रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे वाचन केल्यास विवाह निश्चित होतो.

0b45d64b6ccf681db196ab37bbe5b271 Removebg Preview Min

शीघ्र विवाह होण्यासाठी उपाय का्य करावे?

विवाह होण्यासाठी उपाय विवाहसिद्धीसाठी एखादा शास्त्रसंमत उपाय आहे का ? असल्यास त्याचे विधिविधान काय ?


‘विवाह स्वर्गी ठरवून ठेवलेले असतात. पृथ्वीवर त्यांची केवळ कार्यवाही होते’ अशा अर्थाची आंग्लोक्ती प्रसिद्ध आहे. तथापि, वधूवरांचे विवाह त्यांचा जन्म होण्यापूर्वीच नियत झालेले असले तरी ते प्रत्यक्षात येण्यासाठी काही वेळा विलंब होतो असे दिसून येते. आपल्या प्राक्तनातील जोडीदारापर्यंत पोचण्यासाठी भगवान श्रीकृष्णास देखील युद्ध करावे लागले होते, तर मग मानवाची काय कथा ? श्रीकृष्ण व रुक्मिणी ह्यांच्या विवाहाचे वर्णन संतकवी एकनाथमहाराजांनी ‘रुक्मिणीस्वयंवर‘ ह्या ग्रंथामध्ये केलेले असून हा ग्रंथ केवळ काव्यगुणांनी नटलेला आहे असे नाही, तर तो एक महाप्रासादिक ग्रंथ ठरलेला आहे. ह्या ग्रंथास प्रत्यक्ष भगवंतांचे वरदान मिळालेले असल्यामुळे भक्तिपूर्वक ह्या ग्रंथाची पारायणे केली असता आपल्या प्राक्तनातील ‘योगायोग’ अगम्य रितीने आपसूक चालत येतो असा अनुभव आहे.

रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे वाचन केल्यास विवाह निश्चित होतो.

सामान्यतः उपरोक्त ग्रंथाच्या अठरा पारायणांचा संकल्प सोडून दररोज रुक्मिणी स्वयंवराचे यथासंख्येने अध्यायवाचन केले असता अठरा पारायणे पूर्ण होण्यापूर्वी विवाह जुळून येतो असे दिसून येते. तथापि; काही वेळा कुंडलीतील मंगळदोष, कुनक्षत्रदोष, सप्तमादिस्थानदोष इत्यादी दोष तसेच काही प्रारब्धजन्य दोष असतील तर – म्हणजेच ‘बाशिंगबळ’ जड असेल तर – उपरोक्त ग्रंथाचे विशेष पद्धतीने वाचन केले तर निश्चितच फलप्राप्ती होते. ती पद्धती खालीलप्रमाणे –

प्रथमदिन – अध्याय ७-१-२-७, द्वितीयदिन – अध्याय ७-३-४-७, तृतीयदिन अध्याय ७-५-६-७, चतुर्थदिन – अध्याय ७-७-८-७, पंचमदिन – अध्याय ७-९ १०-७, षष्ठदिन – अध्याय ७-११-१२-७, सप्तमदिन – अध्याय ७-१३-१४-७, अष्टमदिन – अध्याय ७-१५-१६-७, नवमदिन – अध्याय ७-१७-१८-७. ह्याप्रमाणे नऊ दिवस पठन झाल्यावर एक पारायण होते. अशा पद्धतीने अठरा पारायणे करावीत. *

श्रीरुक्मिणीस्वयंवराच्या पारायणाचा संकल्प *

एखादा शुभ दिवस पाहून संकल्पासाठी आपल्या कुलपुरोहितांना निमंत्रण द्यावे. त्यांची उपलब्धी झाली नाही तर स्वतःच संकल्प व गणपतिपूजन करावे. त्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे. नंतर कुंकुमतिलक करून देवास, गुरुजींना व घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करावा. देव्हाऱ्यासमोर एका पाटावर किंवा ताह्मणात तांदूळ घालून त्यावर नारळ किंवा सुपारी ठेवून गणपतिपूजनाची तयारी करावी.

प्रथम आचमन व प्राणायाम करावा. नंतर पुढीलप्रमाणे देशकालनिर्देश करावा. ‘तिथिर् विष्णुस् तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च । योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् ।।’ ह्यानंतर खालीलप्रमाणे संकल्प करावा –

(हातात अक्षता घ्याव्यात.) अद्य शुभतिथौ ….गोत्रोत्पन्नायाः नाम्न्याः मम जन्मलग्नजन्मराशिभ्यां सकाशात् अनिष्टस्थानेषु प्राप्तप्राप्स्यमानानां पापग्रहाणां अनिष्टफलपरिहारपूर्वकं एकादशस्थानस्थितिवत्-शुभफलावाप्तये इहजन्मनि जन्मांतरेषु च विद्यमानानां विवाहप्रत्यवायभूतानां नानाविधदोषाणां परिहारद्वारा झटिति अनायासेन च विवाहसिद्ध्यर्थं दीर्घायुः-आरोग्य-ऐश्वर्य-धर्मप्रीति भार्यारति-सच्छील-सच्चरितादि-शोभनगुणमंडित-वरप्राप्त्यर्थं श्रीलक्ष्मीनारायण
प्रीत्यर्थ अद्यारभ्य यथावत्कालपर्यंतं प्रत्यहं
(वेळेच्या उपलब्धीनुसार वाचन करावयाचे असेल तर यथासंख्यं अध्यायपठनक्रमेण किंवा सातव्या अध्यायाचे संपुटीकरण करावयाचे असल्यास सप्तमाध्यायसंपुटित-अध्यायद्वयपठनक्रमेण )

एकनाथकृत- श्रीरुक्मिणीस्वयंवर-ग्रंथस्य अष्टादश (१८) – पारायण-पठनाख्यं कर्म करिष्ये ।। (अक्षतासहित पाणी ताह्मणात सोडावे.) आदौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थ महागणपतिपूजनं च करिष्ये ।। (ताह्मणात पाणी सोडावे. पाटावरील नारळावर किंवा सुपारीवर यथामति गणपतिपूजन करावे.) वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा ।। श्रीमहागणपतये नमः ।। (गणपतीस मनोमन नमस्कार करावा. स्थापित गणपतीवर अक्षता वाहून नंतर विसर्जन करावे. हा संकल्प व गणपतिपूजन केवळ पहिल्या दिवशीच करावयाचे असते.)

गणपतिपूजन झाल्यानंतर आपण ठरवलेल्या पद्धतीनुसार ‘श्रीरुक्मिणीस्वयंवर’ ह्या ग्रंथाच्या वाचनास प्रारंभ करावा. पारायणवाचन नेहमी मध्यम स्वरात स्वतःस ऐकू येईल इतपत मोठ्याने करावे. मनातल्या मनात वाचू नये. दरम्यान अशौच किंवा मासिकधर्म आल्यास ते संपल्यावर उरलेले पारायण पूर्ण करावे. त्या वेळी पुन्हा नव्याने प्रारंभ करण्याची जरुरी नसते. पारायणकालात सात्त्विक आहार ठेवावा. अठरा पारायणे पूर्ण झाल्यावर घरातील देवास अभिषेक करावा तसेच दंपतीभोजन घालावे किंवा मंदिरात शिधा द्यावा. त्यानंतर विवाह होईपर्यंत दररोज एका अध्यायाचे किंवा केवळ सातव्या अध्यायाचे वाचन चालू ठेवावे. बहुतेक वेळा अठरा पारायणे पूर्ण होण्यापूर्वीच विवाह ठरतो. अशा वेळी शक्यतो विवाहापूर्वीच अठरा पारायणे पूर्ण करावीत. अगदी अशक्य झाल्यास विवाहानंतर न विसरता त्यांची पूर्तता करावी. त्यानंतर मात्र वाचन चालू ठेवण्याचे कारण नाही.

दुसरे म्हणजे उपवर मुलीने भारतीय केशभूषा व वेषभूषा (तिलक, साडी व कांकणे) स्वीकृत केली तर विवाहयोग लवकर जुळून येतो असा अनुभव आहे. रुक्मिणीस्वयंवर ग्रंथाचे अनुष्ठान हे विवाहांगभूत असल्यामुळे किमान अनुष्ठानापुरती का होईना पण भारतीय केशभूषा, वेषभूषा परिधान केली तर विशेष अनुकूलता प्राप्त होते व त्यानंतरही ती चालू ठेवली तर संस्कृती व संसृती ह्यांचे उत्कृष्ट पालन होते.

शीघ्रविवाह सिद्धी व अपेक्षित वधूप्राप्ती ह्यांसाठी विवाहेच्छू मुलासदेखील उपरोक्त पद्धतीने श्रीरुक्मिणीस्वयंवराचे वाचन करता येते. त्या वेळी संकल्पात अधोरेखित स्थळी ।
होऊन घटस्फोटापर्यंत पोचलेल्या जोडप्यापैकी एकाने किंवा दोघांनी वरीलप्रमाणे पारायणे केल्यावर त्यांच्यात समेट होण्यास मदत होते. त्या वेळी ‘मम गृहे वैवाहिकजीवनकर्मणि उत्पन्नानां विविधप्रत्यवायानां समूलं परिहारपूर्वकं पुनर्मिलनसिद्धिद्वारा अद्यारभ्य (ह्यापुढील भाग वरील संकल्पाप्रमाणे)’ असा संकल्प करून श्रीरुक्मिणीस्वयंवराची होतील तेवढी पारायणे वरील पद्धतीने करावीत.

दुसरा उपाय म्हणजे पुरोहिताच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मणस्पतिसूक्ताचे विधिपूर्वक होमहवन (विशेषकरून अंगारकसंकष्टीदिवशी) करून घेतले असता शीघ्रतया विवाह ठरून येतो.

KeywordKD
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर कसे करावे? विवाहासाठी अचूक उपाय
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग पहिला
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग दुसरा
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग तिसरा
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग चौथा
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग पाचवा
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग सहावा
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग सातवा
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग आठवा
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग नववा
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग दहावा
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग अकरावा
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग बारावा
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग तेरावा
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग चौदावा
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग पंधरावा
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग सोळावा
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग सतरावा
ALSO READ: रुक्मिणी स्वयंवर प्रसंग अठरावा
रुक्मिणी स्वयंवर0
रुक्मिणी स्वयंवर पारायण कसे करावे0
रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ0
रुक्मिणी स्वयंवर पुस्तक0
रुक्मिणी स्वयंवर अध्याय पहिला0
रुक्मिणी स्वयंवर पुस्तक marathi0
रुक्मिणी स्वयंवर पुस्तक pdf in marathi

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *