kundali janm kundali

‼️मंत्रात शक्ती असते का ‼️

‼️मंत्रात शक्ती असते का ‼️

मी स्वतः विज्ञानवादी आणि चिकित्सक असल्याने कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय मी विश्वास ठेवत नाही.
आता ब~याच जणांना हा प्रश्न पडतो खरच मंत्रात शक्ती आहे का ?
याचं हे साधं उदाहरण…
कुणी तरी आपल्याला आपल्या समोर बसून शिव्या घालतो, नको नको ते बोलतो. तेंव्हा आपल्यावर परिणाम होतो ?
होय, होतो.
काय होतो ?
तर, आपल्याला राग येतो. चिड येते.
म्हणजेच काय तर समोरच्याने वापरलेल्या शब्दांमुळे आपल्यात निगेटीव्ह एनर्जी तयार होते.
त्याचे परिणाम म्हणून राग आणि चिडचिड बाहेर पडते. म्हणजे त्या शिव्यांमध्ये ताकद आहे.
तसंच…
आपल्यासमोर आपली खूप स्तुती केली , आपल्याला खूप चांगले बोलल्या गेले तर काय होईल ?
आपण प्रसन्न होतो, आनंद वाटतो. एकुणच काय तर *पाॕझिटीव्ह होतो.
पाॕझिटीव्ह उर्जा त्या गोड शब्दांनी वाढते. म्हणजे गोड शब्दात पण ताकद आहे.
तसंच अगदी तसंच या मंत्रातील शब्दात देखील एक ऊर्जा असते.
आणि हे मंत्र खूप आधी ऋषी मुनींनी संशोधनातून तयार केलेत.
आपण त्यांना जरी ऋषी म्हणत असलो तरी, ते तेंव्हाचे संशोधक , SCIENTIST होते, असे म्हणायला हरकत नाही.
तर साधा ‘ओम’ जरी आपण शांतपणे उच्चारला तर डोक्यात स्पंदन , लहरी निर्माण होतात किंवा विशिष्ट व्हायब्रेशन जाणवतात.
म्हणजे आपल्या शरिरातील विशिष्ट ठिकाणी व्हायब्रेशन होऊन लहरी उत्पन्न होतात. आणि निश्चितच त्यातून एक पाॕझिटीव्ह एनर्जी उत्पन्न होते.
ही जादू वगैरे नाही तर आपलीच एनर्जी असते. फक्त ती चार्ज करायची असते.
बस एवढं साधं सरळ सोपं आहे की शब्दात , मंत्रात ताकद असतेच…
ती अनुभवायची असते

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *