Rashi fal 2024 2023 2022

Makar Rashi 2023 | मकर राशी 2023 भविष्य जाणून घ्या.

मकर काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल. पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता, अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. ही माघार तुम्ही खुणेच्या दगडाप्रमाणे लक्षात ठेवा. या कठीण प्रसंगी नातेवाईक देखील तुम्हास मदत करतील. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. आपल्या कुटुंबाच्या गौप्य गोष्टींमुळे आश्चर्यचकित व्हाल. प्रणयराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल – म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवाल. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल परंतु, संद्याकाळीच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्या जवळ वेळ असेल. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल कुणी मित्रांची मदत करून आज तुम्हाला चांगले वाटू शकते.

rashi-removebg-preview

चैत्र:- संमिश्र स्वरुपाचे ग्रहमान राहील. कायदेशीर बाबी सांभाळा. बाकी व्यावसायिक प्राप्ती पौर्णिमेपर्यंत उत्तमच. तरुणांना स्पर्धात्मक यश. नोकरीचा लाभ. उत्तरार्ध घरगुती वादाचा. सूर्यग्रहण अशांततेचेच.

वैशाख :- सप्ताहात आर्थिक ‘जुगार नको. स्वतंत्र व्यावसायिकांचे भाग्योदय. वसुली होईल. पौर्णिमेचे ग्रहण वास्तुविषयक प्रश्नाचे उत्तरार्ध तरुणांना आत्मविश्वास देणारा. ओळखीतून लाभ.

ज्येष्ठः- पूर्वार्ध आर्थिक व्यवहारांतून फसगतीचा. कौटुंबिक वाद. मात्र पौर्णिमेजवळ मोठे व्यावसायिक व्यवहार. वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. उत्तरार्ध वैयक्तिक उत्सवसमारंभातून नेणारा. नोकरीत बढती. अमावास्या ज्वरपीडेची.

आषाढः- पूर्वार्ध भागिदारींतून कटकटींचा. काहींना सरकारी प्रकरणांतून त्रास. पौर्णिमा नोकरीतील गुप्तचिंता घालवेल. आजारावर औषध लागू पडेल. उत्तरार्ध घरात आजारपणाचा. अमावास्या स्त्रीविरोधाची.

अ.श्रावण:- शनिमंगळ प्रतियुतीचा उच्चदाब राहील. पूर्वार्धात कोणताही जुगार टाळा. मध्यस्थीचे व्यवहार टाळा. बाकी पूर्वार्ध शुक्रभ्रमणातून उत्तम विवाहयोगाचा. पौर्णिमा नोकरीत भाग्योदयाची. अमावास्येजवळ वाहनांवर जपा. नि.श्रावणः- रविशनि प्रतियुतीचे फील्ड पौर्णिमेजवळ विशिष्ट वादात ओढू शकते. बाकी बुधशुक्रांची स्थिती व्यावसायिकांना अतिशय तारक आणि भाग्यबीजं पेरणारी. उत्तरार्ध खरेदीविक्रीतून लाभ देणारा. अमावास्या वेदनादायी.

भाद्रपदः- शुक्राचे पाठबळ राहील. घरातील प्रिय व्यक्तींचे भाग्योदय. पौर्णिमा जल्लोषाची. नोकरीत प्रशंसा. उत्तरार्ध कष्टदायक. घरात स्त्रीचिता. बाकी तरुणांना कलागुणांतून यश देणारा. सूर्यग्रहणाजवळ घरात वृद्धांशी वाद.

आश्विन:- व्यावसायिक परिस्थिती ताणतणावाची राहील. चंद्रग्रहणाजवळ संयम बाळगा. चंद्रग्रहण गांभीर्य वाढवू शकते. पुत्रोत्कर्षातून धन्य व्हाल. उत्तरार्ध तरुणांना मुलाखतीतून यशदायी. अमावास्या वाहनभय दर्शवते.

कार्तिक:- शुक्रभ्रमणाची साथ उत्तमच राहील. मात्र तारुण्यातील उन्माद सांभाळा. कुसंगत टाळा. पौर्णिमेजवळ वाहन सांभाळा. बाकी उत्तरार्ध व्यावसायिक मोठे भाग्योदय करणारा. तरुणांना गॉडफादर भेटेल. वास्तुयोग.

मार्गशीर्ष:- पूर्वार्धात व्यावसायिक शुभारंभ होतील. घरातील तरुणवर्गाचे प्रश्न सुटतील. उत्तरार्धातील शुक्रभ्रमण कलाकारांचा आर्थिक उत्कर्ष करेल. अमावास्येजवळ गर्दीच्या ठिकाणी जपा. भांडण टाळा.

पौषः- पूर्वार्ध व्यावसायिक प्राप्ती अबाधित ठेवेल. नव्या व्यावसायिक संबंधातून लाभ | होतील. पौर्णिमा विशिष्ट पतप्रतिष्ठा देणारी. मोठे देवदर्शन घडेल. उत्तरार्ध घरात सुवार्ताचा. अमावास्या शारीरिक वेदनेची.

माघः- राशीचे मंगळशुक्र ग्रहांचा पट ताब्यात घेतील. व्यावसायिक वास्तुखरेदी. पौर्णिमेजवळ मोठी वसुली. सरकारी सहाय्य लाभेल. उत्तरार्धात रविशनि सहयोगातून घरात वाद. अमावास्येजवळ वैद्यकीय खर्च.

फाल्गुनः शुक्रशनि सहयोगातून व्यावसायिक विरोध मावळेल. राजकीय व्यक्तीकडून लाभ. वास्तुविषयक प्रश्न सुटेल. चंद्रग्रहणाजवळ कार्यात अडचणी. उत्तरार्धात देण्याघेण्याच्या व्यवहारातून वाद. सूर्यग्रहणाजवळ वादग्रस्त गाठीभेटी.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *