठा वाढवेल. नोकरीतील सावट जाईल. उत्तरार्धातील क ग्रहस्थिती व्यावसायिक खरेदीविक्रीतून लाभ देणारी.
पौषः- गुरुशी होणारे म योग छान बोलतील. गृहसौख्याचे पर्व सुरु होईल. पतीपत्नीचा भाग्योदय. गुं पौर्णिमेजवळ व्यावसायिक शुभारंभ. सरकारी माध्यमातून सहकार्य. पूर्व अमावास्येजवळ दुखापती जपा. रोख पैसे सांभाळा.
माघ:- मंगळशुक्र गुप सहयोग व्यावसायिक वसुलीचा. व्यावसायिक उत्सवप्रदर्शने. पौणिमेजवळ छान पर्यटन, मोठी चैन. उत्तरार्ध रविशनि योगातून कायदेशीर कटकटीचा. व्या सामाजिक विरोध. वृद्धांच्या व्याधी.
फाल्गुन:- व्यावसायिकांना शुक्रशनि उत्त सहयोगाचा उत्तम लाभ. स्वतंत्र व्यावसायिकांचे भाग्योदय. तरुणांना फा उच्चशिक्षणाच्या संधी. चंद्रग्रहणाजवळ मातृचिता. सरकारी प्रकरणांतून त्रास. का उत्तरार्ध नोकरीत परदेशगमनाचा. सूर्यग्रहणाजवळ दुखावती जपा.
Discover more from
Subscribe to get the latest posts sent to your email.