Mahabharat | महाभारता मधून काय शिकावे?

महाभारत का अधाभूत रहस्य ! Mahabharat
कुरुक्षेत्रावर जेव्हा कौरव पांडवांचे युद्ध सुरू होते तेव्हा खऱ्या अर्थाने सर्वात जेष्ठ आणि युद्धनिपुण अशा कर्णाची खरी ताकत काय आहे ? हे फ़क्त भगवान श्रीकृष्ण यांनाच माहिती होते.अर्जुन व कर्ण युध्दात समोरासमोर ठाकले तर अर्जुनाची हार निश्चित होती.
mahabharat

Mahabharat महाभारतात असे म्हंटले आहे की सुमारे ८०% मनुष्यबळ युद्धाच्या अठराव्या दिवशी मृत्युमुखी पडले होते. जेव्हा युद्ध संपले तेव्हा संजय युद्ध झाले तिथे म्हणजेच कुरुक्षेत्राच्या मैदानात आला. त्याचा मनात शंका आलेली होती की हे युद्ध खरंच झाले आहे का? खरंच एवढा मोठा नरसंहार झालेला आहे का? ती हिच जागा आहे का जिथे सामर्थ्यवान पांडव आणि भगवान श्रीकृष्ण उभे होते? ही तीच जागा आहे का जिथे श्रीमद् भगवत गीता सांगितली गेली? हे सगळे खरंच झाले आहे की मला तसा भ्रम होतोय??

“तुला कधीच ह्याचे सत्य माहित होणार नाही!!”, एक शांत वयोवृद्ध आवाज त्याचा कानी पडला. संजयने आवाज आलेल्या दिशेला पाहिले तर त्याला एक साधू तिथे दिसला. साधू हलक्या आवाजात परत म्हणाला, “मला माहित आहे तू इथे कुरुक्षेत्राचे युद्ध खरंच झाले आहे का ते पाहायला आला आहेस. परंतु तुला ह्या युद्धाबद्दल सत्य कधीच समजणार नाही जोपर्यंत तुला खरे युद्ध कसले होते ते कळणार नाही.”

संजय म्हणाला, “म्हणजे??”

साधू म्हणाला, “महाभारत हे एक महाकाव्य आहे – एक वास्तविकता आहे परंतु त्यापेक्षा अधिक ते एक तत्वज्ञान आहे.” आणि एवढे सांगून तो हसू लागला. साधूचे हसणे पाहून संजय अजून जास्त भ्रमित झाला आणि विनंती करू लागला की, “मला तुम्ही ते तत्त्वज्ञान सांगू शकतात का?”

साधू ते तत्वज्ञान सांगू लागला, पांडव म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपले ५ ज्ञानेंद्रिये आहेत.

  1. डोळे (दृश्य),
  2. कान (आवाज),
  3. नाक (गंध),
  4. जीभ (चव) आणि
  5. त्वचा (स्पर्श).

आणि कौरव म्हणजे १०० दुर्गुण (विषये) आहेत जे दररोज ह्या ५ पांडवांवर आघात करतात. पण आपण ह्या आघातापासून आपल्या ५ पांडवांचे रक्षण करू शकतो. साधू म्हणाला, “संजय, तुला सांगता येईल ह्यांचे रक्षण करणे कधी शक्य होईल?”

“जेव्हा आपल्या रथाचे सारथी – ह्या ५ पांडवांचे मित्र भगवान श्रीकृष्ण असतील तेव्हा????”. साधू उत्तर एकून खूप खुश झाला. तो म्हणाला, “अगदी बरोबर!! श्रीकृष्ण म्हणजे आपल्या आतला आवाज, आपला आत्मा, आपला पथदर्शी प्रकाश. जर श्रीकृष्णचे आपण ऐकतोय तर आपल्याला चिंता करायची काहीही आवश्यकता नाही.”

संजयला बराच मतितार्थ आता कळला होता. तरी त्याने परत प्रश्न केला, “मग जर कौरव हे दुर्गुणच होते तर त्यांच्या बाजूने गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म लढले त्याचा काय अर्थ होतो??”

“त्याचा असा अर्थ होतो की, जसे तुम्ही लहानाचे मोठे होत जातात तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या लोकांबद्दल असलेला तुमचा दृष्टीकोन बदलत जातो. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला ते एकदम परिपूर्ण वाटतात परंतु जेव्हा आपण मोठे होऊन जातो तेव्हा आपल्याला त्यांच्यात त्रुट्या दिसायला सुरु होतात आणि एकदिवशी आपल्याला ठरवावे लागते की आपण ह्या मोठ्यांचे ऐकायचे की नाही, ह्यांनी आपले ठरवायचे की आपण स्वतःच स्वतःसाठी निर्णय घ्यायचा!!! म्हणून अशा धर्मसंकटात श्रीमद् भगवत गीतेचे उपदेश महत्वाचे ठरतात.”

संजयला आता सगळेच कळले होते. त्याने शेवटचा प्रश्न केला, “मग कर्णहा पांडव असून त्यांच्याच विरोधात का??”

“अरे हा!! कर्ण हा, ५ ज्ञानेंद्रियेसारखाच आपला असतो. तो आपलाच एक भाग असतो परंतु साथ देतो त्या १०० दुर्गुणांची!! हा कर्ण दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या स्वतःच्या वासना असतात. हे आपल्याच असतात परंतु त्यांची मैत्री १०० दुर्गुणांशी असते. कर्णाला सारखा पश्चात्ताप होत असतो आणि तो दुर्गुणांची साथ का देतोय त्याचे सतत कारणे देत राहतो. आपली वासनापण अशीच असते – पश्चात्ताप करते आणि परत तिथेच जाते.!!”

संजयच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. त्याला जगातले सगळ्यांत मोठे महाकाव्य “महाभारत” खऱ्या अर्थाने समजलेले असते. तो दूरवर पसरलेल्या कुरुक्षेत्राला पाहत उभा असतो. तो साधूला नमन करण्यासाठी मागे वळतो आणि पाहतो तर त्या जागी कोणीच नसते – तो साधू दिसेनासा होतो परंतु एक गहन तत्वज्ञान तिथे ठेवून जातो. Mahabharat

महाभारत का अधाभूत रहस्य ! Mahabharat

कुरुक्षेत्रावर जेव्हा कौरव पांडवांचे युद्ध सुरू होते तेव्हा खऱ्या अर्थाने सर्वात जेष्ठ आणि युद्धनिपुण अशा कर्णाची खरी ताकत काय आहे ? हे फ़क्त भगवान श्रीकृष्ण यांनाच माहिती होते.अर्जुन व कर्ण युध्दात समोरासमोर ठाकले तर अर्जुनाची हार निश्चित होती.

त्यामुळे एके दिवशी अर्जुनाचे सारथी भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाचा रथ चुकुन कर्णाचे रथाचे समोर नेल्याचा बनाव केला व त्याला घाबरून रणांगण सोडून रथ लांब पळवत नेला. रागाने व त्वेषाने कर्णाने अर्जुनाचे रथाचा पाठलाग सुरू केला. भगवान श्रीकृष्णाने वास्तविक रणभूमीरून रथ पळवत पळवत अशा ठिकाणाहून पुढे नेला कि पाठलाग करत असलेल्या कर्णाचे रथाचे चाक एका खड्ड्यात जाऊन अडकले.

कर्णाच्या रथाचे सारथ्य राजा शल्य नाखुषीने केवळ भगवान श्रीकृष्ण यांनी समजावले म्हणून करीत होता व तो प्रत्येक प्रसंगी कर्णाचा पाणउतारा करीत होता. चाक अडकल्यावर कर्णाने शल्य याला रथाचे चुकलेले चाक काढण्यास सांगितले तेव्हा त्याने अपमानकारक शब्द वापरून साफ नकार दिला. म्हणून कर्ण स्वतः खाली उतरून ते रुतलेले चाक काढू लागला आणि त्याच वेळी कृष्णाने अर्जुनाला बाण चालविण्यास सांगितले. बाकीची कथा तुम्हाला माहितीच आहे.

जरासंध सत्त मथुरेवर हल्ला करत होता, तेव्हा श्री कृष्ण युद्धभूमीतुन पळून गेले होते. नंतर त्यांनी यादवांना व्दारकेला नेले म्हणून त्यांना रणछोड हे उपनाव पडले व त्यानंतर कर्ण-अर्जुन युद्धाच्या कुरुक्षेत्रावरील वरील प्रसंगावरून “रणछोडदास” हे नाव अधिक प्रचलित झाले. (याची देवळे व पूजा ही राजस्थानी व गुजराती या तद्दन व्यापारी मनोवृत्तीच्या लोकांकडूनच जास्त प्रमाणात होते)

दुसरा प्रसंग असा आहे कि, कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या बाणांनी भीष्माचार्य धारातीर्थी पडले होते. संध्याकाळी युद्ध संपल्यावर सर्व जण त्यांच्या भोवती गोळा झाले.

Mahabharat महाभारत का अधाभूत रहस्य ! Mahabharat  कुरुक्षेत्रावर जेव्हा कौरव पांडवांचे युद्ध सुरू होते तेव्हा खऱ्या अर्थाने सर्वात जेष्ठ आणि युद्धनिपुण अशा कर्णाची खरी ताकत काय आहे ? हे फ़क्त भगवान श्रीकृष्ण यांनाच माहिती होते.अर्जुन व कर्ण युध्दात समोरासमोर ठाकले तर अर्जुनाची हार निश्चित होती.
mahabharat

जीवनाचा शेवट जवळ आला म्हणून भीष्माचार्य नीती-अनीती, पाप-पुण्य, सत्य-असत्य इत्यादी गोष्टी सांगू लागले. तेंव्हा द्रौपदी कुत्सितपणे हसली. भीष्माचार्यने वारंवार विचारणा करता ती म्हणाली “भर दरबारात माझे वस्त्रहरण होत असताना तुमचे हे ज्ञान कुठे गेले होते?”. तेंव्हा भीष्माचार्य उत्तरले “बेटा त्या वेळी मी अधर्मी दुर्योधनाचे अन्न खात होतो, अर्जुनाचे बाणांमुळे माझे शरीरातील ते दूषित रक्त वाहून गेले आहे, त्या नैतिकतेतून आज हे बोलण्याचा मला अधिकार प्राप्त झाला आहे व त्या प्राप्त अधिकारातुन मी हा उपदेश करीत आहे, म्हणून कोणाचे अन्न खावे हे माणसाने फार विचारपूर्वक ठरवावे”.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *