Makar Sankranti | मकरसंक्रांती 2023 कशी आहे मकरसंक्रांती या वर्षीची

Makar Sankranti | मकरसंक्रांती 2023 कशी आहे मकरसंक्रांती या वर्षीची

makar sankranta | संक्रांतिपर्वकालात स्त्रियांनी करावयाची दाने :

Makar Sankranti | मकरसंक्रांती 2023 कशी आहे मकरसंक्रांती या वर्षीची
Makar Sankranti | मकरसंक्रांती 2023 कशी आहे मकरसंक्रांती या वर्षीची
WhatsApp Image 2023-01-05 at 10.17.32 AM-min

नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमि, गाय, वस्त्र, घोडा इत्यादि यथाशक्ति दाने करावीत.

संकल्प : देशकाल कथन करून मम आत्मनः सकलपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री सवितृ प्रीतिद्वारा सकलपापक्षयपूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धि धनधान्यसमृद्धि दीर्घायुः महैश्वर्य मंगलाभ्युदय सुखसंपादादि कल्पोक्तफल सिद्धये अस्मिन् मकरसंक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय (अमुक) दानं करिष्ये । असा संकल्प करून दानवस्तूचे व ब्राह्मणांचे पूजन करून दान द्यावे. दक्षिणा द्यावी.

दर वर्षी मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो, त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.

मकर संक्रांति फल

संक्रांतीचा पुण्यकाल – रविवार, 15 जानेवारी 2023 रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. या दिवसाचे कर्तव्य तिलमिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम तिलतर्पण, तिलभक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. शके १९४४ पौष कृ. ७, शनिवार 14 जानेवारी 2023 रोजी रात्री ८:४४ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. बालव करणावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादि प्रकार याप्रमाणे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाई घेतलेली असून पायस भक्षण करीत आहे. सर्प जाति असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वारनांव राक्षसी व नाक्षत्रनांव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त ३० आहेत. दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे व ईशान्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष-गवत तोडणे, गाई-म्हशींची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करु नयेत.

।। अथ जन्मर्क्षवशात्फलम् ||

पंथा:भोग:व्यथावस्त्रंहानी:विपुलं धनं
हस्तविशाखाश्रवणपु.भा.-उ.भा.रोहीणपुनर्वसू – पुष्य
चित्राजेष्ठा-मुळधनिष्ठारेवती-अश्विनीमृगआश्लेषा
स्वातीपु.षा.-उ.षाशतताराभरणी-कृतिकाआर्द्रापूर्वा-उत्तरा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *