काय करावे, काय करू नये!

अध्याय २७ – काय करावे, काय करू नये!

भगवान वैकुंठविहारी लक्ष्मीला म्हणाले, “रमा, प्रिये, अधिकमासातील व्रते, नियम, साधना, उपासना, दानादि पुण्यकर्मे केल्यामुळे मनुष्याला सुख, समाधान, शांती आणि प्रगती लाभते. मोक्षप्राप्ती होऊन जीवनाचे सार्थक होते.

ज्या घरी हे अधिकमास व्रत निष्ठापूर्वक विधीयुक्त होते त्या घरी उत्साहाचे पवित्र वातावरण राहाते. त्या घरी देवतांचा निवास होतो. त्यामुळे त्या घरातील दुःख व संकटे दूर पळतात. सर्व बाधा नाहीशा होतात. ते घर संतती व संपत्तीने भरून जाते.

loading…

अधिकमासात सांगितलेली अनेक व्रते, दाने, पुण्यकर्मे ज्या

कोणाला करणे शक्य नसेल त्याने आपली प्रकृती आणि परिस्थिती पाहून यथाशक्ती एखादा तरी नियम पाळावा. नित्यनेमाने स्नान, देवदर्शन, एकमुक्त भोजन, भूमिशयन, पोथीवाचन, श्रवण, शक्य ते दान, उपोषण, तुलसीपूजा याप्रमाणे नियम पाळावे.”

या नियमातील कोणतेही एक व्रत पाळल्यावर त्याचे उद्यापन शेवटी करावे. नक्तभोजन, मौनभोजन अशा व्रताचे उद्यापन म्हणजे शेवटी ब्राह्मणाला भोजन किंवा शिधा देऊन करावे. देवळात एखादी घंटा बांधूनही मौनभोजनाचे उद्यापन होते. दीपदान आणि तेहतीस अनारसे, बत्तासे, खारका, सुपाऱ्या, फळे वगैरे वस्तू यथाशक्ती दान दिल्यानेही उद्यापन साधते. याप्रमाणे शक्य ते एखादे तरी पुण्यकर्म करावे.

या महिन्यात कांदा, लसूण, मसूर डाळ, शिळे अन्न वगैरे उत्तेजक, मांसल, मादक वस्तू खाऊ नयेत. अपेय पिऊ नये. परद्रोह, परनिंदा करु नये. रागाने बोलू नये. नको तेथे बसू नये. अशा प्रकारे आपले आरोग्य बिघडेल. मन अस्वस्थ होईल-अशा गोष्टी करू नयेत. कारण या तेराव्या महिन्यात एकही सूर्यसंक्रात नसल्याने वातावरण मलीन बनलेले असते. अशावेळी निर्मळ राहून आपले आपण पवित्र बनले पाहिजे!

याप्रमाणे या महिन्यात काय करावे आणि काय करू नये ते सांगितल्यावर पुढे अठ्ठाविसाव्या अध्यायात आणखी एक कथा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितली ती ऐकावी.

Similar Posts

  • |

    Makar Sankranti 2023

    Makar Sankranti | मकरसंक्रांती 2023 कशी आहे मकरसंक्रांती या वर्षीची

    makar sankranta | संक्रांतिपर्वकालात स्त्रियांनी करावयाची दाने :नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमि, गाय, वस्त्र, घोडा इत्यादि यथाशक्ति दाने करावीत.

  • Jyotish Astrology Beginners

    Unlocking the Secrets of Jyotish Astrology: A Comprehensive Guide for Beginners Are you intrigued by astrology and its mystical powers? Have you ever wondered how the positions of celestial bodies can influence our lives? If so, you’re not alone. Jyotish astrology, also known as Vedic astrology, offers a comprehensive and well-established system for uncovering the…

  • मंगळ दोष | Mangal Dosh Mahnje kay

    मंगळ दोष का्य आहे ? मंगळ आपल्या कुंडली मध्ये नकी आहे का ? Mangal Dosh Mahnje kay 1. अगस्त्य संहिते च्या प्रमाणे –धने व्यये च पाताले जामित्रे चाष्टमे कुजे।भार्या भर्तु विनाशाय भर्तुश्च स्त्री विनाशनम्।। 2. मानसागरी च्या प्रमाणे –धने व्यये च पाताले जामित्रे चाष्टमे कुजे।कन्या भर्तुविनाशाय भर्तु: कन्या विनश्यति।। 3. बृहत् ज्योतिषसार च्या प्रमाणे –लग्ने…

  • Disha | Direction

    Disha दिशाओं की पहचानया दिशेची अधिपती देवता इंद्र आहे. इंद्राची पत्नी शची देवी, निवास स्थान अमरावती, वाहन ऐरावत (पांढरा हत्ती), आयुध वज. द्वारपाल नंदी व चंद्र पूर्व दिशा ही ऐलक्ष्मीस्थान आहे. या दिशेला पांढऱ्या रंगाचे अधिपत्य असते, अधिपती ग्रह सूर्य व रास मेष व वृषभ आहे.

  • |

    Nakshatra badal mahiti नक्षत्रासंबंधी माहिती

     नक्षत्रासंबंधी माहिती नक्षत्राचे गण नक्षत्राचे आराध्यवृक्ष दान व देवता नक्षत्र लोचन

  • what is Nirjala ekadashi | निर्जला एकादशी

    निर्जला एकादशी | Nirjala ekadashiche mahatav | what is Nirjala ekadashi | निर्जला एकादशी ज्येष्ठ शु. एकादशीला निर्जला किंवा भीमसेनी एकादशी असे नाव आहे. सबंध वर्षात दुसरी कोणतीही एकादशी न करता या एकादशीचे व्रत विधिपूर्वक केल्यास सर्व एकादशी व्रतांचे पुण्य मिळते, असे सांगितले आहे. या व्रताचा विधी असा :- एकादशीला आचमनाव्यतिरिक्त पाणी न पिता व…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.