सूर्यसिध्दांत

सूर्यसिध्दांत तसेच बाणवृध्दीरसक्षयः म्हणजे नेमके काय ?

सूर्यसिध्दांत Suryasidhant काय असतो ?


ज्योतिषशास्त्राचा इतिहास हा ब्रम्हांडाच्या उत्पत्तीपासूनच सुरु
होतो व हे शास्त्र ब्रम्हांडाच्या अंतापर्यंत कायम राहील. ब्रम्हांडातील
अनेक ग्रह गोलांचे ज्ञान अजूनही मानवाच्या कक्षेपलिकडे आहे कारण आहे
ब्रम्हांड (अंतरिक्ष) अनंत आहे व मानवास खूपच मर्यादा आहेत. मता
ब्रम्हांड/अंतरिक्ष संदर्भातील अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.
प्रत्यक्ष सूर्यदेवांनी ब्रम्हांडातील अनेक रहस्यांची उकल केली आहे व
ज्योतिषशास्त्रासंबंधातील गूढ ज्ञान व अनेक शंकांचे समाधान केल्याचे
उल्लेख आपल्या शास्त्रग्रंथांमध्ये आहेत. सूर्य व मय यांच्यात झालेल्या
संवादामध्ये या गूढ ज्ञानाची उकल केलेली आढळते. सूर्यदेवांनी मयाला
जो उपदेश केला तोच सूर्यसिध्दांत होय.
वेदांमध्ये सूर्याला हिरण्यगर्भ असे म्हणतात व

सूर्यसिध्दांत
सूर्यसिध्दांत


नक्षत्रग्रहसोमानां प्रतिष्ठायोनिरेव च ।
चन्द्रऋक्षग्रहा सर्वे विज्ञेया सूर्यसंभवा ।।

या व्यासोक्तिनुसार नक्षत्र, ग्रह, चंद्र इ.ची उत्पत्ती ही सूर्यापासूनच
झालेली आहे. आपले प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्र हे त्रिस्कंधात्मक मानले
गेलेले आहे. सिध्दांत संहिता व होरा हे ते ३ स्कंध होत. त्रिस्कंध
ज्योतिषशास्त्रामधील सर्व सिध्दांतांमध्ये भगवान श्रीसूर्यदेवद्वारा
प्रतिपादित सूर्यसिध्दांत नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामधील गणित हे इतर
सर्व सिध्दांतांपेक्षा जास्त सूक्ष्म मानले गेले आहे, जे आदित्यसिध्दांत भवेच
सूक्ष्मम् या उक्तीवरुनच स्पष्ट होते.

वरील सूर्यसिध्दांताच्या मतानुसारच बाणवृध्दीरसक्षयः अर्थात ५ घटींनी
तिर्थीची वृध्दी व ६ घटींनी तिथींचा क्षय, असे गणित प्राचीन मतानुसार
आपल्या ऋषीमुनींनी बसविले आहे. बाण म्हणजे ५ व रस म्हणजे ६.
तिथींचे मध्यममान हे ६० घटिका म्हणजे २४ तास आहे. पण प्रत्येक
दिवशी ६० घटिकांचीच तिथी असेल असे होत नाही. कधीतरी तिथींची
वृध्दी होते तर कधी तिथींचा क्षय होत असतो. भारतीय प्राचीन मतानुसार
तिथींची वृध्दी ही जास्तीत जास्त ६५ घटिकांपर्यंत होऊ शकते व तिथींचा
क्षय जास्तीत जास्त ५४ घटिकांपर्यंतच होऊ शकतो. सूर्यसिध्दांतातील
वरील मताला अनुसरुनच इ.स. १४७८ मध्ये दैवज्ञ मकरंदाचार्यांनी काशीमध्ये मकरंद नावाच्या ग्रंथाची रचना केली. या पध्दतीवर आधारित तिथीच धर्मशास्त्रीय कार्याला उपयुक्त आहे. या ग्रंथावरुन येणारे चुकी
तिथ्यादिमान हे बाणवृध्दीरसक्षयः या मताला अनुसरुनच येतात. योग्य सध्या भारतातून निघणारी पंचांगे ही दोन गणितीय पध्दतींवर आधारित असे आहेत.

१. बाणवृध्दीरसक्षयः या गणितीय पध्दतीवर आधारित प्राचीन केले
मताचे सूर्यसिध्दांतीय पंचांग व २. सप्तवृध्दिदशक्षयः या गणितीय पध्दतीवर
आधारित आधुनिक दृकसिध्दांतीय म्हणजेच दृश्यगणितावर आधारलेले आहे
वरील दोन्ही पंचांग पध्दतींपैकी बाणवृध्दीरसक्षयः या प्राचीन साय
गणितीय पध्दतीनुसार येणाऱ्या तिथीच व्रत, उपवास, श्राध्द, पक्ष,
श्रौतस्मार्तकर्मानुष्ठान तसेच नित्यकर्मांसाठी वापरण्यांत याव्यात असे सर्व कुता
शास्त्रपुराणांचे आग्रहाचे सांगणे.

श्रौतस्मार्तकर्मानुष्ठानपरैः सूर्यसिध्दांतात्साधित रविचंद्राभ्यामानीत तिथ्यादयः एव श्राध्दादि नित्यकर्मसु उपादेया ।सूनान्याबीजसंस्कृता दृक्समा ग्रहा ग्राह्या ।।

असे वचन आहे.
श्रौतस्मार्त कर्मानुष्ठान तसेच श्राध्दपक्ष व नित्यकर्मांसाठी सूर्यसिध्दांतीय
गणितानुसार येणाऱ्या तिथीच ग्राह्य धराव्यात असे स्पष्टपणे सांगितले
आहे. त्याचप्रमाणे निर्णयसिंधूकार स्पष्टपणे सांगतात की अदृष्ट अशा
तिथींच्या गणनेसाठी सूर्यसिध्दांतीय गणितच वापरावे.
अदृष्टफलसिध्दयर्थं यथार्कगणितं कुरु ।।
वरील सर्व विधानांना विष्णुधर्मोत्तरपुराणसुध्दा पुष्टी देते.
विष्णुधर्मोत्तरपुराणात उल्लेख आहे की,

यंत्रवेधादिना ज्ञातं यद् बीजं गणकैस्ततः ।
ग्रहणादि परिक्षेत न तिथ्यादि कदाचन ।।

अर्थात यंत्रांच्या सहाय्याने गणना करुन (म्हणजेच आधुनिक दृश्यगणितीय
क नॉटीकल पंचांगांनुसार) ग्रहण इ. दृश्य घटनांचे परिक्षण करण्यांत यावे
कोपरंतु तिथी इ.चे गणित करण्यासाठी दृश्य गणित वापरु नये. म्हणजेच
बर तिथी इ. अदृष्ट गोष्टींचे साधन करण्यासाठी दुश्य गणिताचा ऋषिमुनींनी
वा सक्त निषेध केलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व भारतवासीयांचे
ल सण, वार, उत्सव, व्रतवैकल्ये, श्राध्दपक्ष, नवरात्र, कुलधर्म, कुलाचार इ.
नी तिथींवरच अवलंबून आहेत. त्यामुळे योग्य तिथींनुसार केलेली व्रतवैकल्ये,
धर्म, श्राध्दपक्ष हेच कर्त्याला योग्य फल प्राप्त करुन देऊ शकतात

चुकीच्या वेळी अयोग्य अशा तिर्थीनुसार कर्म केल्यास कर्त्याला त्याचे
योग्य फल मिळत नाही. भगवान श्रीकृष्णसुध्दा गीतेत अदेशकालेयद्दानं
असे वाक्य वापरतांना म्हणतात की अयोग्य अशा वेळी जर एखादे कर्म
केले तर कर्त्याला त्याचे पूर्ण फल प्राप्त होत नाही.
त्याचप्रमाणे श्राध्दकाळाचा निर्णय करतांना गोभिल ऋर्षीचे असे वचन
आहे की, त्रिमुहूर्तानचेद्‌ग्राह्यापरैवकुतपेहिसा अर्थात, पार्वणश्राध्दाविषयी
अपराण्हव्यापिनी तिथी घ्यावी, दोन्ही दिवशी अपराण्हव्याप्तीनसता
सायाण्हव्यापिनी तिथी घ्यावी. परंतु पूर्वदिवशी अपराण्हव्यापिनी तिथी
नसेल व सायाण्हव्यापिनीसुध्दा नसेल तर गोभिलऋषी म्हण्तात, परैव
कुतपे हि सा म्हणजे दुसऱ्या दिवशी ती कुतप कालात (सूर्योदयापासून
आठव्या मुहूर्तात) असायलाच पाहिजे.
आता आधुनिक दृश्य गणितीय पंचागांनुसार सप्तवृध्दिदशक्षयः
सूत्रानुसार जेव्हा तिथीचा क्षय होऊन ती ५० घटिकांपर्यत कमी होईल
त्यावेळी काही दिवशी श्राध्दाला तिथीच मिळत नसल्याने श्राध्द कधी
करावयाचे असा प्रश्न निर्माण होतो.
अलिकडे ६० वर्षांपासून काही ठिकाणी दृकसिध्दांतीय पंचांगांचा वापर
सुरु झाला आहे. त्याला तेव्हापासूनच धर्मशास्त्रातील जाणकारांचा विरोध
होता व भविष्यातही असणार. इ.स.१९६३-६४ मध्ये क्षयाधिमास आला
होता. त्यावेळी वाराणसीत काशी नरेशांच्या सभापतित्वात जे निर्णय घेण्यांत
आले त्यानुसार ज्योतिषशास्त्र हे वेदप्रामाण्य आधारभूत असल्यामुळे
सूर्यसिध्दांतरीतीनुसार साधलेली तिथीच श्रौतस्मार्त, व्रतोपवास, सणवार,
श्राध्द इत्यादिकांस योग्य आहेत. सभेतील निर्णयाप्रमाणे त्या वर्षी दसरा
व दीपावली हे सूर्यसिध्दांतानुसार येणाऱ्या तिथींप्रमाणेच साजरे करण्यांत
यावेत असे जाहीर करण्यांत आले. थोडक्यात सभेच्या निर्णयाप्रमाणे
सूर्यसिध्दांतानुसार येणाऱ्या पंचांगांसच मान्यता मिळाली. आजदेखील
जय उत्तरभारतात, दक्षिण भारतात तसेच श्रृंगेरी पीठाचे जदगदुरु श्रीशंकराचार्य
वे यांच्या पीठावरुन निघणारे पंचांग हे सूर्यसिध्दांतावरच आधारित आहे.
च वरील सर्व विवेचनावरुन श्राध्दपक्ष, वण, व्रत, उपवास, नित्यकर्म इ. चा
बनी निर्णय आधुनिक दृश्यगणितीय पंचांगातील तिथींप्रमाणे करणे सर्वथा
बांचे चुकीचे असल्याचे सिध्द होते.

5 मुखी रुद्राक्ष

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *