षष्ठी पूजन
WhatsApp Image 2022-07-13 at 5.58.14 PM
WhatsApp Image 2022-07-13 at 5.58.14 PM

षष्ठी पूजन

षष्ठी पूजन म्हणजे काय जाणून घ्या अगदी साधारण भाषेत !

अलीकडे काही वर्षे प्रसूति (बाळतपण) दवाखान्यात होत असल्याने •प्रसूतीपासून ५ व्या व ६ व्या दिवशी षष्ठीपूजन करावयाचे असते हे माहित नाहीसे झाले आहे. जन्माला आलेल्या बालकाला कुठलीही बाधा होऊ नये व त्याला आयुरारोग्य लाभावे या हेतूने शास्त्राने षष्ठीपूजन करण्यास सांगितले आहे. रोज शांतिपाठ व रामरक्षा म्हणली जात असे. रामरक्षा म्हणून लहान मुलास अंगारा लावला म्हणजे त्याला कसलीही बाधा होत नाही हे अनेकांच्या अनुभवाचे आहे.

५ व्या व ६ व्या दिवशी पूजन करावे. दोन दिवस जमले नाही तर. सहाव्या दिवशी (एक दिवस) पूजन करावे. ही पूजा सूर्यास्तानंतरच्या पहिल्या प्रहरात करावी. दवाखान्यात प्रसूति झाली तरी घरांत हे पूजन करावे. जननाशौचात (सोयरात) ही पूजा करण्यास, तसेच दान देण्यास व दान घेण्यास अधिकार असतो.

षष्ठी पूजनाचा संकल्प व पूजा पद्धति

आचम्य प्राणानायम्य देशकालौ संकीर्त्य-फल प्राप्त्यर्थं अस्य शिशोः समातृकस्य सकलारिष्ट निरसनद्वारा आयुरारोग्य प्राप्त्यर्थ विघ्नेशस्य जन्मदानां षष्ठीदेव्याः जीवतिकायाः स्कंदस्य शस्त्रगर्भाभगवत्याश्च पूजनमहं करिष्ये आदौ निर्विघ्नता सिद्धयर्थ महागणपति पूजन करिष्ये.

गणपति पूजन करून तांदुळावर पांच सुपाऱ्या मांडून एकेका सुपारीवर विघ्नेशादी पांच देवतांचे आवाहन करून ‘विघ्नेशाद्यावाहित देवताभ्योनमः’ म्हणून षोडशोपचार पूजन करावे (पौराण मंत्र घ्यावे) नंतर पाट्यावर शस्त्र ठेऊन शस्त्र गर्भागवत्यैनमः म्हणून गंधादि पंचोपचार पूजन करावे.

या षष्ठी पूजनात हिंगाचे पाणी देवतावर शिपडण्याची तसेच हरभऱ्याची उसळ (घुगऱ्या) गुळाचा शिरा व भात याचा नैवेद्य समर्पण करण्याची पद्धत आहे.

पूजनानंतर प्रार्थना, पूजा समाप्त करून दहिभाताचा बलि दाराबाहेर ठेऊन हातपाय धुऊन आचमन करावे. दहा दिवस रोज निदान रामरक्षा म्हणून तो अंगारा बाळास व आईला लावावा.

प्रार्थना

सर्वविघ्नहरोसित्वमेकदंत गजानन । षष्ठीगृहेचितः प्रीत्या बालं दीर्घायुषं कुरू ।।

लंबोदर महाभाग सर्वोपद्रव नाशन । त्वत्प्रसादादविघ्नेन चिरंजीवतु बालकः ।।

वरदाः सायुधा यूयं जन्मदा इति विश्रुताः । शक्तिभिः सहबालं मे रक्षता त्वान्हि जागरे ।|

शक्तिस्त्वं सर्व देवानां लोकानां हित कारिणी । मातर्बालमिमरक्ष महाषष्ठि नमोस्तुते ॥

जननी सर्व भूतानां बालानांच विशेषतः । नारायणी स्वरूपेण बालमे रक्ष सर्वदा ॥

भूत प्रेत पिशाचेभ्यो शाकिनी डाकिनीषुच । मातेव रक्ष बालं मे श्वापदे पन्नगेषुच ॥

गौरी पुत्रो यथा स्कंदः शिशुत्वे रक्षितः पुरा । तथाममाप्ययं बालः षष्ठिके रक्षितां नमः ।।

कार्तिकेय महाबाहो गौरीहृदय नंदन। कुमारं रक्ष भीतिभ्यः पाहि देवि नमोस्तुते ॥

अस्मिस्तु सूतिकागारे देवीभिः परिवारिता । रक्षां कुरू महाभागे चिरंजीवतु बालकः ।।

अयंमम कुलोत्पन्नो रक्षार्थं पादयोस्तव। नीतोमातर्महाभागे चिरंजीवतु बालकः ।।

रूपं देहि जयं देहि भगं भवति देहिमे । पुत्रान् देहि धनं देहि सर्वान्कामांश्व देहिमे ।।

संदर्भ ग्रंथ धर्म शास्त्रीय निर्णय

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *