जनन शांती म्हणजे काय? याचे परिणाम काय? कोणता उपाय करावा?

जनन शांती का करावी?
तर जनन शांती ही आपल्या जन्माच्या वेळी अशुभ काळ असेल किंवा शुभ वेळ नसेल त्या तिथी , नक्षत्र किंवा करण किंवा योग त्या अशुभ तिथी योग,. करण, नक्षत्र या वरती जन्म झालेला आहे. या अशुभ काळामध्ये जन्मलेल्या बाळाला भविष्यामध्ये अनेक संकटे, गंडांत, प्रॉब्लेम्स येत असतात तर हे प्रॉब्लेम्स किंवा संकटे, गंडांत येऊ नये, यासाठी आपण काय करावे तर याचा परिहार म्हणून जनन शांती केली जाते.
जननशांती का करावी?
तर जनन शांती म्हणजेच अशुभ वेळेमध्ये जन्म झालेल्या बालकाला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत आणि त्याचे भविष्य सुख समृद्धी चे असो यासाठी ही जनं शांती केली जाते.
जनन शांती केव्हा करावी?
जनं शांती ही सव्वा महिना किंवा त्यापेक्षा अधिक महिने झाल्यानंतर ही जनन शांती करावी. जनं शांती केव्हाही करता येते? का तर आपल्याला जीवनामध्ये अनेक संकटे येत असतात तर त्या संकटांचे आपण आधीच परिहार केला तर ती संकटे आपल्यापासून दूर जातील किंवा ती संकटे कमी होतील त्यामुळे आपण आधीच त्याचा परिहार करावा. म्हणून जनन शांती ही लहानपणी केल्या जाते. जर तुम्ही लहानपणी जननशांती केली नसेल तर ती आपल्याला करता येते.
आपण अशुभ वेळेला जन्मलेलो आहोत का? हे कशाप्रकारे पहावे.
हे पाहत असताना आपल्या जन्म वेळ दिनांक आणि जन्माचे स्थान या गोष्टींचे आपल्याला गरज पडते यावरून आपण आपली जन्म तिथि नक्षत्र वार योग आणि करण याची माहिती आपल्याला जन्म दिनांक वरून मिळते आणि जन्म वेळ यावरून आपल्याला नक्षत्राचे चरण म्हणजेच आपले जन्म नाव कळते. यावरून आपण नक्कीच माहीत करून घेऊ शकतो की आपली तिथी नक्षत्र योग आणि करण हे कोणते आहे ते जर खालील प्रमाणे असेल तर आपण जनन शांती करून घ्यावी म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक संकटांना आपण दूर करून व त्यांना कमी करूत.
जननशांतीची तिथी, नक्षत्र, योग.
तिथी कृष्ण चतुर्दशी, अमावस्या, शर्यतीची नक्षत्रे अश्विनी ची पहिली 48 मिनिटे, पुष्य नक्षत्राचे दुसरे व तिसरे चरण आश्लेषा नक्षत्राचे पूर्ण चरण मघा नक्षत्राचे प्रथम चरण उत्तराचा प्रथम चरण, चित्रा नक्षत्र पूर्ण विशाखाचे चौथे चरण जेष्ठ नक्षत्र पूर्ण मूळ नक्षत्र पूर्ण, पूर्वाषाढा नक्षत्राचे तिसरे चरण रेवती नक्षत्राचे शेवटचे 48 मिनिटे
योग वैधृती, योग, व्यतिपात किंवा विष्टी करण त्यानंतर ग्रहण पर्वकाळ, यमल म्हणजे जुळे, अधोमुख जन्म, माता, पिता, भाऊ, बहिण, यांच्यापैकी एकाचीही नक्षत्र जन्मलेल्या बाळाशी जुळत असेल, तीन मुली नंतर मुलगा, किंवा तीन मुलानंतर मुलगी, तसेच सूर्य संक्रमण पुण्यकाल, दग्ध, यमघंट, मृत्यू योग. यापैकी कारण असेल तर जनन शांती करावी.





शनि व साडेसाती 2025 तुमच्या राशी वरती होणारा प्रभाव ?







