गुडीपाडवा 2024 gudipadwa 2024

gudipadwa | गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती मराठी 2024.

gudipadwa information in marathi

2024 मध्ये गुढी पाडवा कधी आहे?
9
एप्रिल, 2024
(मंगळवार)

gudipadwa 2024
gudipadwa 2024

गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी गुढीपाडवा 9 एप्रिल 2024 ला साजरा केला जाणार आहे. या वर्षी भारतातील सार्वजनिक उद्यापासून एकूण 48 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश गुढीपाडवा साजरा करतात.

गुडीपाडवा 2024 gudipadwa 2024
gudipadwa 2024

गुड़ीपड़वा कश्या मुले साजरा करतात?

गुढीपाडवा हा हिंदू धर्माचा एक सण आहे जो वसंत ऋतुच्या आगमनाचे प्रतीक आहे. संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवण्याचे हे सण महत्त्वाचे माध्यम आहे. या दिवशी अखंड भेटवस्तू देणे, अन्न खाणे, रंगांनी सजवणे आणि थाटामाटात आनंदोत्सव साजरा केला जातो. या दिवशी प्रभू रामाने लंकेच्या राजा रावणाचा वध केला, ज्याचे चित्रण रामलीलामध्येही आहे. गुढीपाडव्याच्या सणासाठी प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रथा आहेत.

गुड़ीपड़वाच्या अर्थ काय आहे ?

गुढी पाडवा हा महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्यात साजरा केला जाणारा प्रमुख हिंदू सण आहे. या उत्सवाचा अर्थ “विजय दशमी” असा आहे आणि त्याचा अर्थ विजयाचा दिवस आहे. या दिवशी भगवान राम लंकेहून परत आले आणि एक अत्यंत सुंदर मूर्ती तयार करण्यात आली. हिंदू धर्मात हा सण महत्त्वाचा असून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

गुडीपाडवा केव्हा साजरा करावा ?

 चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो.

गुड़ी पड़वा हा सण नवीन वर्ष सुरू झाले की सर्वात प्रथम येतो या दिवसापासून नवीन हिंदू शास्त्रानुसार नवीन वर्षाची सुरुवात होत असते| या दिवसापासून हिंदू कॅलेंडर पंचांग याची विधी पूर्वक पूजा केली जाते. या सणाच्या दिवशी आपल्या घरासमोर गुढी उभी करून त्याचे पूजन केले जाते.
हा गुढीपाडव्याचा सण यावर्षी 2024 मध्ये 9 एप्रिल 2024 या दिवशी साजरा करावा.

gudipadwa गुडीपाडवा दिवशी संवत्सर फल वाचावे त्या मुले आपले आयुष्य वाढते.

।। श्री गणेशाय नमः ।। श्रीसरस्वत्यैनमः ।। अथ संवत्सरफलम् ।।

स जयति सिंधुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम् । वासरमणिरिव तमसां राशीन् नाशयति विघ्नानाम् ।।१।।

प्रारंभी श्रीगजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्या प्रमाणे तिमिरसमूहांचा नाश होतो त्या प्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुरवदन देव उत्कर्ष पावत आहे.

।। नत्वा गणपतिं खेटान् ब्रह्मविष्णुशिवात्मकान्। संवत्सरफलं वक्ष्ये सर्व कामार्थसिद्धये ।। २ ।।

सर्व कार्याची सिद्धि होण्याकरिता श्रीगणपति, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सरफल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत. मंगलस्नान (अभ्यंग) करून ब्राह्मणासह देवांची व गुरूची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा. ज्योतिष्याचा सत्कार करून त्यांजकडून वर्षफल श्रवण करावे. म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे. म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी (संपत्ति) ही प्राप्त होतात. मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून, रोगशांति होण्याकरता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे, ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ति दानादिकांनी संतोषवून मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा. म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्येशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धि स्थिर होते. पश्चाद्धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते.

।। चैत्रे पुण्यमये वसंतसमये नव्यं फलं वार्षिकं नित्यं यः शृणुयादघौघदलनं चायुर्यशः श्रीकरम् । । वेधा विष्णुहरौ रवींदुमहिजाः सौम्योगुरुर्भार्गवो मंदोऽगुः सशिखश्च शत्रुदलनं कुर्वन्तु सर्वे ग्रहाः । । ३ । ।

प्रतिवर्षी वसंतऋतूंत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यांत नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धि होते. ब्रह्मा, विष्णु, महेश, रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु व केतु हे सर्व शत्रूंचा नाश करोत. वर्षप्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सरफल श्रवण करतात ते रोग, दुःख व दारिद्र्यरहित होऊन आनंदाने व धनधान्यांनी युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची व शुक्र कोमल वाणीची वाढ करो. शनि आनंद व राहु बाहुबल देवो आणि केतु तुमच्या कुलाची उन्नति करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर | होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्रश्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोगनाश होतो. करणाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धि प्राप्त होतात.

।। स्वस्तिश्रीसूर्यसिद्धांतमतेन समस्तजगत् उत्पत्तिस्थितिलयकारणश्रीमहाविष्णोर्नाभिकमलोद्भवस्य वर्तमानब्रह्मणः परमायुर्वर्षशतंतत्रार्थं यातम्। उत्तरपंचाशदब्दे प्रथममासे प्रथमपक्षे प्रथमदिवसे त्रयोदशघटिका: द्विचत्वारिंशत्पलानि अक्षरत्रयं च गतम् ।।४।।

श्रीसूर्यसिद्धांतमताने जगाच्या उत्पत्ति. संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्रीमहाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्षे आहे. त्यापैकी पन्नास वर्षे होऊन गेली. सांप्रत एक्कावन्नाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका १३, पळे ४२ आणि तीन अक्षरे होऊन गेली. चार युगे एक हजार वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात १४ मनु होतात. त्यांची नावे – स्वायंभुव १ स्वारोचिष २ उत्तम ३ तामस ४ रैवत ५ चाक्षुष ६ वैवस्वत ७ सावर्णि रून ८ दक्षसावर्णि ९ ब्रह्मसावर्णि १० धर्मसावर्णि ११ रुद्रसावर्णि १२ देवसावर्णि १३ इंद्रसावर्णि रून १४. त्या एकेक मनूत ७१ महायुगे होतात. एका महायुगाची वर्षे ४३ लक्ष २० हजार आहेत, णे या प्रमाणे चाक्षुषपर्यंत होऊन गेले. चालू असलेले वैवस्वत मन्वंतर सातवे आहे. वैवस्वत प्त मन्वंतरातील २७ महायुगे जाऊन अठ्ठाविसावे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्षे १७ लक्ष चे २८ हजार, त्रेता युगाची वर्षे १२ लक्ष ९६ हजार, द्वापार युगाची वर्षे ८ लक्ष ६४ हजार. सांप्रत व चालू असलेल्या कलियुगाची वर्षे ४ लक्ष ३२ हजार. तन्मध्ये षट्शककर्तारः

। आदौ इंद्रप्रस्थे न युधिष्ठिर शकः चतुश्चत्वारिंशदधिकत्रिसहस्रयुताब्दाः ।। द्वितीय उज्जयिन्यां विक्रमस्तस्य शकः पंचत्रिंशदधिकशतयुताब्दाः ।। तृतीयः प्रतिष्ठाननगरे शालिवाहनस्तस्य शकः अष्टदशसहस्त्रवर्षाणि ।। चतुर्थो वैतरिण्यां विजयाभिनंदनस्तस्य शक: दशसहस्रवर्षाणि ।। ते. पंचमो गौडदेशे धारातीर्थे नागार्जुनस्तस्य शकः चतुर्लक्षवर्षाणि ।। षष्ठः करवीरपत्तने ना कर्नाटके कल्क्यवतारः तस्य शकः एकविंशत्यधिकाष्टशतमिताब्दाः । । ५ । ।

कलियुगामध्ये ने. सहा शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर (धर्मराज) झाला. त्याचा शक ३ हजार ४४ : वर्षे, दुसरा उज्जयिनीत विक्रम झाला. त्याचा शक १३५ वर्षे, तिसरा पैठण येथे शालिवाहन. नं त्याचा शक १८ हजार वर्षे. चौथा वैतरिणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल. त्याचा न शक १० हजार वर्षे, पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल. त्याचा शक ४ लक्ष ने. वर्षे, सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल. त्याचा शक ८२१ वर्षे. कलियुगाच्या एकंदर न. वर्षातून ५१२५ वर्षे मागे पडली व ४ लक्ष २६ हजार ८७५ वर्षे शिल्लक आहेत.

अथ स्वस्ति श्रीमन्नृपविक्रमार्क समयातीत (गुजराती) संवत् २०८० राक्षसनाम संवत्सरे , (मारवाडीय संवत् २०८१ अनलनाम संवत्सरे) तथा श्रीमन्नृपशालिवाहन शके १९४६ क्रोधीनाम संवत्सरे राजा भौमः । मंत्री शनिः । कोषाधिपः भौमः । मेघाधिपः शुक्रः । र पूर्वसस्याधिपः भौमः । सेनादुर्गयोरधिपः शुक्रः । छत्रधन- क्षेत्राणामधिपः चंद्रः । रसाधिपः गुरुः । आज्ञाधिपः शनिः । मध्यपश्चाद्धान्याधिपः रविः । नीरसेशः भौमः । व्यापार-फल- खेटक-प्रतापानामधिपः बुधः । व्यवहार – वस्त्र – काष्ठानामधिपः शुक्रः । नगराधिपः न शुक्रः । सर्वेषामधिपः भौमः । इत्यधिपाः। आदौ संवत्सरफलम्। कामार्ता: स्युर्भूमिपालाः नं समस्ता युद्धे मुक्ता ईतिजा भीतिरुग्रा । क्रोधिन्यब्दे मध्यवृष्टिः कणानां वृद्धिः स्यातां क्रोधलोभौ जनानाम् ॥ या क्रोधीनाम संवत्सरात लोकांची विषयवासना वाढेल. उंदीर व ि टोळ यांचा उपद्रव वाढेल. पाऊस पुष्कळ पडेल. धान्य वृद्धि होईल. लोकांमध्ये राग व लोभ हे विकार वाढतील.

(राजादिफलांची व्यवस्था – राजाचे फल – सौराष्ट्र (काठेवाड), पंजाब, उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वऱ्हाड – विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादि ठिकाणी. प्रधानाचे फल’: बंगाल प्रांतामध्ये. मेघाधिपतीचे फल – बिहार व जबलपूरचे बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस धान्यस्वामीचे फल: गुजरात मध्ये. आर्द्रा प्रवेशाचे फल : विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी. रसाधिपतीचे फल: कोकण, मध्यप्रदेश आणि राजस्थान यांमधील भूभाग. अर्घेशाचे फल: आंध्र प्रदेशात. सेनेशाचे फल : पंजाब व काश्मीर मध्ये. नीरसेशाचे फल : दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश. फलाधिपतीचे फल: गुजरात व सौराष्ट्रामध्ये.) राजा मंगळ असल्याने धान्य आणि संपत्ति कमी होईल. आग. चोर आणि रोगराई यापासून त्रास होईल. पाऊस कमी पडेल. मंत्री शनि आहे म्हणून पाऊस कमी पडल्याने धान्य, फळे व फुले कमी मिळतील. आग आणि चोर यापासून लोकांना त्रास होईल. रोगराई वाढून लोक सुखी होणार नाहीत. मेघाधिप शुक्र असल्याने पाऊस चांगला पडून धान्य मुबलक होईल आणि संपत्ति वाढेल. लोकांना सुख समाधान मिळेल. खरीपाचा स्वामी मंगळ असल्याने पाणी व धान्य कमी होईल. आगीपासून आणि चोरांपासून त्रास वाढेल. लोकांमध्ये रक्ताचे विकार वाढतील. रसांचा अधिपति गुरु आहे म्हणून पाऊस चांगला पडून पाणी भरपूर मिळेल. केशर, कापड, फळे हे विपुल मिळतील. ऊस, चंदन व सोने मुबलक मिळेल. रब्बीचा स्वामी रवि असल्याने पाण्याची टंचाई होईल. रोगराई वाढेल. 2 जोंधळा, हरभरा कमी पिकेल. नीरसांचा अधिपति मंगळ असल्याने पोवळे, तांबडे कापड, रक्तचंदन, तांबे यांच्या किंमती वाढतील. आर्द्रा प्रवेश – ज्येष्ठ शु. १४ शुक्रवारी, 21 जून मे | 2024 रोजी रात्री १२:०६ वाजता सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फल – लोकांच्या जू चांगल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. लोक सुखीसमाधानी होतील. यावर्षी वारुण नांवाचा मेघ असल्याने यज्ञ-याग होतील, सर्वत्र आनंद होईल. सोसाट्याच्या वाऱ्यासह पुष्कळ पाऊस स पडेल, पृथ्वी जलमय होईल. यावर्षी पृथुश्रवस् नांवाचा नाग असल्याने पाऊस थोडा पडून अ धनधान्याचा तुटवडा होईल. पशुपालक श्रीकृष्ण म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य न वाढेल. दूधदुभते भरपूर होईल. मेघनिवास वाण्याचे घरी असून रोहिणी नक्षत्र संधीवर पडले डि आहे. त्यामुळे खंडित वृष्टी होऊन धान्य कमी होईल. यावर्षी चार आढक म्हणजे पर्जन्यमान 2 एकंद्रित चांगले असून त्यापैकी सहा भाग नद्या व पर्वत यावर आणि चार भाग भूमीवर या प्रमाणे इंद्र वर्षाव करील. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धि होते. नक्षत्राने पातक जाते. योगाने रोगांचे निवारण होते. करणाच्या श्रवणाने चिंतित म मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगास्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्षफल ए संवत्सरारंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील.

इति संवत्सरफलं संपूर्णम्।। श्री गजाननार्पणमस्तु ।। शुभंभवत्।।

Gudipadwa is a Hindu festival that marks the beginning of the traditional new year in Maharashtra, India. It is also celebrated in other parts of India under various names like Ugadi, Cheti Chand, and Navreh. On this day, people raise a Gudhi flag, which is a symbol of victory, and decorate their houses with flowers and rangoli. It is a time for feasting with family and friends and seeking blessings from the Almighty for prosperity and happiness in the coming year. The festival usually falls in late March or early April, depending on the lunar calendar.

Similar Posts