Gudi Padva 2021
गुढी पाडव्याच्या वेगवेगळ्या पौराणिक कथा आहे.
गुढीपाडव्याची पौराणिक माहिती समजून घेण्याअगोदर शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी या मुहूर्ताचे अनन्य साधारण आणि पुजा कशी करावी याचे महत्व सांगितले आहे.
गुढी पाडव्याचं अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केलं जाते. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावे. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजविलं जातं. यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते.
संत एकनाथांनी त्यांच्या धार्मिक काव्यात गुढी हा शब्द असंख्य वेळा वापरला आहे. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभारी गुडी, ज्ञातेपणाची, भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची , भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात. यावरून कळते की आपल्यापरंपरेत आणि संस्कृतीत गुढीचे महत्व अलौकीक आहे.
भगवान श्रीकृष्ण यांनी पण याबद्दल वर्णन केले आहे, भगवान म्हणतात;
सर्व ऋतूंमध्ये वसंत मीच आहे, असे भगवान गीतेत सांगतात. वसंत निसर्गाला नव बहार देतो. वातावरण आरोग्यदायी असते. या दिवशी अभ्यंगस्नान केल्याने रज-तम गुण एक लक्षांश एवढे कमी होतात व तेवढ्याच प्रमाणात सतोगुण वाढतात. गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठविल्या जातात. या लहरी खेचून घेण्याचे काम गुढी करते. तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो. ताब्यांचे मुख खाली असल्याने त्या लहरी घरात प्रवेश करतात प्रजापती लहरींनी संस्कारीत तांब्यातून वर्षभर पाणी प्यायल्याने आरोग्य लाभते, अशी मान्यता आहे.
गुढीपाडव्याचे महत्व सांगायचे तर ;
गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा. हा संवत्सराचा पहिला दिवस आहे. या दिवशी ब्रम्हदेवाने विश्वाची निर्मिती केली त्यामुळे हा सण निर्मितीचा, सृजणाचा आहे. या दिवसांमध्ये निर्सगात चैतन्य फुललेले असते. प्राणी, सृष्टी यामध्ये एक उत्साह सळसळत असतो.
चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. याच दिवशी श्रीरामाने वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केले होते. या मुक्त झालेल्या प्रजेने उत्सव साजरा करत गुढया उभारल्या होत्या. त्यामुळेच या दिवसाला गुढीपाडवा हे नाव मिळाले आहे. नवसंवत्सराचा प्रारंभ भारतात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो. नववर्षाचा हा पहिला दिवस अतिशय पवित्र आणि महत्वाचा मानला जातो.
||गुढी पाडवा ||
आपणा मराठी माणसांच्या दृष्टीने गुढी पाडव्याला आणखी एक महत्वाची बाजू आहे. गुढी पाडव्याला पंचांगपूजन केले जाते. ब्रम्हदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे वेदात सांगितले आहे.
श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालिवहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. शालिवहनाने मातीच्या सैन्यातही प्राणांचा संचार केला ही लाक्षणिक कथा आहे.
शालिवहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू केले.
गुढीपाडव्याच्या दिवशी दारी उभारलेली गुढी ही पावित्र्य, मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक असते. हा सण दक्षिण आणि उत्तर भारतात पण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी या दिवशी केल्या जातात. ज्योतिषास बोलावून पुढच्या वर्षाचे भविष्य जाणून घेतात आणि महत्त्वाकांक्षी अशा शुभकार्याचा संकल्प सोडतात.