अध्याय -४ कुरवपुरात वासवांबिकेचे दर्शन
kuravpuran vasvambikeche darshan
केला. श्री पळनीस्वामी
च्या आज्ञेनुसार ध्यानस्त खेत आपणास एखादा उत्कृष्ट
श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला पळनीस्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला. श्री पर म्हणाले, “बाबा ! माधवा ! वत्सा ! शंकरा आपण तिघेही श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनसार होऊन आपल्याला घडलेल्या ध्यानानुभवांची चर्चा करू या. ह्या अवस्थेत आपणास एखा अध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल. भविष्य काळात हूणशक (इसवीसन) हे व्यवहारात भी आज हणशकानुसार दिनांक २५-५-१३३६. शुक्रवार आहे. आजचा दिवस आपल्या जीवन फार महत्वाचा आहे. मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेऊन सूक्ष्मशरीराने कुरवपुरास जाईन. एका वेळेस चारपाच ठिकाणी सूक्ष्म रूपांत विहार करणे मला बाल्यक्रीडा वाटते. आपण सगळेच श्रीपाट श्रीवल्लभांच्या ध्यानात असताना, त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात त्यांच्या सांनिध्यात जाईन.”
स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून विचारले, “स्वामी ! माधवाने श्रीवल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे. आपण सदैव श्रीवल्लभांबरोबर सूक्ष्मरूपाने । विचरण करता, मला मात्र त्यांचे नावच माहीत आहे, रूप माहीत नाही. मग ध्यान कसे करायचे?” त्यावर श्री पळनीस्वामी मंदहास्य करित म्हणाले. “बाबा ! श्रीपादांची भक्ती असल्यास सगळेच सिद्ध होईल. श्रीपादप्रभु सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात. कासव आपल्या पिलापासून किती दूर असले तरी त्याच्या विचार तरंगानेच त्या पिलांचे रक्षण होते. थोडी उन्नती झाल्यावर मांजराचे पिलां प्रमाणे भक्ताचे पालन करतात. जसे मांजर त्याच्या पिलाला आपल्या तोंडात धरुन एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते. त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षीत । स्थान वाटते तेथेच त्या पिलास ठेवते. त्यानंतर माकडाचे पिला प्रमाणे भक्तांचे पालन होते. अशा पालनात पिल्लू त्यांच्या आईस अति प्रयत्नाने चिटकुन असते. अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळी |
बरोबर अति स्वेच्छेने आनंदाने विहार करणाऱ्या बाल माश्या सारखे भक्त श्रीगुरु समवेत असतात. त ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील. आज २५-५-१३३६, शक्रवार सर्व शुभयोग मिळून । असलेला योग. संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे. श्रीवल्लभांनी अतिमुख्य असा भविष्यनिर्णय ।
करण्याचे ठरवले असुन, मला सूक्ष्मरूपांत कुरवपुरास यावे असे सांगितले आहे. ध्यानस्थ असतांना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुरवपुरास जाणार. तेथे एखादी महत्वाची घटना घडणार आहे. ती माझ्या डोळ्याने पहाण्याची संधि श्रीदत्तप्रभूच्या कृपेनेच मिळेल” असे म्हणतच श्री पळनीस्वामी ध्यानस्थ झाले. मी आणि माधव सुद्धा ध्यानस्थ झालो.
अशा प्रकारे ध्यानात दहा तासांचा वेळ गेला. ध्यानानंतर श्रीपळनीस्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते. मी आणि माधवने श्री स्वामींना त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली. त्यावर स्वामींनी हसत मुखाने सांगण्यास सुरुवात केली.
शिवशर्माची गाथा – श्रीपाद श्रीवल्लभांचे चिंतनाचे फळ
ते म्हणाले, “या कलियुगातील लोकांचे किती महत् भाग्य आहे. कुरवपुर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या महत्तेस जाणून वेदपंडित सद्ब्राह्मण शिवशर्मा, भार्या अंबिके सह कुरवपुरातच रहात होते. कुरवपुरातील एकुलते एक असे हे ब्राह्मण कुटुंब होते. ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यकर्माने धनार्जन करून रोज कुरवपुरास परत येत असत. ते फार मोठे विद्वान पंडीत होते. ते अनुष्ठानीरत, काश्यप गोत्रोत्पन्न, यजुर्वेदीय ब्राह्मण होते. शिवशर्मास झालेली संताने । थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत. कसा बसा एक मुलगा वाचला. दुर्दैवाने तो मुलगा जड, मंदबुद्धिचा होता. निष्प्रयोजक संतान प्राप्तिमुळे शिवशर्मा दु:खी होते. एके दिवशी श्रीवल्लभांच्या समोर वेदपठण करून ते मौनपणे उभे राहिले. श्री स्वामींनी त्यांचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत ते म्हणाले, “शिवशर्मा ! दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो. तुझी इच्छा काय आहे ती सांग.’ त्यावर शिवशर्मा म्हणाले, “स्वामी ! माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडीत, वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती. परंतु ती पूर्णपणे रसातळास गेली. माझा मुलगा अत्यंत मंद बुद्धिचा आहे. सर्व चराचरात, सगळ्या घटाघटात व्यापून असणाऱ्या, सामर्थ्यवंत असलेल्या आपणास त्याला पंडित करणे, निष्ठावान करणे काहीच अवघड नाही. एवढी मजवर कृपा करावी.”
त्यावर श्रीपाद म्हणाले “बाबा ! कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते. सगळी सृष्टी सुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे. स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो. दानाचे फलस्वरूप मुलेबाळे होतात. सर्वदा दान सत्पात्री करावे. दान घेणारे सत्पात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवते. सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेवू घातल्यास त्याने केलेल्या पुण्यकार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पापकार्यामुळे मिळालेल्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे. तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल. पूर्वजन्मीच्या कर्म फळानेच तुला मंदबुद्धीचा मुलगा जन्मला. तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको पूर्णायुषीच द्या असे मागणे केले होते. पूर्णायुषी
पुत्र दिला. त्याचे पूर्व जन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करावयाचे प्रकार कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित के त्यावर शिवशर्मा म्हणाले, “स्वामी ! माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे. मी, जीवन त्यागण्यास सिद्ध आहे. माझा कुमार बृहस्पतिसारखा पंडित, वक्ता झाल्यावर दुसरे काय हवे ? संपूर्ण चराचराला, घटाघटाला व्यापून रहाणारे सामर्थ्यवंत श्रीपान म्हणाले, “बरे ! तुझा लवकरच मृत्यु होईल. मरणांतर सूक्ष्म देहाने धीशीला नगरा (सध्याचे शिर्डी) निंबवृक्षाच्या पायथ्यापाशी असलेल्या भूगृहात थोडाकाळ तपश्चर्येत रहाशील त्यानंतर पुण्यभूमि असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील. ह्या विषयी तू तुझ्या बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस.”
श्रीपाद श्रीवल्लभांच्या भावीजन्माचा निश्चय (आविष्करण)
लवकरच शिवशर्मा मरण पावला. अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती शेजार पाजारचे लोक हसत, टिंगल उडवीत. त्यास अंतच नसे. त्या मठ्ठब्राह्मण मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला. त्याची माता सुद्धा असहायपणे। आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली. त्यांच्या पूर्वपुण्याईच्या प्रभावाने वाटेत श्रीपाट। श्रीवल्लभ स्वामी सामोरे आले. त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडविले. श्रीपाट। ‘श्रीवल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले. अंबिकेने शेष जीवन शिव पूजेत घालवावे असा आदेश दिला. शनिप्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष । समयास केलेल्या शिवपूजानाचे फळ कसे मिळते ह्याची सविस्तर माहिती दिली. पुढील जन्मी । अंबिकेला “माझ्या सारखाच मुलगा होईल” असा वर दिला. परंतु त्यांच्या सम या तिन्ही लोकांत । कोणीही नसल्याने श्रीस्वामीनी पुढील जन्मात तिच्या पुत्र रूपात जन्म घेण्याचा निश्चय केला.
नृसिंहसरस्वति आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प
समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासवांबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले “तुझा संकल्प। सिद्ध होईल ! मी आणखी १४ वर्षे म्हणजे या शरिराला ३० वर्ष येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपांतच राहून त्या नंतर गुप्त होईन. त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंहसरस्वती ह्या नावाने ओळखला जाईन. ह्या दुसऱ्या अवतारात ८० वर्षे राहीन, या अवतार समाप्तीनंतर कदळी वनात ३०० वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात (अक्कलकोट) स्वामी समर्थ या नावाने अवतार । धारण करीन. अवधूत अवस्थेत सिद्धपुरुषांच्या रूपाने, अपरिमित अशा दिव्यकांतीने, अगाध | लीला, दाखवीन. साऱ्या जगाला धर्म कर्माला अनुसरून, त्या विषयी आसक्तिरहित करीन.”
पळनीस्वामी पुढे म्हणाले जशी-जशी युगे बदलतील तशी-तशी मानवाची शक्ति कमी। होत जाईल. त्यासाठी परतत्त्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थाईवर उतरून येईल. शरिरधारी । प्रभूचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय. अशा रीतीने प्रभूतत्त्व खालच्या पातळीवर ।
प्रमाणात कमी होते. महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत अर त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात. ह्या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिल अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जेथून उद्भवली तेथे जातात. म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात. ह्याला तिरोधान म्हणतात. थोडे पुण्यकार्य केल्या विशेष शश फळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात. स्वामी पुढे म्हणाले “बाबा! क्रिया सिद्धांताप्रकारे सृष्टी, स्थिती, लय या तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले. तू ध्यानात अस पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद श्रीवल्लभांची शक्ति विशेषरीत्या प्रवाहित होईल. निंबवृक्षाच्या जवळ असलेल्या, भूगृहांतील चार नंदादिपाना तू पाहू शकलास ही असाधारण किमया आहे. श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्यातरी महान उद्देशाच्या दृष्टीनेच तुला असा अनुभव दिला त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे. त्यांच्या लीला फार अगम्य असतात. गदार्थ प्रयोजक असतात. त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मतितार्थ जाणता येत नाही. त्यात सदा देवरहस्ये असू शकतात. त्यांच्या अनुमतिनेच मी तुला त्याचे विवरण करु शकलो. समस्त सष्टी। त्यांच्या नजरेखालीच असते. त्यांचे तेच प्रमाण आहेत. त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहेत. विश्वनियंता। सुद्धा तेच आहेत, योगसिद्ध आहेत, अमेय आहेत. ते परिणामांना, मोजमापांना, परिमितीला साध्य होणारे विषयच नाहीत.”
श्री पळनीस्वामींच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने बहरून गेले. मी उडुपी क्षेत्राहून निघालो. कुरवरपुरास जाताना मध्येच कितीतरी चित्र-विचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या. या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्रीगुरु सार्वभौमांची अनुमति घ्यावी या विचाराने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनोत्तर। त्यांच्याशी विचार विनिमय करण्याचे ठरविले…
श्री पळनीस्वामींनी माझ्या मनातील भावाला लीलेनेच समजुन घेतले ते म्हणाले “तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे. भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्रीप्रभूच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस. ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशिर्वाद देतील.” त्यानंतर श्री पळनीस्वामी माधवास त्याच्या ध्यानानुभवाविषयी सांग असे म्हणाले. माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरूवात केली.
श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थानी, श्रींच्या पादुका, श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीदत्तात्रेय आणि श्री नृसिंहसरस्वती यांच्या मूर्तिंची प्रतिष्ठापना ___ श्री पळनीस्वामी म्हणाले, “बाबा ! शंकरा, तू दर्शन घेतलेले श्रीवल्लभांचे मातागृहच तुझ्यातील सर्वशक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे. तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षांपासून तपात बसलेले ऋषी आहेत. तू पाहिलेल्या श्रीवल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल. पादुकांच्या प्रतिष्ठापने। नंतर काही वर्षानी अति प्रयत्नाने श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल. तू बसून ध्यान
सिंह सरस्वतींच्या मूर्ति स्थापना वेळ मौन धरले. आ
केलेल्या जागेत श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचा पूर्व अवतार असलेले श्रीदत्तात्रेय, त्याचा नतर श्रीनृसिंह सरस्वतींच्या मूर्ति स्थापित करण्यात येतील. त्यानंतर त्या क्षेत्रात विस्ताराने लीला हाताल..
त्यानंतर श्री पळनीस्वामींनी थोडा वेळ मौन धरले. आमच्या गुहेच्या जवळच असलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यास सांगितले. प्रेतास बाहेर काढल्यावर प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली. “श्रीपादराजं शरणं प्रपद्ये’ व्याघेश्वर शर्मा जयघोष करीत होता. श्री पळनीस्वामींनी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला. वयोभाराने शिथील झालेल्या वृद्ध शरीरास, व्याघ्ररूपात असलेल्या व्याघेश्वर शर्माने जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेले.
नूतन शरिरात प्रवेश केलेल्या पळनीस्वामींनी आज्ञा केली, “तुम्ही या क्षणीच येथून जावे. बाबा ! माधवा ! तू तुझ्या विचित्रपुरास जा. बाबा ! शंकरा ! तू तिरुपति या महाक्षेत्रास जावे. माधवा ! तू तुझ्या सूक्ष्म शरीराने पीठिकापुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस, तेच तुला या जन्मात पुरे. श्रीपाद श्रीवल्लभ अनुग्रह प्राप्तिरस्तु.”
तेव्हाच माधव विचित्रपुराकडे, मी तिरुपतीकडे प्रयाणास निघालो. श्रींच्या लीलेचा अंत लागत नाही हेच खरे.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार ||