षष्ठी पूजन

षष्ठी पूजन
WhatsApp Image 2022-07-13 at 5.58.14 PM
WhatsApp Image 2022-07-13 at 5.58.14 PM

षष्ठी पूजन

षष्ठी पूजन म्हणजे काय जाणून घ्या अगदी साधारण भाषेत !

अलीकडे काही वर्षे प्रसूति (बाळतपण) दवाखान्यात होत असल्याने •प्रसूतीपासून ५ व्या व ६ व्या दिवशी षष्ठीपूजन करावयाचे असते हे माहित नाहीसे झाले आहे. जन्माला आलेल्या बालकाला कुठलीही बाधा होऊ नये व त्याला आयुरारोग्य लाभावे या हेतूने शास्त्राने षष्ठीपूजन करण्यास सांगितले आहे. रोज शांतिपाठ व रामरक्षा म्हणली जात असे. रामरक्षा म्हणून लहान मुलास अंगारा लावला म्हणजे त्याला कसलीही बाधा होत नाही हे अनेकांच्या अनुभवाचे आहे.

५ व्या व ६ व्या दिवशी पूजन करावे. दोन दिवस जमले नाही तर. सहाव्या दिवशी (एक दिवस) पूजन करावे. ही पूजा सूर्यास्तानंतरच्या पहिल्या प्रहरात करावी. दवाखान्यात प्रसूति झाली तरी घरांत हे पूजन करावे. जननाशौचात (सोयरात) ही पूजा करण्यास, तसेच दान देण्यास व दान घेण्यास अधिकार असतो.

षष्ठी पूजनाचा संकल्प व पूजा पद्धति

आचम्य प्राणानायम्य देशकालौ संकीर्त्य-फल प्राप्त्यर्थं अस्य शिशोः समातृकस्य सकलारिष्ट निरसनद्वारा आयुरारोग्य प्राप्त्यर्थ विघ्नेशस्य जन्मदानां षष्ठीदेव्याः जीवतिकायाः स्कंदस्य शस्त्रगर्भाभगवत्याश्च पूजनमहं करिष्ये आदौ निर्विघ्नता सिद्धयर्थ महागणपति पूजन करिष्ये.

गणपति पूजन करून तांदुळावर पांच सुपाऱ्या मांडून एकेका सुपारीवर विघ्नेशादी पांच देवतांचे आवाहन करून ‘विघ्नेशाद्यावाहित देवताभ्योनमः’ म्हणून षोडशोपचार पूजन करावे (पौराण मंत्र घ्यावे) नंतर पाट्यावर शस्त्र ठेऊन शस्त्र गर्भागवत्यैनमः म्हणून गंधादि पंचोपचार पूजन करावे.

या षष्ठी पूजनात हिंगाचे पाणी देवतावर शिपडण्याची तसेच हरभऱ्याची उसळ (घुगऱ्या) गुळाचा शिरा व भात याचा नैवेद्य समर्पण करण्याची पद्धत आहे.

पूजनानंतर प्रार्थना, पूजा समाप्त करून दहिभाताचा बलि दाराबाहेर ठेऊन हातपाय धुऊन आचमन करावे. दहा दिवस रोज निदान रामरक्षा म्हणून तो अंगारा बाळास व आईला लावावा.

प्रार्थना

सर्वविघ्नहरोसित्वमेकदंत गजानन । षष्ठीगृहेचितः प्रीत्या बालं दीर्घायुषं कुरू ।।

लंबोदर महाभाग सर्वोपद्रव नाशन । त्वत्प्रसादादविघ्नेन चिरंजीवतु बालकः ।।

वरदाः सायुधा यूयं जन्मदा इति विश्रुताः । शक्तिभिः सहबालं मे रक्षता त्वान्हि जागरे ।|

शक्तिस्त्वं सर्व देवानां लोकानां हित कारिणी । मातर्बालमिमरक्ष महाषष्ठि नमोस्तुते ॥

जननी सर्व भूतानां बालानांच विशेषतः । नारायणी स्वरूपेण बालमे रक्ष सर्वदा ॥

भूत प्रेत पिशाचेभ्यो शाकिनी डाकिनीषुच । मातेव रक्ष बालं मे श्वापदे पन्नगेषुच ॥

गौरी पुत्रो यथा स्कंदः शिशुत्वे रक्षितः पुरा । तथाममाप्ययं बालः षष्ठिके रक्षितां नमः ।।

कार्तिकेय महाबाहो गौरीहृदय नंदन। कुमारं रक्ष भीतिभ्यः पाहि देवि नमोस्तुते ॥

अस्मिस्तु सूतिकागारे देवीभिः परिवारिता । रक्षां कुरू महाभागे चिरंजीवतु बालकः ।।

अयंमम कुलोत्पन्नो रक्षार्थं पादयोस्तव। नीतोमातर्महाभागे चिरंजीवतु बालकः ।।

रूपं देहि जयं देहि भगं भवति देहिमे । पुत्रान् देहि धनं देहि सर्वान्कामांश्व देहिमे ।।

संदर्भ ग्रंथ धर्म शास्त्रीय निर्णय

Similar Posts

  • श्री सूर्य स्तुती | SURYA GRAH UPAY

    श्री सूर्य स्तुती | SURYA GRAH UPAY जयाच्या रथा एकची चक्र पाही | नसे भूमि आकाश आधार कांही || असे सारथी पांगुळा ज्या रथासी | नमस्कार त्या सूर्यनारायणासी || १ ||करी पद्म माथां किरीटी झळाळी | प्रभा कुंडलांची शरीरा निराळी || पहा रश्मि ज्याची त्रिलोकासी कैसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || २ ||सहस्रद्वये दोनशे आणि…

  • ग्रंथ सारणिका

    अध्याय ३१ – ग्रंथ सारणिका सत मुनी शौनकादिक ऋषींना म्हणाले, “नारायणांनी नारदाला ‘अधिकमास माहात्म्या’च्या अनेक कथा सांगितल्या. काही कथा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितल्या. श्रीकृष्णाने पांडवांना “अधिकमास माहात्म्य’ सांगितले. त्या सर्व कथा व्यासांनी लिहून ठेवल्या. ते बृहन्नारदीय पुराण, पद्मपुराण यातील कथा मी तुम्हांला सांगितल्या त्या ‘अधिकमास माहात्म्य’ ग्रंथाची थोडक्यात माहिती म्हणजे सारणिका अशी आहे पहिल्या अध्यायात…

  • कुलदेवी के आशीर्वाद क्यों जरूरी हैं ?

    कुलदेवी के आशीर्वाद क्यों जरूरी हैं ? विषय बहुत महत्वपूर्ण हैं । इस विषय को समझते वक़्त सभी साधना , कुण्डलिनी , श्रीविद्या , दसमहाविद्या जो भी कोई साधना आप कर रहे हो , सब एक बाजू रखें । क्योंकि कुलदेवी की कृपा का अर्थ है , सौ सुनार की एक लोहार की , बिना…

  • Mahashivratri 2023

    महाशिवरात्रि 18 फरवरी 2023 शनि प्रदोष के दिन है। इस साल की महाशिवरात्रि और भी खास है। इस शिवरात्रि पर कई शुभ योग बन रहे हैं। इन योगों के कारण महाशिवरात्रि पर मनोकामना पूर्ति जैसा योग (Manokamana−Purti−yog−on−Mahashivratri) बन रहा है। महाशिव रात्री

  • नवरात्री — Navaratri

    या वर्षी नवरात्र दिनांक 17- ओक्टोम्बर- 2020 रोजी वार:- शनिवार पक्ष:- आश्विन शुल्क पक्ष तिथि :- प्रतिपदा पासुन नवरात्रीची श्रीघट स्थापना होत आहे. दरवर्षी प्रमाने याही वर्षी नवरात्री,अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी हा देवी उपासनेचा काळ, म्हणजेच नवरात्र उत्सव काळ होय. नवरात्रित घरोघरी घट स्थापना केली जाते. नवरात्रीत देवीपुढे अखंड दिप लावला जातो….

  • |

    dhan upay

    Dhan Upay | धन की प्राप्ति के लिए कौन से मंत्र का जप करना चाहिए? ऋग्वेद के सूक्त की एक ऋचा में कहा है कि नाना श्रान्ताय श्रीरस्ति, पायोनृप करोजनः। इन्द्र इधरत सखा, चरैवेति चरैवेति।। उषस्तमश्यां यश से सुबीरे, दास प्रवर्ग रयिमश्व बुध्यम्। सुदंससा श्रवसा या विभासि वाजप्रसूता सुभगे बृहन्तम्॥अर्थात् हे सौभाग्यवती महालक्ष्मी! हमें सुन्दर पुत्रों,…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.