Rashi fal 2024 2023 2022

Dhanu Rashi Bhavishya 2023 | धनु राशि भविष्य 2023 12 महिन्याचे राशी फळ.

धनु राशि भविष्य 2023 (Dhanu Rashi Bhavishya 2023) हा लेख तुम्हाला तुमच्या आयुष्याशी संबंधित सर्व आनंद आणि आव्हानांची माहिती देणार आहे. तुम्हाला येणार्‍या वर्ष 2023 ची सर्व माहिती मिळेल हे लक्षात घेऊन वार्षिक धनु राशि भविष्य 2023 तयार करण्यात आले आहे. या जन्म कुंडली अंतर्गत तुम्हाला तुमच्या जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांची संपूर्ण माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये तुमचे वैवाहिक जीवन, प्रेम जीवन, तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय आणि तुम्ही जिथे काम करता त्या क्षेत्राविषयी, जीवनातील चढ-उतार, संपत्ती आणि नफा, मालमत्ता आणि वाहने, मुले आणि बरेच काही यासारख्या महत्त्वाच्या पैलूंना स्थान देणे या सारख्या तुमच्या करिअरबद्दल माहिती समाविष्ट आहे. तुमचे कौटुंबिक जीवन आणि तुमचे आरोग्य इ. या राशि भविष्यात तुम्हाला त्या संबंधित सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे

12 महिन्याचे राशी फळ

rashi-removebg-preview

चैत्रः- पौर्णिमेपर्यंत शुभग्रहांचे मोठे पाठबळ. घरातील तरुणांचा भाग्योदय, नोकरीत मनासारख्या घटना. तरुणांना परदेशी संधी. प्रेमप्रकरणे सांभाळा. उत्तरार्ध व्यावसायिकांना आर्थिक फसवणुकीचा. संशयास्पद व्यवहार टाळा.

वैशाख:- प्रगतीचे एक मोठे पर्व सुरु होईल. पूर्वार्ध सतत यश देणारा. व्यावसायिक नवे पर्याय यशस्वी होतील. तरुणांना विवाहयोग. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. उत्तरार्ध वैवाहिक जीवनात भाग्योदयाचा.

ज्येष्ठः- व्यावसायिक आर्थिक कोंडी होऊ शकते. कायदेशीर त्रास. उधारउसनवारी टाळा. पूर्वार्ध शुभग्रहांच्या पार्श्वभूमीवर तरुणांना आश्वासक मुलाखतींतून यश. उत्तरार्धात जुन्या गुंतवणुर्कीतून लाभ.

आषाढ:- पौर्णिमेजवळ गुरुचे शक्तिकेंद्र जागरुक होईल. तरुणांचे प्रश्न सुटतील. परदेशी शिक्षणाच्या संधी प्राप्त होतील. पौर्णिमेनंतर मोठा आर्थिक ओघ सुरु होईल. नव्या ओळखी फलद्रुप होतील. वैयक्तिक हृद्य समारंभ. अ.

श्रावण:- मंगळगुरु शुभयोगातून मोठी ऊर्जा देणारा महिना. पुत्रोत्कर्षातून धन्य व्हाल. पौर्णिमेजवळ मोठे मानसन्मानाचे प्रसंग. उत्तरार्ध व्यावसायिक उपक्रमांतून यश देणारा. अमावास्येजवळ नुकसानी टाळा. नि. श्रावण:- आरोग्यविषयक तक्रारींचा जोर वाढू शकतो. गुरुशी होणारे शुभयोग उत्तरार्ध गाजवतील. पौर्णिमेजवळ कोर्टप्रकरणातून यश. वादग्रस्त वसुली. तरुणांना नोकरीच्या संधी. नवपरिणीतांना पुत्रयोग.

भाद्रपद:- पौर्णिमेपर्यंत घरात सुवार्ताचा भर. व्यावसायिक उद्घाटने. परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय. नौकरीत बढती. जुन्या गुंतवणुकी यशस्वी होतील. उत्तरार्ध प्रसिद्धीचा. सूर्यग्रहण सार्वजनिक बाबीतून विरोधाचे. राजकारणातून त्रास.

आश्विनः- पूर्वार्धात गुरुशुक्र शुभयोगाचा उत्तम लाभ घ्याल. मध्यस्थी उपयोगी पडतील. तरुणांना स्पर्धात्मक नामांकन मिळेल. चंद्रग्रहणाजवळ एखादे व्यावसायिक शत्रुत्व. उत्तरार्धात सरकारी प्रकरणांतून त्रास. अमावास्या दुखापतीची. कार्तिकः- पूर्वार्धातील खर्चाचे प्रसंग. जुगार सदृश्य व्यवहार टाळा. पौर्णिमेजवळ स्फोटक वाद. उत्तरार्ध शुभग्रहयोगांच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक भागोद्याचा. वास्तुविषयक व्यवहार. नोकरीत मानांकन.

मार्गशीर्ष:- गुरुशी होणाऱ्या शुभयोगांतून मोठी मुसंडी माराल. यशाचा उच्चांक प्रस्थापित कराल. सरकार दरबारी यश मिळेल. पौर्णिमेजवळ मोठा मानसन्मान. मात्र गर्भवतींनी सांभाळावे. उत्तरार्धात नोकरीतून परदेशगमन.

पौषः- मंगळगुरुचा शुभयोग खणखणीत शुभ बोलेल. राशीतील शुक्रभ्रमण उत्तम साथ देईल. नोकरीत विशिष्ट पद मिळेल. घरात हृद्य समारंभ होतील. व्यावसायिक दृढतेने वाटचाल होईल. कर्जमुक्त व्हाल. उत्तरार्ध पुत्रोत्कर्षाचा.

माघः- अतिशय गतिमान महिना. महत्वाच्या कामांचा वेग राहील. पौर्णिमेजवळ मोठे धनवर्षाव. तरुणांचे विक्रमी यश. काहींची सरकारी कामे फत्ते होतील. बँकांची कामे होतील. उत्तरार्धात व्यावसायिक कामगारपीडेतून त्रास. अमावास्या विचित्र खर्चाची.

फाल्गुन:- व्यावसायिक कोर्टप्रकरणे सुटतील. घरातील वारसाहक्काचे प्रश्न सुटतील. भावाबहिणींची चिंता जाईल. नोकरीच्या संधी. उत्तरार्ध घरात कार्याचा. घरातील तरुणांचे भाग्योदय. सूर्यग्रहणाजवळ कुवार्तेचे सावट.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *