शिव पार्वतिचा विवाह | राम नावाच सत्य | ओमकार शब्दाचा अर्थ
शिव पार्वतिचा विवाह | राम नाव कसे आले. | ओमकार
सध्या सोशल मीडियावर जो बकवास चालू आहे त्यावरून खरेच लोकांची कीव करावीशी वाटते , लोक काहीही शंका निर्माण करत आहेत , जसे राम नॉन व्हेज खात होता ,दुसरा प्रश्न प्रत्येक ठिकाणी गणेशाला वंदन करून कार्याची सुरुवात करतात मग शिव पार्वतीचा विवाह प्रसंगी गणेश पूजन झाले का ?
तिसरा प्रश्न राम नाम सत्य आहे हे रामाच्या जन्माआधी तिर्डीच्या मागे काय बोलतं होते.तर जाणून घेऊ या प्रश्नाची उत्तरे..
ज्या वेळेस पृथ्वी वर काहीही नव्हते अंधकार होता तेव्हा अधिष्टती देवी होती जीचे या अंधकार जगावर वर्चस्व होते. तिच्या ध्वनी मुळे नाद ची उत्पत्ती झाली त्यातून ओम् स्वर निर्माण झाले त्यातून उकार उत्पन्न झाले आणि त्यातून ओमकार स्वर निर्माण झाले . नाद आणि ध्वनितून ओकाराची उत्पत्ती झाली. ओमकार सहा अक्षरांचे शब्द होते त्यातून प्रचंड अशी ऊर्जा निर्माण झाली..
ओ+ऊ+म+उ,+का+र..
उकार वरून र+आ=रा अक्षर घेतले गेले.आणि ओम् मधून म अक्षर घेतले गेले ज्यातून राम निर्माण झाले.त्यानंतर महाकाली देवीने शिव ऊर्जा निर्माण केली त्यातून डाव्या अंगवरून ब्रम्हाची उत्पत्ती झाली आणि उजव्या अंगातून नारायण निर्माण झाले.त्याशिवाय आणखी एक ऊर्जा निर्माण झाली त्याचे नाव होते श्री गणेश. गणेशाची दोन रूपे आहेत हे फार कमी लोकांना माहीत आहे.
गणेशाचे पहिले स्वरूप आदी गणेश ज्यातून प्रत्येक घरात मातीचा गणेश आकार करून त्याची पूजा केली जाई. आणि दुसरे स्वरूप रक्षक गणेश जीची पार्वती देवीने तपस्या करून स्वसंरक्षणार्थ उत्पत्ती केली जो दरवाजा समोर उभा राहून आईचे रक्षण करतं होता. ज्याला आपण लंबोदर म्हणून पूजन करतो.आणि तोच रक्षक गणेश.
शंकर पार्वतीने विवाह प्रसंगी ज्याची पूजा केली तो होता आदी गणेश.आणि आजही तो कार्यारंभी आदी गणेश म्हणून पुजला जातो.
हे उत्तर त्या लोकांसाठी आहे जे म्हणतात शिव पार्वती विवाह प्रसंगी गणेश पूजन कसे केले गेले.
दुसरी गोष्ट राम नाम सत्य आहे त्याची .महाकाली देवीने शंकरास सांगितले की सृष्टीची रचना करण्यासाठी तुला माझ्याशी विवाह करावा लागेल.तेव्हा शंकर म्हणले तू मला उत्पन्न केले मग तुझ्याशी विवाह मी कसा करू.नकारात्मक उत्तर आल्यावर देवी अत्यंत क्रोधित झाली आणि तिने शिव आणि ब्रम्हाला खाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आदी गणेशने युक्ती सांगितली की आपण नाद आणि ध्वनितून निर्माण झालेल्या रामाची भक्ती करावी. त्यातून देवीचा कोप शांत होईल तेव्हा ब्रम्हा विष्णू महेश यानी राम नामाचा जप सुरू केला तेव्हा देवी शांत झाली.यावरून सिद्ध होते रामाच्या जन्मा आधीच राम नामाचा जप सुरू झाला जो अप्रत्यक्ष असा होता.
नारायनाला सृष्टी निर्माण करण्यासाठी मनुष्य अवतार घेणे गरजेचे होते ती ऊर्जा निर्माण होण्यासाठी राम नामाचा जप सुरू झाला आणि त्यातूनच त्रेता युगाचा प्रारंभ झाला आणि रामाचा जन्म झाला या गोष्टीतून एक सत्य बाहेर येते की ब्रम्हा , विष्णू ,महेश यांनी सृष्टीचा हा पसारा चालू राहण्यासाठी शिव पार्वती ,आदी गणेश यांची आराधना करून जीवाची निर्मिती केली व विष्णूंना सर्व अवतारात जन्म घेण्यास सांगितले त्यातून त्रेता युगात राम आणि द्वारपाल युगात कृष्णाचा जन्म झाला त्यानंतर कृष्णाने आपल्या द्वारपाल युगाच्या शेवटी निमित्त होऊन देह त्याग केला आणि एक सजीव निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला विनंती केली त्यातून मत्स्य अवतारात विष्णूने माशाचे रूप घेऊन सजीव निर्माण केला आणि पुढें उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर मनुष्य निर्माण झाला याचा अर्थ पृथ्वीचा उत्पत्ती आणि लयाच्या वेळेस म्हणजेच कलयुगात शेवटच्या टप्प्यात अधर्माचा नाश करण्यासाठी विष्णू आपल्या शेवटच्या कल्की अवतारात जन्म घेतील.
त्रेता युगात स्वसंरक्षणार्थ रामाने हिंस्त्र श्वापदे यांची शिकार केली ती फक्त वस्त्र आणि बसण्यासाठी होती तिचे प्राशन नव्हते. तुलसीदास यांच्या रामायणाचा संदर्भ बघितल्यास त्यात मंशा या नावाचा उल्लेख आहे त्याचा अर्थ मांसाहार असा लावला गेला .जर तुम्ही सुंदर कांड किंवा रामचरित मानस वाचले असेल तर पुढील श्लोक नक्की आठवेल..
चतुर्दश हि वर्षाणि वत्स्यामि विजने वने।
मधु मूल फलैः जीवन् हित्वा मुनिवद् आमिषम् ||
याचा अर्थ रामाने कुठल्याही परिस्थितीत मांसाहार भक्षण होणार नाही ही प्रतिज्ञा घेतली होती. चौदा वर्षे.फक्त कंदमुळे आणि फलाहार याचे सेवन होईल आणि मांसाहार सेवन होणार नाही असे त्यातून सूचित होते..
लोक अर्धवट माहितीतून चुकीचे पसरवतात..आणि त्यामुळे हिंदू धर्माची बदनामी होते.असे प्रकार थांबवले गेले पाहिजे अर्धवट ज्ञानावर कुणी काहीही उठवले तर त्यावर सडेतोड उत्तर दिले पाहिजे , सुंदरकांड ,रामचरीत मानस ह्या गोष्टी न वाचता लोक काहीही उठवतात…