kal sarpa dosh कालसर्प योग काय आहे? kalsarpa yog

कालसर्प योग काय आहे? स्पष्ट कालसर्प योगाचे योगावयोग

कालसर्प योग काय आहे?स्पष्ट कालसर्प योगाचे योगावयोग

या जगात जेव्हा कुठलाही प्राणी ज्यावेळी जन्म घेतो ती वेळ त्या प्राण्याच्या सर्व जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची मानल्या जाते. कारण त्या एका क्षणाच्या आधारे ज्योतिष शास्त्राच्या मदतीने त्याच्या संपुर्ण जीवनाचा एक असा आलेख तयार केल्या जाऊ शकतो, ज्यामध्ये त्याच्या जीवनातील वेळो वेळो घडणाऱ्या शुभ व अशुभ घटनांच्या विषयी वेळेच्या आधीच जाणता येऊ शकते.

जन्माच्या वेळेनुसार तयार करण्यात आलेल्या जन्मकुंडलीत बारा भाव / स्थान असतात. जन्मकुंडलीचे हे स्थान नवग्रहांची स्थिती आणि योग जातकाच्या भविष्याबाबत संपूर्ण माहीती प्रकट करते. जन्मकुंडलीच्या

जन्माच्या वेळेनुसार तयार करण्यात आलेल्या जन्मकुंडलीत बारा भाव / स्थान असतात. जन्मकुंडलीचे हे स्थान नवग्रहांची स्थिती आणि योग जातकाच्या भविष्याबाबत संपूर्ण माहीती प्रकट करते. जन्मकुंडलीच्या विभिन्न स्थानात या नवग्रहांच्या स्थिती असणि योगाव्दारे वेगवेगळ्या प्रकारच्या शुभ अशुभ योग तयार होतात. हे योग त्या व्यक्तीच्या जीवनावर आपला शुभ अशुभ प्रभाव

ग्रह जेव्हा जन्मकुंडलीच्या एका स्थानावर एकत्रित होतात. तेव्हा जी परिस्थिती निर्माण होते त्याला . योग. म्हणतात. ज्योतिष शास्त्राला या योगाचे फार महत्त्व मानल्या जाते.

जन्मकुंडली मधे जेव्हा सर्व ग्रह राहु आणि केतुच्या एकाच बाजुला येतात त्या ग्रहस्थितीला कालसर्प योग. म्हणतात. कालसर्प योग हा एक त्रासदायक योग आहे. प्रापंचिक ज्योतिषशास्त्रात या योगाचे विपरित परिणाम दिसतात. प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्रात कालसर्प योग या विषयावर मौन धरल्या गेले आहे. आधुनिक ज्योतिष विव्दानांनी या काळसर्प योग या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला नाही की जातकाच्या जीवनावर याचा काय परिणाम होतो.

सूर्याच्या दोन्ही बाजुस ग्रह असतांना ‘वेली’, ‘नसी’ व ‘उभयचारी योगाची’ निर्मिती होते. चंद्राच्या दोन्ही बाजूस ग्रह असतांना ‘अनफा’, ‘सुनफा’, ‘दुर्धरा’ व ‘केमद्रुम’ योगाची निर्मिती होते. शनि बरोबर चंद्र असतो तर ‘विषयोग’ निर्माण होतो. चंद्राबरोबर जर राहु असेल तर ‘चांडाल योग’ निर्माण होतो. याचप्रमाणे राहु केतुच्या मधे जेव्हा सर्व ग्रह आल्यावर जो योग निर्माण होतो त्या योगाला ‘कालसर्प योग’ म्हणण्याबाबत कुठल्याही प्रकारचा कोणताही आक्षेप नसावा. राहु केतु व्दारा सर्व ग्रह गिळकृत केल्याने जातकावर होणाऱ्या दुष्प्रभावांचा

नकार कसा देता येईल. कालसर्पयोगाची आज चारही बाजूंनी चर्चा ऐकायला मिळते. अनेक विश्वविख्यात ज्योतिषाचार्यांनी सुध्दा हा योग मान्य केला आहे.

महर्षी पराशर आणि वराहमिहीर सारख्या प्राचीन ज्योतिषाचार्यांनी सुध्दा आपल्या शास्त्रात ‘कालसर्प योगाला’ मान्यता दिली असुन त्याचे विस्तृत मणित्थ वर्णन केले आहे. महर्षी भृगु, कल्याण वर्मा, वारदायण, गर्ग, मणित्थ इत्यादी ऋषींनी सुध्दा ‘कालसर्प योग’ सिध्द केला आहे.

स्पष्ट कालसर्प योगाचे योगावयोग

* जन्मकुंडलीच्या पहिल्या व सातव्या स्थानात राहु केतु असला तर. * जन्मकुंडलीच्या दुसऱ्या व सहाव्या स्थानात राहु केतु असला तर. * जन्मकुंडलीच्या चौथ्या व दहाव्या स्थानात राहु केतु असला तर. * जन्मकुंडलीच्या पाचव्या व अकराव्या स्थानात राहु केतु असला तर. * जन्मकुंडलीच्या सहाव्या व बाराव्या स्थानात राहु केतु असला तर. * जन्मकुंडलीच्या नवव्या व तिसऱ्या स्थानात राहु केतु असला तर. कालसर्प योग पूर्ण रूपाने बनतो. जन्मकुंडलीमध्ये १,२,९,११ यापैकी कुठल्याही स्थानात राहु असेल तर स्त्री व संपत्तीचा लाभ प्राप्त करून जातक सुखी राहतो. २,४,५,६,७, १२ पैकी कुठल्याही स्थानात राहु बसला असेल तर ते नुकसानकारक असते. जातकाला सर्व प्रकारचे दुःख सहन करावे लागते. आज जो अरबोपति असेल तो उद्या भिकारी होऊन जातो. दहाव्या स्थानात राहु असला तर शासन करणाराही भिकारी होतो. पंचम स्थानावर राहु असेल तर जातकाला संतान सुख कमीच मिळते.

जर कुंडली मधे संपूर्ण कालसर्प योग असेल तर तो कालसर्प योग पिडीत जातकाला राहुच्या अंतर्दशा किंवा महादशेत वाईट परिणाम भोगावे लागतात. गोचर भ्रमणामध्येही जेव्हा राहु अशुभ असेल तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. शनिच्या ग्रहदशेत सुध्दा कालसर्प योगाच्या जातकाला अति दुःख न कष्ट भोगावे लागतात.

* जन्मकुंडलीमधे लग्न स्थानी राहु किंवा सप्तमस्थानी राहु व केतू असेल व ७, ९, १०, ११, १२ स्थानावर इतर ग्रह असतीलतर तो प्रकाशित कालसर्प योग होतो.

* जन्मकुंडलीत जेव्हा कुठलाही ग्रह समराशित असेल आणि तो नक्षत्र किंवा अंशात्मक दृष्टिने राहुपासून दुर असेल तर तसे कालसर्प योग होतो.. * जन्मकुंडलीत राहुच्या अष्टम स्थानावर शनि स्थित असेल तर तो

* जन्मकुंडली मध्ये सप्तग्रह आणि लग्न स्थानि राहु केतुच्या वक्रगति मधे जर आले तो कालसर्प योग होतो.

* जन्मकुंडलीमध्ये राहु किंवा केतु केंद्रामध्ये किंवा त्रिकोणामध्ये असतील तरी तो कालसर्प योग होतो.

* जन्मकुंडलीमध्ये कालसर्प योग पाहतांना नेपच्युन, हर्षल आणि प्लुटो याचा विचार करू नये.

* जन्मकुंडलीमध्ये राहु आणि केतुच्या दोन्ही बाजूला सूर्य, चंद्र, मंगल,

बुध गुरू, शुक्र व शनि हे सर्व ग्रह असतील तर तो कालसर्प योग होतो. * राहुचे चुंबकीय तत्व दक्षिण दिशेला आहे पण केतुचे मात्र उत्तर दिशेस आहे. राहु-केतुच्या मध्ये लग्न आणि सात ग्रह असले किंवा राहू केतु इतर ग्रहांच्या युतिमध्ये असेल तर तो कालसर्प योग होतो. * जन्मकुंडलीमध्ये ग्रह स्थिती कशाही प्रकारची असली तरी पण जर योगी सर्प आहे तर तो कालसर्प होतो.

* जन्मकुंडलीमध्ये चंद्रपासुन राहु किंवा केतु आठव्या स्थानावर असेल तर तो कालसर्प योग होतो.

* जन्मकुंडलीमध्यं राहु केतु नेहमी उलट भ्रमण करतात राहु व केतुच्या मुखात जेव्हा सर्व ग्रह येतात तेव्हा तो कालसर्प योग होतो. * जन्मकुंडलीमध्ये ६, ८, १२ या स्थानावर कुठल्याही स्थानात राहु असेल तर तो कालसर्प योग होतो.

* जन्मकुंडलीमध्ये राहु केतुच्या मध्ये ६ ग्रह असतील आणि एक ग्रह बाहेरच्या बाजुस असेल आणि तो ग्रह राहुच्या अशा पेक्षा जास्त असेल तो कालसर्प योग भंग होतो.

खालील कुंडलीव्दारे इथे वाचकांना ही माहीती देण्यात येत आहे की कालसर्प योगाचे निर्माण कोण कोणत्या परिस्थितीत प्रगट होते.

वर निर्दशीत ५ ही कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे.

पहिल्या कुंडलीमध्ये ११ व १२ स्थान ग्रहाशिवाय रिकामे आहेत. उर्वरित चारही कुंडलीमध्ये कालसर्प योग पूर्ण स्पष्ट दिसतो आहे.

दुसऱ्या कुंडलीमध्ये कुंभ लग्नाच्या या कुंडलीत लग्न स्थानी राहु व सप्तम स्थानी केतु आहे. सर्व ग्रह राहु व केतुच्यामध्ये स्थित आहेत. एकादश व व्दादश स्थान रिक्त आहे. कुंडलीतील सात संलग्न स्थानामध्ये राहु केतु मधील एक ग्रह असेल आणि अंतस्थानी राहु केतु मधील कुठलाही ग्रह असेल तर तो त्या अंतर्गत पाच स्थानातील कुठलेही स्थान ग्रहविहीन असेल तर तो त्या कुंडली मध्ये कालासर्प योग ठरतो. या विरूध्द एखाद दुसरे स्थान रिक्त असेल व तिथे कुठलाही ग्रह नसेल तर तो खंडीत कालसर्प योग असतो.

तिसऱ्या कुंडलीमध्ये धनु लग्न कुंडलीमध्ये धन स्थानावर राहु स्थित आहे. भाग्यस्थानी शनिची दृष्टि आहे. आपल्या वयाच्या ४२ व्या वर्षात अशा जातकाला कालसर्प योगामुळे आपली जमिन व संपत्ती गमवावी लागते.

चौथ्या कुंडलीमध्ये सिंह लग्नाची कुंडली आहे. इथे व्यय स्थानी कर्क राशीचे मंगल केतु बरोबर आहे. पंचमेश गुरू अष्टम स्थानी स्थित आहे. व्ययेश चंद्रदशम स्थानी आहे. संपत्ती मिळाली पण ती जुगार व सट्टा खेळुन गमावली. आपल्याला कमीने धन मिळवल्या नंतरही धनाचा नाश होतो. धनेश बुध सप्रभात सूर्याच्या बरोबर आहे. आणि त्यावर मंगळाची दृष्टी आहे. संपुर्ण कालसर्प योगाचे ही दशा केली आहे.

पाचव्या कुंडलीमध्ये मेष लग्न कुंडलीत लाखो रूपये जुगार व सट्टा यात नुकसान करणारा कालसर्प योग आहे. लग्न स्थानी मेष राशीचा चंद्र, धनस्थानात मंगल, तृतीय स्थानात शनि सूर्याची युति आणि सर्व ग्रह राहु केतुच्या मध्ये फसलेले आहेत.

वराहमिहीर यांनी आपली संहिता ‘जातकनभ संयोग’ यामधे सर्पयोगाचे वर्णन केले आहे. कित्येक नाडी ग्रंथांनीही ‘कालसर्प योगाचे’ समर्थन केले आहे. जैन ज्योतिषमधे ‘कालसर्प योगाचा’ उल्लेख येतो. त्यांच्या अनुसार सुर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या वेळेस जी स्थिती निर्माण होते तिच स्थिती ‘कालसर्प योग’ मुळे जातकाच्या जन्मागांमधे होते. ‘कालसर्प योगास’ सर्वसाधारण रूपामधे कुणीही चांगले मानलेले नाही. ‘कालसर्प योग’ दोषी जातक दुसऱ्यांसाठी जगतात. स्वत:साठी त्यांना कुठलेही सुख उपभोग प्राप्त होत नाही.

‘स्वान्तः सुखाय’ जगण्यासाठी आपले जीवन आहे. असे मानणाऱ्यांना ‘कालसर्प योग’ त्रासदायक सिध्द होत नाही. पण महाप्रयासाने मिळालेल्या या जन्माला कोण दुसऱ्यांसाठी जगण्यात आपल्या जीवनाची सार्थकता मानेल असे असते तर आज अरबो रूपयांचे घोटाळे झाले नसते.

राहु आणि केतुच्या पौराणिक कथा आहेत त्यांचे अध्ययन केल्या गेले पाहीजे. पाश्चात्त्य ज्योतिषांनीही राहु-केतुला ‘कार्मिक’ मानले आहे. व्यक्तीच्या जीवनावर होणाऱ्या त्याच्या परिणामाला मानले आहे. कार्मिक व्यक्तीच्या जीवनावर होणाऱ्या त्याच्या परिणामाला मानले आहे. ‘कार्मिक ज्योतिषामधे’ ‘राहु’ ‘पृथ्वीवर’ काळ आहे व ‘केतु’ सर्प यांच्याव्दारे आपल्याला आपल्या मागील कर्माचे फळ भोगावे लागते. ‘राहु’ सर्पांचा प्रतिनिधी आहे. ही गोष्ट ज्योतिषशास्त्र, साहित्यात राहुच्या प्रभावाबाबत सांगण्यात आली आहे.

राहुच्या प्रभावाने पिडीत जातक सर्पाला घाबरतात. त्यांना स्वप्नातही सर्प दिसतात. सर्प कोण आहे. ज्योतिषशास्त्रात व अध्यात्मशास्त्रात सर्पाला केतुचे प्रतिक मानल्या गेले आहे. यावरून हिंदु ज्योतिषशास्त्रात ‘कालसर्प योग’ समजल्या जाऊ शकतो. कामरत्नाच्या १४ व्या अध्यायाच्या ४९ व्या श्लोकात ‘राहुला’ काळ मानण्यात आले आहे. ५० व्या श्लोकात म्हटले आहे ‘काळ म्हणजे मृत्यू’. मानसागरीच्या चौथ्या अध्यायाच्या १० व्या श्लोकात म्हटल आहे की ‘शनि’,‘सुर्य’ आणि ‘राहु’ जन्मांगामध्ये लग्नात सातव्या स्थानावर असेल तर सर्वदंश होतो. आपल्या प्राचीन धार्मिक ग्रंथात राहुची अधिदेवता ‘काळ’ व प्रत्याधि देवता ‘सर्प’ आहे. कोणत्याही ग्रहाची पूजा करतांना त्याच्या अधिदेवता व प्रत्याधि देवतेचे करणे आवश्यक असते. यामुळेच ‘राहु शाति’ला ‘कालसर्प शांति’ मधे अनिवार्य मानल्या गेले आहे. ‘कालसर्प शांति’ जन्मशांति

आहे. त्याला अस्विकार केल्या जाऊ शकत नाही.

काळसर्प योग – प्रकार व त्यांचे परिणाम

काळसर्प योगाच्या उल्लेख स्पष्ट रूपाने ज्योतिषाच्या प्राचीन मूळ ग्रंथामध्ये पाहण्यात येत नाही. कदाचित याच कारणाने आज काळसर्प येणाचे नाव आणि त्याचे निर्माण या बाबत अनेक प्रकारच्या दंतकथा पुढे येतात. काही ज्योर्तिविद काळसर्प योगाच्या त्या भावाला अनुसरुन सांगतात. ज्या भावात (लग्न) राहु स्थित असेल काही विव्दान या त्याच्या भावापासुनच आरंभ मानतात. ज्या भावामध्ये राहु-केतु च्या अतिरिक्त अन्य अन्य ग्रहस्थित असतिल. काळसर्प योगाचे मुख्य कारण राहु-केतु आहेत. राहुच्या विभिन्न भावात (लग्न) असल्याने वेगवेगळ्या प्रकारचे काळसर्प योग होतात.

राशिचक्रांमधे १२ राशि असतात आणि लग्न सारिणी मधे १२ लग्न (भाव) असतात. जे क्रमश: धनु (लाभ), धन संपत्ती, भाऊ पराक्रम, आईचे सुख, शिक्षा, कर्म पिता, लाभ तथा मृत्यू व्यय भाव मानल्या जातात समजा कुणाचे लग्न मेष आहे व मेषमधे राहु स्थित आहे आणि सप्तम भावात तुला राशिमधे केतु स्थित आहे आणि तर या प्रकारची ग्रहयोग रचना तयार झाली की काळसर्प योग होतो. याच प्रकारे दुसरा भाव (वृष लग्न) मधे राहु व अष्टम भावात (वृश्चिक लग्न) मधे राहु केतु असला तरी तो काळसर्प योगच होणार. याचप्रकारे तिसरे, नववे, चौथे दहावे, पाचवे व अकरावे, सहावे बारावे, सातवे प्रथम, आठवे दुसरे, नववे तिसरे, दहावे चौथे, अकरावे पाचवे, बारावे सहावे या प्रमाणे १२ काळसर्प योग झाले १२ राशिंना वेगवेगळे मानुन पाहले तर १२ × १२ = १४४ प्रकारचे काळसर्प योग होतात.

या प्रकारचे याच्या विपरित क्रमांत मेष लग्नात (प्रथम भाव) केतु आणि सप्तम भावात तुला राशिमधे राहु असेल तर योग काळसर्प योग होईल. याचप्रमाणे मेष लग्नाने दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे, सहावे, सातवे, आठवे, नववे, दहावे, अकरावे,बारावे भावात केतुच्या लग्नस्थ असल्या कारणाने १२ प्रकारचे काळसर्प योग होतात. केतु-राहुच्या मधे सर्व ग्रह आल्या कारणाने १२ × १२ = १४४

प्रकारचे काळसर्प योग होतात. या प्रकारे १४४ + १४४ = २८८ काळसर्प योग जन्मकुंडलीमधे राहुकेतुची भावगत स्थिती, युति, विभिन्न ग्रहाच्या युग्मादि अनुसार शेकडो प्रकारचे काळसर्प योग होतात भावाच्या अनुसार यांचे नामकरण करण्यात आले आहे. मुख्य रूपाने १२ प्रकारचे काळसर्प योग

असतात.

१) अनंत काळसर्प योग ३) वासुकि काळसर्प योग ५) पद्म काळसर्प योग ७) तक्षंक काळसर्प योग ९) शंखचूड काळसर्प योग ११) विषाक्त काळसर्प योग

२) कुलिक काळसर्प योग ४) शंखपाल काळसर्प योग ६) महापद्म काळसर्प योग ८) कर्कोटक काळसर्प योग १०) पातक काळसर्प योग १२) शेषनाग काळसर्प योग गोचर मधे ग्रहाच्यां स्थितीमधे नेहमी बदल होत राहतो. एकच भाव व एकच राशिपासून तयार होणाऱ्या काळसर्प योगाच्या प्रभावामधे विभिन्नता पहायला मिळते. याचे मुख्य कारण ग्रहांचे गोचर आहे. कोणकोणते ग्रह राहुमुळे प्रभावित होत आहेत किंवा त्यांना प्रभावित करत आहे. यामुळेच काळसर्प योगाच्या प्रभावामधे अंतर निर्माण होते. याच कारणाने एकाच नावाच्या काळसर्प योगाने वेगवेगळ्या जातकांवर वेगवेगळा प्रभाव पहायला मिळतो.

जर कुठल्याही प्रकारचा काळसर्प योग राहु पासुनच आरंभ होत आहे. तर तो जास्त घातक सिध्द होतो, पण केतुपासून राहुपर्यंत होणारा काळप योग एकदा घातक होत नाही. या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की काळसर्प योग पुत्र व अपत्यांसाठी तेव्हाच मुख्यलयाने लायक असतो जेव्हा तो पंचमात राहु पासुन होतो जन्मकुंडलीमधे जेव्हा सर्व ग्रह राहु-केतुच्या मध संपुर्ण रूपाने कैद होउन जातात तेव्हा पूर्ण रूपाने काळसर्प योग होतो. या स्थितीमधे राहु ज्या स्थानावर विद्यमान असेल त्या भावाचे सुख जातकाला प्राप्त होणार नाहीत. म्हणजे जातका त्या सुखांपासुन वंचित राहील..

राहु-केतुच्या पकडीतुन एखादा ग्रह जरी बाहेर आला तर तो आंशिक काळसर्प योग होतो. आंशिक काळसर्प योगाचे दुष्परिणाम कमी होतात पण

होतातच.

या.

इथे आता सर्व प्रकारच्या १२ प्रमुख काळसर्प योगाचे विश्लेषण करू

जेव्हा लग्नामध्ये राहु व सप्तम भावामधे केतु असेल आणि त्याच्यामधे सर्व अन्य ग्रह यांच्यामधे असतील तर तो अनंत काळसर्प योग या अनंत काळसर्प योगाच्या जातकाला जीवनभर मानसिक शांतता मिळत नाही तो सदैव अशांत, क्षुब्ध, गोंधळलेला, अस्थिर राहतो. बुध्दीहीन होऊन जातो. मस्तीष्क संबंधी रोग त्रास देतात.

* कोर्ट, कचेरी, केस यामुळे जातकाला अति आर्थिक नुकसान उचलावे लागते.

* आपला मान, पद प्रतिष्ठेसाठी त्याला निरंतर संघर्ष करावा लागतो. * भूत, प्रेत, जादुटोना, टोटके यांचा अशा व्यक्तीवर लवकर प्रभाव पडतो व तो वारंवार आजारी पडत राहतो.

* वैवाहीक जीवन मोठे कष्ट देणारे असते. असंतोषजनक असते. अशा जातकांचा विवाह बेजोड व वांछित नसतो.

* असा जातक दुष्ट बुध्दी, कपटी, असत्य बोलणारा, प्रपंची, खोटा व लंपट असतो. तो नेहमी षडयंत्रात फसुन नुकसान व हानि सहन करतो. * भयंकर कठिनाईत जीवन जगतो आणि एका नंतर एक संकटांचा सामना करतो.

* असा जातकाची धर्म व ईश्वरावरची श्रध्दा व विश्वास कमी होतो व तो नास्तिक होतो.

* भाऊ, बहिण व नातेवाईकांकडुन, मित्रांतर्फे धोका मिळतो.

उपायांच्या रूपात ॐ नमः शिवाय. चा जास्तीत जास्त जप करायला

हवा. भगवान शिवाचा रूद्राभिषेक करावा व रोज १०८ वेळा महामृत्युजय मंत्राचा जप करावा त्याने यथोचित लाभ होईल.

पुजा घरात

नागपंचतीचे व्रत ठेवावे व सिध्द काळसर्प योग शांती यंत्र स्थापन करावी आणि विधिवत त्याची पूजा केल्याने बराच लाभ मिळतो.

जेव्हा जन्मकुंडलीच्या व्दितीय भावात राहु व अष्टम भावात केतु असेल व सर्व त्यांच्या मधे असतील तर तो योग कुलिक काळसर्प योग म्हणतात. * असा जातक नेहमी कुठल्या तरी रोगाने ग्रस्त असतो. त्याला मुख व गुदा या संबंधी रोग असतात. त्याच्या गळ्याच्या वरचा भाग दोषपूर्ण असतो.

* असा जातक मानसिक रूपाने सतत तणाव ग्रस्त असतो. डोक्यात राग असतो. निरंतर परेशानी मुळे जातक चिडचिड्या स्वभावाचा होऊन

जातो.

* वैवाहिक संबंध तुटतात.

* पारिवारिक कलहाने घराचे वातावरण नेहमी अशांत राहते. * पिता व कुटुंबाचे सुख नगण्य असते मित्रांकडून धोका होतो. * आर्थिक स्थिती ठिक नसते. पैसा जवळ राहत नाही. जास्त परिश्रम करूनही उचित लाभ मिळत नाही. जातक धनवान असला तरी कंगाल

होतो. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त असतो.

* अपयश, आलोचना, उपेक्षा यांनी ग्रस्त असतो शिक्षण अर्धवट राहते. * कोर्ट-कचेरी, आजारपण यामुळे त्या खर्चाने जातक अडचणीत

* पत्नी अज्ञानी, मूर्ख, कामूक, अल्पज्ञ व अविश्वासी असते. जातकाचे अपत्यही कुबुध्दी व उदंड असतात. अपत्य सुख मिळत नाही.

उपायाच्या रूपात, लग्न संबंधीत रत्न धारण करावे. भगवान श्रीकृष्णाची पुजा आराधना करावी. घरात मोरपंख लावावे व त्याला आपल्या अंगावरून रोज एकवेळ तरी फिरवावे.

सिध्द काळसर्प योग शांति यंत्र घरात स्थापन करावे. श्रावण महीन्यात काळसर्प शांति करावी. नागाच्या आकृतिची चांदीची अंगठीकरून घालावी.. ३) वासुकि काळसर्प योग

जन्मकुंडलीच्या तिसऱ्या भावात राहु आणि नवव्या भावात केतु असेल व त्यांच्या मधे इतर सर्व ग्रह असतील तर तो योग वासुकि काळसर्प योग.

म्हणतात.

* जातकाला नेहमी आपल्या पारिवारिक सदस्य व लहान भावा बहिणीकडुन अनेक कष्ट व तणाव सहन करावे लागतात.

* मित्र आणिा संबंधीत लोकांकडून धोका मिळाल्यामुळे जातक धैर्य व पराक्रम सोडून निराश जीवन जगायला लागतो.

* नौकरी आणि कामधंद्यात अनेक प्रकारचे कष्ट सहन करावे लागतात. धन जरी मिळवले तरी अपयश मिळते.

* जातकाची धर्म-कर्म, पूजा-पाठ यात आवड नसते. * विदेश प्रवासात जातकाला अनेक कष्ट झेलावे लागतात. * भाग्योदय अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *