guruji Astrology | Jyotish

गोष्टींची गोष्ट बृहत्कथा: गुणाढ्य आणि संस्कृत साहित्यातील त्याचा महत्त्व

What a fascinating story! The Epic: Its Significance in Sanskrit Literature and Beyond

It seems like you’re sharing a tale from ancient India, around 2000 years ago, during the reign of the Satavahana dynasty in Pratishthan (modern-day Paithan). The king had a favorite queen who was a great scholar and loved the Sanskrit language. She was proficient in Maharashtri Prakrit, the language spoken in the kingdom.

One day, the king and queen went to the Godavari River, and the queen got wet in the water. The king, in playful jest, started pouring water on her. The queen, annoyed, said “मोदकै: सिंच माम्” (Modakai: Sinch Mām), which the king mistakenly understood as asking for a bath with Modaks (a type of sweet dish). The king, delighted, ordered a shower of Modaks on the queen, which further annoyed her.

This story showcases the playful and romantic relationship between the king and queen, as well as the queen’s wit and knowledge of Sanskrit

बृहत्कथा: गुणाढ्य आणि संस्कृत साहित्यातील त्याचा महत्त्व

खूप जुनी गोष्ट आहे जवळ जवळ दोन हजार वर्षांपूर्वीची .. गोदाकाठी पैठणला सातवाहन राजे राज्य करत होते. या सातवाहन राजाची एक आवडती राणी होती.. ती मोठी विदुषी होती .. तिला संस्कृत भाषा खूप आवडे.. राजाला मात्र राज्यात चालणारी महाराष्ट्री प्राकृतच चांगली येत होती….


एकदा राजा राणी गोदावरी नदीची शोभा पाहायला गेले.. राणी पाण्यात उतरली.. राजेसाहेब मागोमाग उतरले आणि सहज गम्मत म्हणून राणीच्या अंगावर पाणी उडवायला लागले.. राणी थोडी वैतागली आणि संस्कृतमध्ये हसतहसत म्हणाली “मोदकै: सिंच माम्” म्हणजे उदकाने -पाण्याने मला भिजवू नकोस पण “मा”( नको ) आणि “उदक”(पाणी ) यांची संधी करून राणीने मोदक असं म्हटले .. राजाला वाटले राणी म्हणतेय मला मोदकांनी ( लाडूंनी ) स्नान घाला .. राणीची इच्छा आणि राजाची आज्ञा.. लगेच भरपूर मोदक मागवले गेले आणि स्वतःवर खुश होऊन राजाने राणीवर मोदकांचा वर्षाव करायला सुरुवात केली.. आधीच पाण्याने वैतागलेली राणी आता खूपच चिडली .. फणकाऱ्याने बाहेर निघून गेली.
काय झाले हे राजेसाहेबाना आधी कळले नाही नंतर इतरांनी सांगितले आणि राजा एकदम दुःखी झाला …आवडती राणी नाराज झाली आणि आपला अहंकार पण दुखावला गेला आता काहीही करून पूर्ण संस्कृत शिकायचेच असे ठरवून राजाने दरबारातल्या विद्वानांना पाचारण केले. .. या विद्वानमंडळीत सर्वात श्रेष्ठ असे दोनजण- एक व्याकरणतज्ञ “शर्ववर्मा” तर दुसरा महाकवी “गुणाढ्य” .
राजाने आपली अडचण सांगितली.. काही करून मला संस्कृत मध्ये व्याकरणासहित सहा महिन्यांत पारंगत करा…यावर सहा महिन्यांत हे शक्य नाही असे कवी गुणाढ्याने सांगितले .. व्याकरणकार शर्ववर्माने मात्र मी सहा महिन्यात शिकवू शकतो असे सांगितले .. त्यावरूनच गुणाढ्य आणि शर्ववर्मा यांच्यात विवाद सुरु झाला आणि याचे पर्यवसान म्हणून शेवटी “सहा महिन्यात राजा जर संस्कृत व्याकरण पारंगत झाला तर मी या जन्मात संस्कृत किंवा प्राकृत मध्ये काव्य लिहिणार नाही” अशी कठोर प्रतिज्ञा गुणाढ्याने घेतली.
शर्ववर्मा कडे व्याकरण शिकविण्याचे एक खास तंत्र होते ते वापरून त्याने राजाला खरोखर सहा महिन्यात व्याकरण शिकविले आणि दृढ प्रतिज्ञा घेतलेल्या गुणाढ्य कवीने प्रिय संस्कृत-प्राकृत भाषेचा त्याग केला… प्रतिज्ञा पुरी केली खरी पण गुणाढ्य मनातून निराश झाला .. एका कवीचा प्राणवायू म्हणजे त्याची भाषा .. हा प्राणवायूच दुरावला .. आता हे सर्व जग व्यर्थ … राजसभेतल्या मानाच्या पदाचा त्याग करून गुणाढ्य दूर विंध्य पर्वताकडे निघून गेला… . तिथल्या घनदाट जंगलात विमनस्क होऊन फिरू लागला..
फिरता फिरता जंगलाच्या एका दुर्गम भयानक भागात तो पोहोचला, चित्रविचित्र पशुपक्ष्यांची भरलेल्या , भीतीदायक आवाजांनी अजूनच घाबरवणाऱ्या त्या वनात त्याच्या समोर एक पिशाच्च प्रकट झाले … गुणाढ्य बिचकला पण ते शापित भूत मानवी आवाजात बोलू लागले.. .. त्याने मी तुला काही हानी पोचवणार नाही पण मी काही कथा सांगणार आहे त्या पूर्ण ऐकून घे असे सांगितले .. ( भूत असले म्हणून काय त्याला सुद्धा कोणाशी तरी बोलून मन मोकळे करायचे असणार ) ..
यानंतर पिशाच्चाने त्याला विद्याधरांच्या ( यक्ष-गंधर्व यांसारखे दिव्य जीव ) अतिशय रोचक अशा सात दीर्घकथा सांगितल्या, या मुख्य कथांच्या अनुषंगाने अनेक उपकथा , गोष्टी .. त्या सुद्धा भुताच्या स्वतःच्या भाषेत म्हणजे “पैशाची” भाषेत .. कथा पूर्ण सांगून झाल्यावर ते भूतयोनीतुन मुक्त झाले.
( ह्या दंतकथेचा साधा अर्थ असा असावा की गुणाढ्याने प्रवास करून , वनवासी लोकांसमवेत राहून अनेक कथा कहाण्या ऐकल्या , त्यांची पैशाची भाषा शिकून घेतली )
संस्कृत चा तर त्याग केलेला म्हणून पुढे या ऐकलेल्या कथांवर त्याने पैशाची भाषेत एक कथासंग्रहरुपी ग्रंथ रचला… अनेक कथांमुळे तो अतिशय मोठा म्हणजे “बृहत” झाला आणि त्याचे नावच गुणाढ्याने “बृहत्कथा” ( पैशाची भाषेत “बड्डकहा”) असे ठेवले. असे सांगतात जवळ शाई नसल्यामुळे त्याने आपल्या रक्ताने भुर्जपत्रांवर लिहून काढला.
आता गुणाढ्याचे नैराश्य दूर झाले आणि हा ग्रंथ घेऊन तो परत प्रतिष्ठान नगरीजवळ आला .. नगराच्या बाहेरील जंगलात तो राहिला.. लिहिलेला ग्रंथ राजासमोर सादर करण्याची परवानगी मागण्यासाठी त्याने राजाला निरोप पाठवला.. पण राजाने मात्र पैशाची हि तर भूतपिशाच्चाची भाषा .. तिच्यातला ग्रंथ तो काय असणार असे म्हणून परवानगी नाकारली.
हे ऐकून गुणाढ्य मनातून उन्मळून पडला … निराश मनाने त्याने जंगलात एका जागी अग्नी पेटवला …आपल्या ग्रंथाचे सात भाग घेऊन समोर ठेवले आणि कथा मोठ्याने पठण करायला सुरु केली … त्या रोचक , सुंदर कथा ऐकायला जंगलातले सगळे पशुपक्षी खाणे पिणे विसरून कथा ऐकायला त्याच्या सर्व बाजूंनी बसले…पहिले पान वाचून झाले आणि गुणाढ्याने ते पान अग्नीत अर्पण करून टाकले…. याप्रमाणे त्याच्या स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या त्या प्रचंड ग्रंथाची पाने एक एक करत एकदा वाचली जाऊन अग्नीत भस्म होऊ लागली .. पशु पक्ष्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या…. हा करुण यज्ञ अनेक दिवस चालू होता..
इकडे राजमहालात राजाला जेवणातील सामिष अन्न जास्तच कोरडे , शुष्क आहे असे वाटू लागले … त्याने आचाऱ्याला फैलावर घेतले.. तर आचारी म्हणाला आमचा काय दोष महाराज जंगलातून शिकार करून आणणारे आजकाल असेच मांस आणत आहेत… यावर शिकारी लोकांना बोलवून विचारले गेले तर ते सांगू लागले …महाराज जंगलात एक बाबा काहीतरी पुस्तक वाचीत अन मग जाळीत बसलाय.. आणि ते ऐकताना पशु पक्षी खाणे पिणे विसरले .. त्यामुळे ते कृश झाले आहेत .. यात आमचा काय दोष…
हे ऐकून राजाला एकदम पैशाची भाषेतील ग्रंथ आणि तो निरोप आठवला … काहीतरी चुकतेय हि जाणीव त्या राजाला झाली आणि तात्काळ राजा जंगलाकडे धावला … वनात पोचून गुणाढ्य व त्याचा स्वतःवरच सूड उगवल्यासारखा तो होम बघून राजा जिवाच्या आकांताने त्याच्या जवळ धावला … “नाही नाही हा अमूल्य ग्रंथ मी जाळू देणार नाही ” असे म्हणून राजाने आपल्या जुन्या मित्राला, गुणाढ्याला घट्ट पकडून ठेवले … त्याची क्षमा मागितली आणि ग्रंथाची उरलेली पाने वाचली.
तोपर्यंय सात पैकी सहा भाग भस्मसात झालेले होते फक्त सातवा भाग उरला तो देखील आकाराने विशाल होता … आणि तोच “बृहत्कथा” कथासंग्रह….अनेक तज्ज्ञांच्या मते जगातील बहुधा पहिले लौकिक ( धार्मिक -अध्यात्मिक नसलेले ) कथावाङ्ममय म्हणजे बृहत्कथा. .. अतिशय वेधक , रोचक आणि चमत्कारिक कथांनी सजलेला हा ग्रंथ पुढच्या काळात अनेक संस्कृत-प्राकृत भाषांतील नाटक-काव्यांचा आधारस्त्रोत ठरला.. रामायण आणि महाभारत यानंतर बृहत्कथेचे नाव घेतले जाऊ लागले..
दुर्दैवाने मूळ पैशाची भाषेतील हा ग्रंथ आज विलुप्त झाला आहे पण त्याची अनेक संस्कृत भाषांतरे- रुपांतरे उपलब्ध आहेत . ( त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे काश्मीरमध्ये रचले गेलेले “कथासरित्सागर”. )
या कहाणीत अनेक अमानवी दंतकथा, आख्यायिकांची सरमिसळ असली तरी ‘बृहत्कथा’ आणि “गुणाढ्य” हे ऐतिहासिक सत्य आहेत आणि ते आपल्या महाराष्ट्र भूमीत घडलेले आहेत हे विशेष …. अशी ही कहाणीची कहाणी सुफळ संपूर्ण.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *