Shiv दक्षिणावर्ती शंख

 नक्षत्रासंबंधी माहिती नक्षत्राचे गण नक्षत्राचे आराध्यवृक्ष दान व देवता नक्षत्र लोचन

नक्षत्र से जानिए, कब मिलेगी आपकी खोई वस्तु…

नक्षत्राचे गण जानिए गण और नक्षत्रों के महत्व को

: या गणाचा वधुवर मेलनात जातकाचा स्वभाव, आचरण, प्रवृत्ती दर्शकासाठी केला जातो. देवगणी नक्षत्रे : शुद्धआचार विचार, सात्त्विक प्रवृत्ती, धार्मिकवृत्ती, सत्यप्रिय, परमेश्वर व धर्मावर निष्ठा, परोपकार, पापभिरू, सत्त्वगुणी अश्विनी, मृगशीर्ष, पुनर्वसु, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण व रेवती ही देवगणी नक्षत्रे आहेत.

मनुष्यगणी जानिए क्या है आपका गण और उससे संबंधित क्या शक्तियां हैं …

नक्षत्रे देवगण व राक्षसगण या दोन्ही गणांचे गुण अवगुण दर्शक, स्वार्थी, संपत्ती वैभवाची हौस, विषयासक्त, रजोगुणी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा व उत्तराभाद्रपदा ही मनुष्यगणी नक्षत्रे आहेत.

राक्षसगणी नक्षत्रे नक्षत्र गण: राक्षस गण क्या है और इसकी अनुकूलता क्या है? –

: तामसी, स्वार्थी, असत्यप्रिय, लबाड, पापकर्मी, धर्मश्रद्धाहीन, विध्वंस करणे, विश्वासघात करणे, अचाट व अविचारी कृत्ये व चौर्यकर्म. तमोगुणी. कृत्तिका अश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मुळ, धनिष्ठा, शततारका ही राक्षसगणी नक्षत्रे आहेत.

राक्षसगणी नक्षत्रे नक्षत्र गण: राक्षस गण क्या है और इसकी अनुकूलता क्या है? -
Nakshatra

नक्षत्राचे आराध्यवृक्ष

दान व देवता यासंबंधीची माहिती पंचांगातील अवकहडा चक्रात दिलेली असते. नक्षत्र मुख : नक्षत्र मुखाचा फलादेश करताना उपयोग होते. विशेषतः प्रश्नकुंडलीचा फलादेश करताना उपयोग करता येतो.

ऊर्ध्वमुख नक्षत्रे

: वरील स्थाना संबंधित बाबीचा विचार करताना या नक्षत्रांचा विचार होतो. जसे फ्लॅट वरील मजलाचा असेल, वरचा मजला बांधणे, जमिनीच्या वर करावयाचे बांधकाम, घर, भव्यवस्तु, भिंती, तोरणे, बांधणे, राज्याभिषेक, ध्वजारोहण पर्वतारोहण, नोकरी सुरू करणे. इ. बागा

रोहिणी, आर्द्रा, पुष्य, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका व उत्तरा भाद्रपदा. अधोमुख नक्षत्रे : खालील स्थाना संबंधि, खणणे या बाबींचा विचार करताना या नक्षत्रांचा विचार होतो. जसे फ्लॅट तळ मजलाचा असेल, जमिनीच्या खालील बांधकाम, घराचा पाया बांधणे, तळघर, विहीर, बोअरवेल, तलाव संबंधीत कामे, खाण, द्रव्य वा वस्तु पुरणे, पर्वतावरून खाली उतरणे इ.

भरणी, कृत्तिका, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, विशाखा, मूळ, पूर्वाषाढा व पूर्वा भाद्रपदा.

तिर्यकमुख नक्षत्रे

: पशू खरेदी, नांगर, नाव चालविणे. प्रवास, वाहन खरेदी, उतरती बांधकामे, घरावर कौले व पत्रे टाकणे इ. अश्विनी, मृगशीर्ष, पुनर्वसू, हस्त, चित्रा, स्वाती, अनुराधा, ज्येष्ठा व रेवती.

नक्षत्र लोचन

: हरवलेल्या वस्तू, पशू तसेच चोरीस गेलेल्या वस्तु सापडणे न सापडणे, केव्हा वा कोणत्या दिशेला सापडेल या संबंधीत फलादेशासाठी नक्षत्र लोचनाचा विचार केला जातो.

अंधलोचन नक्षत्रे

: अंधलोचन नक्षत्रावर हरवलेली वस्तू थोड्याशा प्रयत्नाने सापडते. वस्तु जवळपास व बहुधा पूर्व दिशेला सापडते. रोहिणी, पुष्प, उत्तराफाल्गुनी, विशाखा, पूर्वाषाढा, धनिष्ठा व रेवती. वस्तु बहुदा

मंदलोचन नक्षत्रे

: मंदलोचन नक्षत्रावर हरवलेली वस्तू थोड्याशा प्रयत्नाने परंतु जरा विलंबाने सापडले. वस्तु बहुधा दक्षिण दिशेला सापडते. अश्विनी, मृगशीर्ष आश्लेषा, हस्त, अनुराधा, उत्तराषाढा व शततारका. मध्यलोचन नक्षत्रे : मध्यलोचन उर्फ चिबट नक्षत्रावर हरवलेली वस्तू फार प्रयत्नाने सापडते.. पश्चिम किंवा दक्षिण दिशेला सापडू शकते. भरणी, आर्द्रा, मघा, चित्रा, ज्येष्ठा व पूर्वाभाद्रपदा. सुलोचन नक्षत्रे : सुलोचन नक्षत्रावर हरवलेली वस्तू कितीही प्रयत्न केले तर सापडत नाही. वस्तु बहुधा उत्तरेला गेलेली असते. कृत्तिका, पुनर्वसु, पूर्वाफाल्गुनी, स्वाती, मूळ, श्रवण व उत्तराभाद्रपदा. नक्षत्र तत्वे :

अग्नी तत्व नक्षत्रे

: चांगली रोग प्रतिकारशक्ती व जीवनशक्ती, महत्त्वाकांक्षी, चांगला आत्मविश्वास, स्वावलंबी, चांगली विचारशक्ती, उत्साही, धडपडी, धर्मपरायण, गतिमान, वादविवादपटू- भरणी, कृत्तिका, पुष्य, मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, स्वाती व पूर्वाभाद्रपदा.

पृथ्वी तत्व नक्षत्रे :

सहनशील, मेहनती, कष्टाळू, प्रसिद्धीची आवड, स्तुतीप्रिय, जागृत स्थिरता, बचावत्मकवृत्ती, संचयवृत्ती, हट्टी दुराग्रही, धीमा, उत्तम प्रकृती. रोहिण, अनुराधा, ज्येष्ठा, उत्तराषाढा, श्रवण व धनिष्ठा.

वायु तत्व नक्षत्रे

: उच्च बुद्धिमत्ता, उत्तम कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती व ग्रहणशक्ती. उत्साही, प्रेमळ, दयाळू, कलाप्रेमी, व्यवहार चतुर, स्वार्थी अश्विनी, मृगशीर्ष, पूनर्वसु, उत्तराफाल्गुनी, हस्त, चित्रा व विशाखा

जल तत्व नक्षत्रे

: हळवा, भावनाप्रधान, उत्तम कल्पनाशक्ती, बुजरा व आळशी. आर्द्रा, आश्लेषा, मूळ, पूर्वाषाढा, शततारका, उत्तराभाद्रपदा व रेवती.

नक्षत्र लिंग :

पुरूष नक्षत्रे : अश्विनी, पुनर्वसु, पुष्य, हस्त, अनुराधा, श्रवण, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा.

स्त्री नक्षत्रे : भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, आश्लेषा, मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, चित्रा, स्वाती, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, धनिष्ठा, रेवती.

नपुसंक नक्षत्रे :

मूळ, मृगशीर्ष, शततारका.

नक्षत्रे तसेच वार संज्ञा : कोणत्या नक्षत्रावर व वारावर कोणते कार्य केले जाते ते पुढीलप्रमाणे. कार्याच्या गुणधर्माशी सुसंगत गुणधर्माच्या नक्षत्राची निवड करावी लागते.

क्षिप्र किंवा लघु नक्षत्रे : विक्री, शास्त्राध्याय, नविन भूषणे धारण करणे, चित्र. नृत्यकला, प्रेमगोष्टी यासाठी ही नक्षत्रे प्रशस्त आहे. अभिजीत नक्षत्र क्षिप्र नक्षत्र आहे. ही शुभ नक्षत्रे आहेत. अश्विनी, पुष्य, हस्त तसेच गुरुवार. उग्र किंवा क्रूर नक्षत्रे घातकर्म, अग्निकर्म, शस्त्र प्रयोग, विष प्रयोग यासाठी ही नक्षत्रे विचारात घेतात. तसेच कुंडलीतील मंगळदोषाचा विचार करता या नक्षत्रात मंगळ असेल तर तो दोषार्य समजला जातो. भरणी, मघा, पूर्वाफाल्गुनी, पूर्वाषाढा व पूर्वाभाद्रपदा तसेच मंगळवार.

मिश्र किंवा साधारण नक्षत्रे

: अग्निहोत्रादिक नित्यविधी व इतर साधारण कार्ये या नक्षत्रावर करतात. कृत्तिका व विशाखा तसेच बुधवार.

धृव किंवा स्थिर नक्षत्रे : घर बांधणे, शांतीकर्म, बी पेरणे, बागकाम, इ कार्ये या नक्षत्रावर करतात. रोहिणी, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाढा व उत्तराभाद्रपदा तसेच रविवार.

मृदु किंवा मैत्र नक्षत्रे : मित्रकार्य, अलंकार, व वस्त्रधारण करणे, क्रिडा, गाय, वादन, कार्यासाठी ही नक्षत्रे

चांगली आहेत. मृगशीर्ष, चित्रा, अनुराधा, व रेवती तसेच शुक्रवार..

तीक्ष्ण किंवा दारूण नक्षत्रे : व्यभिचार, घातकार्ये, भांडणे, पशू हत्या, भयंकर कृत्ये, शिक्षा करणे ही कार्ये या नक्षत्रावर करतात. आर्द्रा, आश्लेषा, मुळ व ज्येष्ठा तसेच शनिवार..

चर नक्षत्रे : वाहन चालविणे, प्रवास करणे, उपवनाची कामे, नवीन वाहन वा मशिनरी चालू करणे, ही शुभ नक्षत्रे आहेत. पुनर्वसु, स्वाती, श्रवण, धनिष्ठा व शततारका तसेच सोमवार.

नक्षत्र पाद : 27 नक्षत्रों के नाम कौन कौन से हैं?

द्विपाद नक्षत्रे : ५ मृगशीर्ष, १४ चित्रा, २३ धनिष्ठा.

त्रिपाद नक्षत्रे : ३ कृत्तिका, ७ पुनर्वसु, १२ उत्तराफाल्गुनी, १६ विशाखा, २१ उत्तराषाढा, २५ पूर्वाभाद्रपदा. चतुष्पाद नक्षत्रे : १ अश्विनी, २ भरणी, ४ रोहिणी, ६ आर्द्रा, ८ पुष्य, ९ आश्लेषा, १० मघा, ११ पूर्वाफाल्गुनी, १३ हस्त, १५ स्वाती, १७ अनुराधा, १८ ज्येष्ठा, १९ मूळ, २० पूर्वाषाढा, २२ श्रवण, २४ शततारका, २६ उत्तराभाद्रपदा, २७ रेवती.

नक्षत्र मराठी माहिती

एका दृष्टिक्षेपात चोरी किंवा हरवलेल्या वस्तूचा शोध

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *