कालसर्प योग काय आहे? kalsarpa yog

Janm kundli madhe kahi janma kalin yog

जन्म कुंडली मधे कोणते योग आहेत आणि त्याचा परिणाम?

केमद्रुम योग

चन्द्रापासून दुसर्‍या व बाराव्या स्थानांत रवि, राहु,, केतुच्या अलावा कुठलाही ग्रह नसल्यामुळे केमद्रुम योग बनत असतो (बृहप्ताराशर होराशास्त्रम् 38/11)

केमद्रुम योग एक प्रमुख दरिद्र प्रधान योग मानला जातो. त्यामुळे केमद्रुम योगात जन्मलेला जातक जन्मापासूनच विद्येत कमी असणारा, असल्यामुळे विवाह, अन्न वस्त्र, घर व मित्र सुखांची कमी असणारा असतो. विविध दु:खानी, संकटानी, रोगराईनी त्रासलेला, दीनता व मेहनतीचे जीवन जगणारा, दुष्ट प्रकृतीचा व जनविरोधी व्यवहार करणारा आद्य फळांनी युक्त असणारा असा संभवतो. पैसा अडका विरहित, मानसिक व आर्थिक रूपाने अस्थिर, असणारा, स्वतंत्र धंद्यात एकदा भांडवल डुबल्यांची भिती बाळगणारा, कंजूस आणि कर्जबाजारी आणि कुंडलीच्या शुभ योगाचे फळ प्राप्ती मध्ये अडचणी भासणारा असा असतो.

केमद्रुम भंग योग

चन्द्रापासून दुसर्‍या व बाराव्या स्थानांत रवि, राहु,, केतुच्या अलावा कोणी दुसरा ग्रह नसल्यामुळे ”केमद्रुम” योग बनत असतो परंतु चन्द्रापासून केन्द्रात ग्रह असल्यामुळे केमद्रुम योग भंग होतो (जातक पारिजात 7/80)

केमद्रुम योग एक प्रमुख दरिद्र प्रधान योग मानला जातो. हा योग केमद्रुम योगाच्या अशुभ फळाचा नाश करतो आणि जीवनाच्या उत्तरार्धात सुखाची प्राप्ती होते.

अधम योग

सूर्यापासून केन्द्रात चन्द्र आल्यामुळे अधम योग बनत असतो (फलदीपिका 6/14,18)

अधम योगात जन्म झाल्यामुळे ज्ञान, बुद्धी विद्या, निपुणता, उदारता, स्वारी, यश, धनसंपदा आणि सुख योग इत्यादिचे फारच कमी फळ प्राप्त होते.

वोशि योग

सूर्यापासून बाराव्या स्थानांत चन्द्राशिवाय दुसरा कोणी ग्रह आल्यावर वोशि योग बनत असतो.

वोशि योगात जन्म झालेली व्यक्ति लठ्ठ शरीराची तिरळी, गोड बोलणारी, उत्तम स्मरणशक्तीची विद्वान, सात्विक, कुशल, दानवीर, बलशाली, उद्योगी, कीर्तिवान, राजाच्या सम फळ असणारी अशी संभवते.

अवयोग

लग्नेश दु:स्थानात आल्यावर अवयोग बनत असतो.

अवयोगात जन्म झाल्यावर प्रकृतीची व आयुष्याची चिंता वाटत राहते सन्मान व प्रसिद्धी प्राप्तीत संदेह वाटतो स्थिती बदलत राहते. लग्नेशच्या दशेमुळे स्थिती अत्यंत चंचळ होते दुर्जनांची साथ व चरित्रांची कमतरता इत्यादि फळे संभवतात.

राजयोग (केन्द्र त्रिकोण)

पंचमेशचा सप्तमेश किंवा दशमेशबरोबर परस्पर संबंध आल्यावर राजयोग बनत असतो.

केन्द्र त्रिकोण राज योगात जन्म झालेली व्यक्ति राजसी स्वभावाची, सन्मान व सर्व प्रकारचे वैभवाचे सुख प्राप्त करणारी असते. राजयोगाचा आधुनिक संदर्भात अर्थ आहे – सफलता, सन्मान आणि प्रतिष्ठेत वृद्धि.

धन योग

दुसर्‍या भावाच्या स्वामीचा संबंध पाचव्या नवव्या किंवा अकराव्या भावाच्या स्वामिशी येत असेल तर धन योग बनत असतो (भारतीय ज्योतिष्य)

या योगात जन्म झालेली व्यक्ति धनवान होण्याची संभावना असते.

ब्रह्म योग

नवमेशापासून गुरू केन्द्रात व शुक्र एकादशेशा पासून केन्द्रात आणि बुध लग्नेश किंवा दशमेशाबरोबर केन्द्रात असल्यावर ब्रह्म योग बनत असतो (मूळ संदर्भ अज्ञात)

ब्रह्म योगात जन्म झाल्यामुळे व्यक्तिला उत्तम प्रकारच्या जेवणाचा (शाही भोजनाचा) भोगविलासाच्या वस्तुंचा शौक असतो. सन्मान ज्ञानी, आणि आध्यात्मिक जाणकार व सुशिक्षित नैतिकवादी, दानवीर व दीघार्यु बनण्याची संभावना असते.

Kundali1 1547094032

जन्म कुंडली

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *